सर्दी-खोकल्याशिवाय अनेक वेदनांवर प्रभावी आहे आलं; वाचा कसा करावा याचा वापर

सर्दी-खोकल्याशिवाय अनेक वेदनांवर प्रभावी आहे आलं; वाचा कसा करावा याचा वापर

औषधी गुणधर्म असलेल्या बहुगुणी आल्याचे (health benefits of ginger) अनेक फायदे आहेत.

  • Last Updated: Sep 17, 2020 12:25 PM IST
  • Share this:

आयुर्वेदात आल्याला (ginger) खूप महत्त्वं आहे. आलं चवीला तिखट आणि शरीरासाठी गरम असतं. सर्दी-खोकला झाला आणि आल्याचा रस प्यायलो की आपल्याला पुरेसा आराम मिळतो. मात्र आलं हे बहुगुणी आहे. त्यामुळे त्याचे फायदेही बरेच आहेत. सर्दी-खोकला याशिवाय अनेक वेदनांवर आलं प्रभावी आहे.

myupchar.com शी संबंधित डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ला म्हणतात की, सुकवलेल्या आल्यामध्ये देखील उत्तम औषधी गुणधर्म आहेत. कोरड्या आल्यामध्ये प्रथिनं, नायट्रोजन, अमिनो अॅसिड्स, ग्लुकोज, सुक्रोज, फ्रुक्टोज, ओलेरोसिन, जिनिबीरीन, रॅफिनिस, कॅल्शियम, जीवनसत्त्वे बी आणि सी, लोह इत्यादी घटक असतात. कोरड्या आल्यामध्ये आढळणारे प्रोटिओलेट एन्झाइम पचनासही मदत करतात. आलं अनेक शारीरिक समस्यांना बरं करण्यास सक्षम आहे.

आल्याचे नेमके काय काय फायदे आहेत पाहुयात.

पोटदुखीपासून मुक्तता

आलं आणि लसूण बारीक वाटून पेस्ट बनवा. एक चमचा पेस्ट पाण्यात घालून प्यापोटदुखीमध्ये आराम मिळतो. याशिवाय सुंठ, सैंधव मीठ आणि हिंग समान प्रमाणात गरम पाण्याबरोबर घेऊ शकता.

सांधेदुखी निवारते

myupchar.com शी संबंधीत डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ल यांनी सांगितलं, कोमट आल्याच्या रसाने चांगली मालिश केल्यास सांधेदुखीपासून आराम मिळतो. नियमितपणे मालिश केल्यास सांधे मजबूत होतील तसंच सांधेदुखीचा त्रासही दूर होईल.

कान दुखण्यापासून आरा

कानदुखी आल्यामुळे दूर केली जाऊ शकते. जर कान दुखत असेल तर आल्याचा रस कोमट करा आणि कानात 3-4 थेंब घाला. कानाचं दुखणं पळून जाईल.

पोट आणि छातीतील जळजळ कमी करण्यात फायदेशीर

पोट आणि छातीत जळजळ होण्याच्या तक्रारी असतील तरीही आल्याचा वापर आरामदायक ठरू शकतो. याचा उपयोग करण्यासाठी एक ग्लास उसाच्या रसात दोन चमचे आल्याचा रस आणि एक चमचा पुदीनाचा रस एकत्र करून प्या.

सर्दीसाठी सर्वात प्रभावी औषध

सर्दीवर आलं अत्यंत प्रभावी आहे. गूळ, आलं, लिंबाचा रस, ओवा आणि हळद समान प्रमाणात पाण्यात उकळवून गाळून प्यायल्यास फायदेशीर ठरतं.

तापावरदेखील प्रभावी

आलं ताप बरा करण्यासाठी देखील चांगलं औषध आहे. दिवसातून 3-4 वेळा एक चमचा मधात आल्याचा रस मिसळून प्यायल्याने ताप कमी होतो.

कमी भूक लागण्यावर प्रभावी औषध

भूक न लागणे यासारख्या समस्या दूर करण्यासाठी आलंदेखील एक प्रभावी औषध आहे. भूक वाढवण्यासाठी, लिंबाच्या रसामध्ये आल्याचे छोटे तुकडे भिजवून त्यात सैंधव मीठ घाला आणि जेवणापूर्वी हे मिश्रण नियमितपणे सेवन करा. याने भूक नक्कीच वाढेल.

अर्धांगवायूमध्ये फायदेशीर

अर्धांगवायूच्या रुग्णाला सूंठ दिल्यास त्वरित आराम मिळतो. उडीद डाळ तुपात थोडी भाजून घ्या आणि त्यात गूळ, सुंठ मिसळून त्याची पावडर तयार करा. आपण अर्धांगवायू झालेल्या व्यक्तीला दिवसातून 3 वेळा हे मिश्रण 2-2 चमचे नियमितपणे आहारात देत राहिल्यास त्याचा चांगला परिणाम होतो.

अधिक माहितीसाठी वाचा आमचा लेख -  शैत्य (सर्दी): लक्षणे, कारणे...

न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.

अस्वीकरण: आरोग्य विषयक समस्या आणि त्याविषयीचे उपचार याची माहिती सर्वाना सहज सुलभतेने कुठल्याही मोबदल्याशिवाय उपलब्ध व्हावी हा या लेखांचा हेतू आहे. या लेखनामध्ये प्रकाशित माहिती म्हणजे तज्ञ अधिकृत डॉक्टरांच्या तपासणी, रोगनिदान, उपचार आणि वैद्यकीय सेवेचा पर्याय नाही. जर तुमची मुले, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक यापैकी कुणीही आजारी असतील, त्यांना याठिकाणी वर्णन केलेली काही लक्षणे दिसत असतील तर, कृपया तत्काळ आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटा. डॉक्टरांच्या मार्गदर्शना शिवाय स्वतः, तुमची मुले, कुटुंब सदस्य, किंवा अन्य कुणावरही वैद्यकीय उपचार करू नका किंवा औषधे देवू नका. myUpchar आणि न्यूज18 यावर प्रकाशित माहिती, त्या माहितीच्या अचूकतेवर, या माहितीच्या परिपूर्णते वर विश्वास ठेवल्याने, तुम्हाला कुठलीही हानी झाली किंवा काही नुकसान झाले तर, त्याला myUpchar आणि न्यूज18 जबाबदार असणार नाही, हे तुम्हाला मान्य आहे, आणि त्याच्याशी तुम्ही सहमत आहात.

First published: September 17, 2020, 12:25 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading