आधी FB फ्रेंड मग फॅमिली फ्रेंड बनून शेअर केले अश्लील फोटो; महिला डॉक्टरचं आयुष्य उद्ध्वस्त

आधी FB फ्रेंड मग फॅमिली फ्रेंड बनून शेअर केले अश्लील फोटो; महिला डॉक्टरचं आयुष्य उद्ध्वस्त

फेसबुकवर फ्रेंड (facebook friend) बनवताना त्यांच्याशी किती जवळीक साधायला हवी हे आता तुम्हीच ही बातमी वाचून ठरवा.

  • Share this:

गाझियाबाद, 14 ऑक्टोबर : सध्या आपल्या प्रत्येकाचं जग आहे ते म्हणजे सोशल मीडिया (social). सोशल मीडियावर आपले बरेच फ्रेंड असतात. त्यातील बहुतेकांना आपण प्रत्यक्ष ओळखतही नसतो. तरीदेखील आपल्या आयुष्यात ती एक अविभाज्य भाग होऊन जातात. आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टी आपण त्यांच्याशी शेअर करतो. त्यांना अगदी आपल्या आयुष्यात डोकावण्याची संधी देतो आणि असंच करणं एका महिला डॉक्टरला (lady doctor) महागात पडलं आहे. तिचा फेसबुक फ्रेंड (facebook friend) काही काळाने फॅमिली फ्रेंड (family friend) झाला आणि आता तिचं आयुष्य त्याने उद्धवस्त केलं आहे.

ही घटना आहे उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमधली. महिला डॉक्टरच्या फेसबुक फ्रेंडने तिचे अश्लील फोटो फेसबुकवर शेअर केले आहेत. लाइव्ह हिंदुस्तानच्या रिपोर्टनुसार महिलेनं आपण जम्मूत राहणाऱ्या तरुणाला गेल्या आठ वर्षांपासून ओळखत असल्याचं सांगितलं.

या तरुणाची आणि महिला डॉक्टरची ओळख फेसबुकवर झाली. त्या दोघांमधील जवळीक इतकी वाढली की तो फक्त तिचा फेसबुक फ्रेंड राहिला नाही तर फॅमिली फ्रेंडही झाला. यादरम्यान तो तिच्याकडून प्रत्येक वेळी पैसे मागू लागला. कोणत्या ना कोणत्या कारणाने तिच्याकडून तो मोबाइल घ्यायचा.

महिला डॉक्टरच्या कुटुंबाला संशय आला त्यामुळे त्यांनी तरुणापासून दूर राहणं सुरू केलं. यानंतर तरुणाने महिलेला धमकी द्यायला सुरुवात केली.

हे वाचा - धक्कादायक! 3 वर्षे बायकोला बाथरूममध्ये कोंडलं; दरवाजा उघडताच फक्त हाडांचा सापळा

तरुणाने महिलेच्या मोबाईलमधून तिचे काही पर्सनल फोटो आपल्या मोबाईलमध्ये तिचे काही फोटो शेअर करून घेतले होते. हे फोटो त्याने फोटोशॉपमध्ये एडिट केले. बदल केलेले असे अश्लील फोटो सार्वजनिक  करण्याची धमकी महिलेला दिली. महिलेनं याचा विरोध केल्यानंतर त्याने फेसबुकवर एक फेक अकाऊंट तयार करून हे अश्लील फोटो टाकले. इतक्यावरच तो थांबला नाही तर मेसेंजरमधून त्याने सर्वांना फोटो पाहण्यासाठीही सांगितलं.

हे वाचा - पुण्यात 13 दिवसाच्या मतिमंद अर्भकाला जन्मदात्यानींच पुरून टाकले

गेल्या चार-पाच वर्षांपासून हा तरुण आपल्याला सतत धमकी देत आहे, असा आरोप महिलेनं केला आहे. तिला आणि तिच्या पतीला बदनाम करण्याची धमकी देऊन पैसे मागत आहेत. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

Published by: Priya Lad
First published: October 14, 2020, 9:14 PM IST

ताज्या बातम्या