LGBTQ: पराग-वैभवनं असं केलं लग्न, भारतीय 'गे' जोडप्याची थक्क करणारी कहाणी

जगभरात अजूनही समलैंगिक जोडप्यांनी लग्न केलं की, अनेकांच्या भुवया उंचावलेल्या दिसतात. पण भारतात नुकतंच या गे जोडप्यांनं लग्न केलं, तेही नातेवाईकांच्या सहमतीने, सहभागाने आणि पारंपरिक विधींसह!

News18 Lokmat | Updated On: Jul 16, 2019 06:50 PM IST

LGBTQ:  पराग-वैभवनं असं केलं लग्न, भारतीय 'गे' जोडप्याची थक्क करणारी कहाणी

मुंबई, 16 जुलै : जगभरात समलैंगिक संबंधांना विरोध करण्यात आला. अजूनही कित्येक समाजांमध्ये अशा प्रकारच्या संबंधांना मान्यता नाही. LGBT समुदायातले लोक समाजापासून आपली सेक्शुअल ओरिएंटेशन लपवून ठेवतात, कारण त्यांना उघडपणे ते मान्य करता येत नाही. जगभरात होणाऱ्या सामाजिक आणि कधी राजकीय किंवा कायदेशीर विरोधाला तितक्याच ताकदीने या समुदायाने तोंड दिलं आणि न्यायासाठी लढले. भारतातही बरीच वर्षं लेस्बियन, गे, ट्रान्सजेंडर लोकांनी ( LGBT) कितीतरी वर्षं कायदेशीर लढा दिला. देशात अखेर कायदा बदल झाला आणि समलैंगिक संबंधांना मान्यता मिळाली. मुलगा आणि मुलीने केलेल्या लग्नालाच समाजात मान्यता मिळते आणि त्यामुळे समलैंगिक जोडप्यांनी लग्न केलं की, अनेकांच्या भुवया उंचावलेल्या दिसतात. या सगळ्यावर मात करत भारतात एका गे जोडप्यांनं लग्न केलं आहे, तेही नातेवाईकांच्या सहमतीने, सहभागाने आणि पारंपरिक विधींसह!

बुडणाऱ्याला Apple Watch चा आधार, असा वाचला जीव!

लग्नाच्या बंधनात अडकलेल्या या मुलांचं नाव आहे पराग मेहता आणि वैभव. ते दोघेही मुळचे भारतीय असून अमिरीकेत वास्तव्य करत आहेत. बरेच वर्षं ते दोघं रिलेशनशिपमध्ये होते आणि त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. याच वर्षी म्हणजे 2019 च्या एप्रिलमध्ये त्यांनी लग्न केलं. या लग्नाची खास बाब अशी आहे की, त्या दोघांच्या नातेवाईकांना या नात्याविषयी कल्पना होती आणि त्यांचा पूर्ण पाठिंबा होता. त्यांच्या सहमताने आणि आशीर्वादानेट हे लग्न पार पडलं.

आरोग्याशी खेळ ! रिकाम्या पोटी कॉफी पिता? हे नक्की वाचा

पराग आणि वैभव यांचं लग्न एखाद्या उत्सवाप्रमाणे पार पडलं. या लग्नाची वरात सर्वांपेक्षा वेगळी होती आणि वैशिष्ट्य म्हणजे कन्यादानाच्या प्रथेप्रमाणेच वरदानाचा विधी पार पडला. दोघांच्या नातेवाईकांनी हे लग्न अतिशय उत्साहात केलं आणि या जोडप्यांनी मंडपात आयुष्यभर एकत्र राहण्याची शपथही घेतली.

Loading...

VIDEO : 'मोठा आवाज झाला आणि काही सेकंदात इमारत कोसळली'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 16, 2019 05:09 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...