गौरी आगमनासाठी उद्या 'हा' आहे उत्तम मुहूर्त

गौरी आगमनासाठी उद्या 'हा' आहे उत्तम मुहूर्त

गौरी आगमनासाठी उद्या उत्तम मुहूर्त कोणता, पूजा कधी करावी, कशी करावी याविषयी पंचांगकर्त्यांनी दिलेली माहिती.

  • Share this:

मुंबई, 4 सप्टेंबर : उद्या म्हणजे गुरुवारी (5 सप्टेंबरला)  ज्येष्ठा गौरींचं या घरोघरी आगमन होत आहे. गणपतीबरोबरच महालक्ष्म्या किंवा गौरी आगमन आणि दुसऱ्या दिवशी पूजन हा मोठा सोहळा महाराष्ट्रातल्या अनेक घरांमध्ये होत असतो. गौरी किंवा महालक्ष्मी बसवण्याचे प्रकार आणि पद्धत वेगवेगळी असली, तरी त्यात उत्साह मात्र सारखाच असतो. गौरी आगमनासाठी उद्या उत्तम मुहूर्त कोणता याविषयी पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी आपल्या फेसबुक पेजवर माहिती दिली आहे.

सोमण यांच्या म्हणण्यानुसार, उद्या दिवसभर अनुराधा नक्षत्र असल्यामुळं दिवसभरात कधीही गौरी आणता येतील. ज्येष्ठा गौरींचं आगमन हे अनुराधा नक्षत्रावर होतं.

News18 Lokmat वर दिसेल तुमचा बाप्पा; असे व्हा स्पर्धेत सहभागी

चंद्र ज्येष्ठा नक्षत्रात असताना ज्येष्ठा गौरींचं पूजन होतं, तर चंद्र मूळ नक्षत्रात असताना ज्येष्ठा गौरींचं विसर्जन केलं जातं, अशी माहितीही त्यांनी दिली आहे.

हे वाचा - तुळस फक्त गणेश चतुर्थीच्या दिवशीच का वाहतात? वाचा काय आहे यामागची कथा

ज्येष्ठा गौरी, चैत्र गौरी, मंगळागौरी, हरितालिका आणि नवरात्रात पार्वतीची पूजा केली जाते असंही त्यांनी यावेळी सांगितलं. गौरी आगमन म्हणजे सासरी गेलेल्या मुलीला माहेरी येण्याचा हक्काचा दिवस. गौरी आगमनाच्या दिवशी माहेरी आलेल्या मुलीची ओटी भरून पूजा केली जाते. काही ठिकाणी पूर्णाकृती तर काही ठिकाणी खड्याच्या गौरी बसवण्याची पद्धत आहे. ज्येष्ठा गौरींचं आगमन, पूजन आणि विसर्जन मुहूर्तावरच केलं जातं.

हेही वाचा - भरपूर गोड खाता का, जरा पुढचा पदार्थ खाण्याआधी हे वाचा

उद्या दिवसभर अनुराधा नक्षत्र असल्यामुळं दिवसभरात कधीही गौरी आणता येतील. गौरींचं पूजन ज्येष्ठा नक्षत्रावर केलं जातं. शुक्रवार म्हणजे ६ सप्टेंबर रोजी दिवसभर ज्येष्ठा नक्षत्र असल्यामुळं ज्येष्ठा गौरींचं पूजन दिवसभर करता येईल तर शनिवारी म्हणजे ७ सप्टेंबरला दिवसभर मूळ नक्षत्र असल्यामुळं दिवसभरात कधीही ज्येष्ठा गौरींचं विसर्जन करता येईल असं दा. कृ. सोमण यांनी सांगितलं.

------------------------------

VIDEO: शिल्पा शेट्टीच्या घरच्या बाप्पाचं विसर्जन, ढोल-ताशाच्या तालावर धरला ठेका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 4, 2019 07:48 PM IST

ताज्या बातम्या