Home /News /lifestyle /

Hair Dye Allergy : केसांना डाय किंवा कलर केल्याने होते अ‍ॅलर्जी? हे उपाय करून मिळवा आराम

Hair Dye Allergy : केसांना डाय किंवा कलर केल्याने होते अ‍ॅलर्जी? हे उपाय करून मिळवा आराम

बहुसंख्य तरूण-तरुणी केसांना रंग देतात किंवा हेअर डायचा वापर करतात. परंतु या हेअर डायमध्ये आणि हेअर कलर्समध्ये हानिकारक रसायने असतात जे केस खराब होण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात.

  मुबई, 5 ऑगस्ट : तरुणाईमध्ये सध्या हेअर कलर करून घेण्याची क्रेझ खूप जास्त आहे. बहुसंख्य तरूण-तरुणी केसांना रंग देतात किंवा हेअर डायचा वापर करतात. परंतु या हेअर डायमध्ये आणि हेअर कलर्समध्ये हानिकारक रसायने असतात जे केस खराब होण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात. यांचा वापर केल्याने केस सुंदर आणि आकर्षक दिसू लागतात. मात्र, त्यांचा वारंवार वापर केल्याने केसांचे नुकसान होते आणि तुम्हाला त्वचेची अनेक प्रकारची अ‍ॅलर्जी देखील होऊ शकते. तुम्ही केसांवर सतत हेअर डाय किंवा कलर वापरता तेव्हा टाळूच्या त्वचेला अ‍ॅलर्जी होऊ शकते. यामुळे टाळूमध्ये खाज सुटणे, लालसरपणा, कोरडेपणाचे येऊ शकतो. तसेच काही वेळा मानेच्या आणि चेहऱ्याच्या त्वचेवर खाज येण्याची समस्याही उद्भवते. ज्यांची त्वचा संवेदनशील आहे त्यांनी डाय किंवा हेअर कलरचा अतिवापर करणे टाळावे. जाणून घेऊया जास्त प्रमाणात हेअर डाय केल्याने त्वचेवर काय लक्षणे दिसू लागतात आणि ते टाळण्यासाठी कोणते उपाय करावे. अ‍ॅलर्जी टाळण्यासाठी टिप्स - स्टाइलक्रेझमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार तुम्हाला हेअर डाय किंवा हेअर कलर लावल्याने टाळू किंवा मान, कान, कपाळावर खाज सुटणे किंवा लालसरपणा दिसत असेल तर तुम्ही अ‍ॅलोवेरा जेल वापरू शकता. यात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. अ‍ॅलोवेराचा वापर केल्याने त्वचेशी संबंधित जळजळ, सूज, लालसरपणा, खाज सुटणे इत्यादी समस्यांपासून आराम मिळतो.

  White Hair On Face : सौंदर्यात बाधा ठरताहेत चेहऱ्यावरील पांढरे केस? या टिप्स करतील तुमची मदत

  - मध वापरल्याने हेअर कलरमुळे होणारी त्वचेची ऍलर्जी देखील दूर होऊ शकते. मधामध्ये असलेले काही गुणधर्म पुरळ, जळजळ शांत करतात. यासाठी निर्जंतुक कापसावर 1 चमचा मध घ्या आणि पुरळ असलेल्या भागावर ठेवा. हा उपाय दिवसातून दोन ते तीन वेळा करा. - जोजोबा तेलामध्ये अँटी-इंफ्लामेटरी आणि जखमा बरे करण्याचे गुणधर्म असतात. तुम्हाला हेअर कलरमुळे त्वचेची ऍलर्जी होण्याची शक्यता वाटत असेल तर हे तेल जळजळ, जखमा, पुरळ, खाज सुटण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी मदत करू शकते. यसाठी एक चमचा जोजोबा तेलात थोडे ऑलिव्ह ऑईल घाला आणि गरम करा. हे मिश्रण प्रभावित भागात आणि टाळूवर लावा. रात्रभर राहू द्या आणि सकाळी केस आणि टाळू स्वच्छ धुवा. Beauty Tips : ओठांचं सौंदर्य वाढवणारी लिपस्टिक ठरू शकते धोकादायक, कशी ते जाणून घ्या - याचप्रमाणे खोबरेल तेल, ऑलिव्ह ऑईल, तिळाचे तेल, टी ट्री ऑईल देखील टाळूवर आणि प्रभावित त्वचेवर लावल्यास लालसरपणा, जळजळ, खाज, सूज यासारख्या समस्या कमी होतील. कारण त्यांच्यात अँटी-इंफ्लामेटरी, वेदनशामक गुणधर्म असतात.
  Published by:Pooja Jagtap
  First published:

  Tags: Beauty tips, Health Tips, Lifestyle

  पुढील बातम्या