टक्कल दूर करेल अमरवेल; मजबूत आणि चमकदार होतील केस

टक्कल दूर करेल अमरवेल; मजबूत आणि चमकदार होतील केस

अमरवेलचे बरेच फायदे आहे. कोणत्या समस्येसाठी अमरवेलचा कसा वापर करावा ते जाणून घेऊयात.

  • Last Updated: Sep 21, 2020 09:16 PM IST
  • Share this:

बाभूळ किंवा बोरांच्या झाडांवर अमरवेल सामान्यपणे दिसून येते. आयुर्वेदात अमरवेलचं खूप महत्त्व आहे. अमरवेलच्या फांद्या आणि बिया आयुर्वेदिक औषध म्हणून वापरल्या जातात. टक्कल पडण्यापासून ते केसांच्या समस्यांवर अमरवेल उपयुक्त आहे. याशिवाय अमरवेलचे बरेच फायदे आहे. कोणत्या समस्येसाठी अमरवेलचा कसा वापर करावा ते जाणून घेऊयात.

टक्कल पडण्याची समस्या दूर करा

myupchar.com शी संबंधित डॉ लक्ष्मीदत्त शुक्ल यांनी सांगितलं, टक्कल दूर करण्यासाठी अमरवेलचा औषध म्हणून उत्तम उपयोग होतो. टक्कल पडलं असेल तर अमरवेल बारीक वाटून तिळाच्या तेलात टाका आणि त्या तेलाने नियमित डोक्याला मालिश करा. याने नवीन केस येण्यास सुरुवात होईल आणि केस गळणं कमी होईल. केस मजबूत आणि चमकदार बनवण्यासाठी 5 ग्रॅम अमरवेल बारीक करून अर्धा लीटर पाण्यात उकळा आणि हे पाणी थंड झाल्यावर याने केस धुवा. ही प्रक्रिया खूप प्रभावी आहे.

डोळ्यांची सूज कमी करण्यास उपयुक्त

15 ते 20 मिलीग्राम अमरवेलच्या पानांच्या रसात थोडीशी साखर मिसळा आणि याचा लेप बनवून डोळ्यावर लावा. यामुळे डोळ्यातील सूज दूर होईल आणि डोळ्यांचा लालसरपणा कमी होईल.

मधुमेहाच्या रुग्णांनी हे औषध जरूर घ्यावं

मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे औषध अत्यंत फायदेशीर आहे. दररोज अमरवेलच्या बियांची 5 ग्रॅम पावडर सेवन केल्याने शरीरातील साखरेची पातळी कमी होते. मधुमेहाच्या रुग्णांनी दररोज हे घ्यावं.

मेंदू संबंधित समस्या दूर होतील

myupchar.com शी संबंधित डॉ लक्ष्मीदत्त शुक्ल यांनी सांगितलं, ताणतणाव किंवा डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी दररोज सकाळी 10 ते 20 ग्रॅम अमरवेलची पावडर पाण्यात मिसळून या पाण्याचं सेवन करा. हे मेंदूशी संबंधित इतर समस्या देखील दूर करेल.

योनीमार्गाच्या आजारांना बरं करण्यास उपयुक्त

योनीमार्गाला होणारे रोग बरे करण्यास अमरवेल अतिशय प्रभावी आहे. योनीवर अमरवेलचा लेप लावल्याने योनीमार्गाचे आजार बरे होतात.

रक्त शुद्ध करण्याचे कार्य करते

रक्त शुद्धीकरणासाठी अमरवेल एक अतिशय प्रभावी औषध आहे. 4 ग्रॅम अमरवेलची ताजी पानं गरम पाण्यात घालून काढा तयार करून तो प्यायल्यास रक्त शुद्ध होतं. यामुळे आजारांना प्रतिबंध होतोच शिवाय त्वचाही सुंदर होते.

मूळव्याध दूर करण्यात प्रभावी आयुर्वेदिक औषध

अमरवेलचा उपयोग मूळव्याधेच्या समस्येवर मात करण्यासाठी देखील केला जाऊ शकतो. 10 ग्रॅम अमरवेलच्या रसात काळी मिरी पूड मिसळा आणि संध्याकाळी नियमितपणे घ्या. मूळव्याध काही दिवसात बरा होईल आणि शरीराची इतर सूज देखील अदृश्य होईल. रक्तरंजित अतिसाराची समस्या असल्यासदेखील हाच उपाय केला जाऊ शकते.

खाज सुटण्याची समस्या दूर करतं

अमरवेल खाज सुटण्याची समस्या दूर करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. खाज सुटलेल्या जागेवर अमरवेलची पेस्ट लावल्यास खाज थांबते.

बद्धकोष्ठता दूर करण्यात फायदेशीर

45 ते 60 ग्रॅम अमरवेलचा काढा पिण्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. याशिवाय 5-10 मिलीग्राम अमरवेलचा रस पिणंदेखील फायदेशीर आहे. या उपायाने यकृत देखील चांगलं राहतं.

अधिक माहितीसाठी वाचा आमचा लेख - केस गळणे: लक्षणे, कारणे, उपचार...

न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.

अस्वीकरण: आरोग्य विषयक समस्या आणि त्याविषयीचे उपचार याची माहिती सर्वाना सहज सुलभतेने कुठल्याही मोबदल्याशिवाय उपलब्ध व्हावी हा या लेखांचा हेतू आहे. या लेखनामध्ये प्रकाशित माहिती म्हणजे तज्ञ अधिकृत डॉक्टरांच्या तपासणी, रोगनिदान, उपचार आणि वैद्यकीय सेवेचा पर्याय नाही. जर तुमची मुले, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक यापैकी कुणीही आजारी असतील, त्यांना याठिकाणी वर्णन केलेली काही लक्षणे दिसत असतील तर, कृपया तत्काळ आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटा. डॉक्टरांच्या मार्गदर्शना शिवाय स्वतः, तुमची मुले, कुटुंब सदस्य, किंवा अन्य कुणावरही वैद्यकीय उपचार करू नका किंवा औषधे देवू नका. myUpchar आणि न्यूज18 यावर प्रकाशित माहिती, त्या माहितीच्या अचूकतेवर, या माहितीच्या परिपूर्णते वर विश्वास ठेवल्याने, तुम्हाला कुठलीही हानी झाली किंवा काही नुकसान झाले तर, त्याला myUpchar आणि न्यूज18 जबाबदार असणार नाही, हे तुम्हाला मान्य आहे, आणि त्याच्याशी तुम्ही सहमत आहात.

First published: September 21, 2020, 9:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading