Home /News /lifestyle /

अंतराळात सापडला सोन्याचा गोळा; पृथ्वीवरचा प्रत्येक माणूस होऊ शकेल कोट्यधीश एवढं असेल मूल्य

अंतराळात सापडला सोन्याचा गोळा; पृथ्वीवरचा प्रत्येक माणूस होऊ शकेल कोट्यधीश एवढं असेल मूल्य

फक्त सोनंच नाही तर प्लॅटिनम, लोखंडं आणि निकेल यांसारख्या किमती धातूंनी हा अशनी (asteroid) तयार झालेला आहे. याला पृथ्वीवर आणलं तर काय होईल आणि कसं आणायचं याचा विचार NASA अजूनही करत आहे.

    वॉशिंग्टन, 10 ऑक्टोबर : अंतराळाच्या पोटात दडलेल्या अनेक गोष्टींचा उलगडा अजून माणसाला झालेला नाही. पृथ्वीच्या पोटात जशा वेगवेगळ्या खनिजांचा भरणा आहे तसा आवकाशातल्या विविध ग्रहगोलांमध्येही असू शकतो.  त्यात पृथ्वीवर बहुमूल्य ठरू शकतील अशी संपत्ती आहे. पण मानवाला ती खाली आणता येत नसल्यानं फारशी उपयोगाची नाही. दरवर्षी विविध प्रकारच्या नवीन लघुग्रहांचा शोध लागत असतो. अशाच एका नवीन लघुग्रहाचा किंवा अशनीचा शोध NASA ला लागला आहे. या asteorid वर सोन्याचे प्रचंड साठे आहेत. याची किंमत इतकी आहे की पृथ्वीवरील प्रत्येक व्यक्ती श्रीमंत होऊ शकते. हा लघुग्रह विविध धातूंनी तयार झाला असून यामध्ये प्लॅटिनम, सोनं, लोखंडं आणि निकेल यांसारख्या किमती धातूंचा समावेश आहे. 226 किलोमीटर व्यासाचा हा अशनी असून यामध्ये मोठ्या प्रमाणात लोह आहे. लवकरच NASA या ग्रहाचा अभ्यास करणार आहे. यामध्ये असणाऱ्या प्रत्येक धातूची किंमत काही कोटी रुपयांच्या घरात आहे. यामध्ये आढळणाऱ्या लोहाची किंमत जवळपास 8000 क्वॉड्रिलियन पाउंड  (8000 वर 15 शून्य एवढे पाउंड) इतकी असल्याचं सांगितलं जात आहे. सोनं नव्हे पृथ्वीवरचं द यूके टाइम्सच्या अनुसार, जर आपण हा ग्रह पृथ्वीवर आणण्यास यशस्वी झालो तर प्रत्येक व्यक्तीला  त्यातल्या लोखंडातून 9621 कोटी रुपये मिळतील. त्याचबरोबर या ठिकाणी सोनं देखील मोठ्या प्रमाणात असल्याचा अंदाज बांधला जात आहे. त्यामुळं या ठिकाणी असणारं सोनं पृथ्वीवरील सोन्याच्या व्यवसायासाठी धोकादायक असल्याचं संशोधक स्कॉट मूर यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर पृथ्वीवर असणारा सोन्याचा धातू देखील उल्कापाताच्या वेळी पृथ्वीवर आल्याचा अंदाज अनेक शास्त्रज्ञानी बांधला आहे. जॉन एमस्ली यांनी देखील दावा केला असून सोनं हा पृथ्वीवरील धातू नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, नासाने या ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी SpaceX चे मालक एलन मस्क यांची  मदत घेतली आहे. त्यांच्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने या ग्रहाच्या  तसेच या ग्रहावर असणाऱ्या धातूची किंमत देखील कळू शकते. याचबरोबर या ग्रहावर जाण्यासाठी खूप मोठा कालावधी लागणार आहे. नासा देखील या ग्रहावर जाण्याची तयारी करत असून 2022 मध्ये या ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी मिशन सुरु करणार आहेत. डिस्कवरी मिशन असे याला नाव दिल असून 2026 पर्यंत ते या ग्रहावर पोहोचून त्याचा अभ्यास करणार आहेत.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Gold, Nasa, Space

    पुढील बातम्या