दिवाळीत परफेक्ट फोटोसाठी तयार व्हा ; घरगुती उपायांनी चेहऱ्यावरील पुरळांना बाय बाय म्हणा 

दिवाळीत परफेक्ट फोटोसाठी तयार व्हा ; घरगुती उपायांनी चेहऱ्यावरील पुरळांना बाय बाय म्हणा 

चेहऱ्यावरील पुरळ घालवण्यासाठी वेगवेगळे उपचार करून थकला असाल तर तुमच्या घरातच याचा उत्तम असा उपाय आहे.

  • Last Updated: Oct 29, 2020 07:33 PM IST
  • Share this:

चेहऱ्यावर लाल किंवा काळ्या रंगाचे डाग, पुरळ येऊ लागले की चिंता वाटू लागते. अधिक काळ सूर्यप्रकाशाच्या संपर्कात राहिल्यामुळे किंवा एखाद्या सौंदर्य क्रीमचा वापर किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या अॅलर्जीमुळे त्वचेच्या अशा समस्या उद्भवतात. myupchar.com शी संबंधित एम्सचे डॉ. उमर अफरोज यांनी सांगितलं, जर या पुरळांवर वेळीच उपचार केले गेले नाहीत तर याचे संक्रमण इतर अवयवांमध्ये पसरतं.

पुरळ दूर करण्यासाठी तुम्ही अनेक क्रीम वापरून पाहिल्या असतील मात्र त्यामुळे समस्या अधिक वाढली असेल. अशावेळी काही घरगुती उपाय करून तुम्ही पुरळांपासून मुक्ती मिळवू शकता.

आलं

त्वचेवरील पुरळ दूर करण्यासाठी दिवसातून 2-3 वेळा आल्याचे तुकडे बाधित भागावर चोळा. 15 दिवस असं केल्यानं पुरळ कमी होईल.

मध

त्वचेच्या सर्व प्रकारच्या समस्यांवर मध उपयुक्त आहे. पाण्यात मध घालून हलकं गरम करा. हे मिश्रण कापसाच्या साहाय्याने चेहऱ्यावर लावा. थोड्या वेळानं चेहरा स्वच्छ पाण्यानं धुवा.

अॅपल सिडेर व्हिनेगर

myupchar.comशी संबंधित डॉ लक्ष्मीदत्त शुक्ल यांनी सांगितलं, अनेक प्रकारच्या संसर्गामुळे बर्‍याच लोकांच्या चेहऱ्यावर डाग पडतात. यासाठी अपल सिडेर व्हिनेगर एक प्रभावी औषध म्हणून वापरलं जाऊ शकतं. यामध्ये बरेच अँटी-मायक्रोबियल गुणधर्म आहेत जे त्वचेचे डाग बरे करण्यास मदत करतात. अर्धा कप पाण्यात एक चमचा व्हिनेगर मिसळा आणि डोळ्यांजवळी भाग सोडून चेहऱ्यावर इतरत्र कापसाच्या मदतीनं लावा.

कोरफड

कोडफडच्या वापराने चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि इतर समस्याही दूर होतात. त्वचा कोमलही बनते. त्वचेवर 30 मिनिटं कोरफडचा गर लावून ठेवा आणि नंतर पाण्याने धुवा. चेहऱ्यावरील पुरळ हळूहळू दूर होतील.

खडं मीठ

खड्या मिठाचा वापर करून देखील त्वचेचा पुरळ वर उपचार केला जाऊ शकतो. वास्तविक, खडे मीठ मॅग्नेशियममध्ये समृद्ध आहे. हे त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्याबरोबरच सर्व डाग व पुरळ काढून टाकण्याचे कार्य करते. अर्धा कप पाण्यात 1 चमचा खडे मीठ घाला आणि ते हलके गरम करा. ते 5 मिनिटे चेहऱ्यावर लाऊन ठेवा व यानंतर धुवा. दिवसातून एकदा ही कृती रोज केल्यास फायदा होईल.

नारळ तेल वापरून उपचार

नारळ तेल देखील त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. नारळ तेलाचे काही थेंब एक तास चेहऱ्यावर लावून ठेवा. यानंतर चेहरा धुवा. तुम्हाला फरक दिसून येईल.

एरंडेल आणि बदाम तेल

हे दोन्ही तेल त्वचेसाठी चांगले आहेत. एरंडेल आणि बदाम तेलाचे काही थेंब मिसळा आणि ते आपल्या चेहऱ्यावर 30 मिनिटांसाठी लावा. यानंतर चेहरा धुवून टॉवेलने पुसून घ्या. दिवसातून दोनदा हा प्रयोग केल्यास निश्चितच मदत होईल.

अधिक माहिती साठी वाचा आमचा लेख - त्वचेचे विकार आणि रोग

न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.

अस्वीकरण: आरोग्य विषयक समस्या आणि त्याविषयीचे उपचार याची माहिती सर्वाना सहज सुलभतेने कुठल्याही मोबदल्याशिवाय उपलब्ध व्हावी हा या लेखांचा हेतू आहे. या लेखनामध्ये प्रकाशित माहिती म्हणजे तज्ञ अधिकृत डॉक्टरांच्या तपासणी, रोगनिदान, उपचार आणि वैद्यकीय सेवेचा पर्याय नाही. जर तुमची मुले, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक यापैकी कुणीही आजारी असतील, त्यांना याठिकाणी वर्णन केलेली काही लक्षणे दिसत असतील तर, कृपया तत्काळ आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटा. डॉक्टरांच्या मार्गदर्शना शिवाय स्वतः, तुमची मुले, कुटुंब सदस्य, किंवा अन्य कुणावरही वैद्यकीय उपचार करू नका किंवा औषधे देवू नका. myUpchar आणि न्यूज18 यावर प्रकाशित माहिती, त्या माहितीच्या अचूकतेवर, या माहितीच्या परिपूर्णते वर विश्वास ठेवल्याने, तुम्हाला कुठलीही हानी झाली किंवा काही नुकसान झाले तर, त्याला myUpchar आणि न्यूज18 जबाबदार असणार नाही, हे तुम्हाला मान्य आहे, आणि त्याच्याशी तुम्ही सहमत आहात.

First published: October 29, 2020, 7:33 PM IST

ताज्या बातम्या