मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /घरात `या` दिशेला चुकूनही ठेवू नका गणपतीची मूर्ती

घरात `या` दिशेला चुकूनही ठेवू नका गणपतीची मूर्ती

दरवर्षी दीड, पाच, सात आणि दहा दिवसांसाठी घरोघरी श्री गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते. काही लोक कायमस्वरूपी घरामध्ये श्री गणेश मूर्ती ठेवतात. मात्र तसं करणार असाल तर हे वाचा..

दरवर्षी दीड, पाच, सात आणि दहा दिवसांसाठी घरोघरी श्री गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते. काही लोक कायमस्वरूपी घरामध्ये श्री गणेश मूर्ती ठेवतात. मात्र तसं करणार असाल तर हे वाचा..

दरवर्षी दीड, पाच, सात आणि दहा दिवसांसाठी घरोघरी श्री गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते. काही लोक कायमस्वरूपी घरामध्ये श्री गणेश मूर्ती ठेवतात. मात्र तसं करणार असाल तर हे वाचा..

    नवी दिल्ली, 10 सप्टेंबर: गणेश चतुर्थीपासून (Ganesh Chaturthi 2021) गणेशोत्सवाला (Ganesh visarjan) सुरवात झाली. हिंदू धर्मात (Hindu Religion) श्री गणपती (Shree Ganesh) हे सुख, समृध्दी आणि वैभवाचं प्रतीक मानलं जातं. दरवर्षी दीड, पाच, सात आणि दहा दिवसांसाठी घरोघरी श्री गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते. काही लोक कायमस्वरूपी घरामध्ये श्री गणेश मूर्ती ठेवतात. मात्र श्री गणरायाच्या प्राणप्रतिष्ठेच्या अनुषंगानं हिंदू धर्मशास्रांत काही नियम दिले आहेत. घरात श्री गणेश मूर्ती एका विशिष्ट दिशेलाच ठेवावी असं सांगितलं जातं. .

    श्री गणरायाची मूर्ती घरात ठेवल्यानं कोणत्याही प्रकारचा क्लेश, दुःख निर्माण होत नाही, तसेच कोणतंही विघ्न किंवा संकट येत नाही, असं मानलं जातं. परंतु, यासाठी गणपतीची मूर्ती घरात योग्य दिशेला ठेवणं महत्त्वाचं असतं. धर्मशास्रानुसार, घरामध्ये श्री गणेश मूर्तीची पूर्व (East) किंवा पश्चिम (West) दिशेलाच प्राणप्रतिष्ठा करावी. तसेच तुमच्या घराबाहेर जर एखादं झाड असेल तर त्याखाली देखील तुम्ही श्री गणरायाची प्राणप्रतिष्ठा करू शकता. विशेषतः पिंपळ, आंबा किंवा लिंबाच्या झाडाखाली श्री गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणं शुभ मानलं जातं. जर तुम्ही श्री गणेश मूर्ती दक्षिण दिशेला ठेवली तर घरात नकारात्मकता वाढण्याची शक्यता असते. तसेच तुम्ही तुमच्या देवघरात श्री गणेशाची एकच मूर्ती ठेवणं योग्य असतं.

    गौरी गणपतीचं नेमकं नातं काय? तुम्हाला पडलाय असेल हा प्रश्न तर जाणून घ्या उत्तर

    घरामध्ये श्री गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा लाकडाच्या टेबलावर करू शकता. तसेच श्री गणरायाच्या चरणी एक वाटी तांदूळ अर्पण केले तर तुमचं भाग्य तुम्हाला नक्कीच साथ देईल, असं मानलं जातं. घरातील जिन्याखाली कदापि श्री गणेश मूर्ती ठेवू नये, कारण त्या जिन्यावरून आपण चालतो आणि त्याखाली मूर्ती ठेवल्यास श्री गणेशाचा अपमान होतो. तसेच खोलीत ज्या ठिकाणी तुम्ही झोपता आणि तुमचे पाय ज्या दिशेला असतात, त्याच्या आसपास श्री गणेशाची मूर्ती ठेवू नये. या ठिकाणी मूर्ती ठेवणं अशुभ मानलं जातं.

    महाराष्ट्रातला जेष्ठा गौरी पूजन सोहळा, प्रत्येक भागानुसार आहे वेगळी परंपरा

    ऑफिसमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी जर तुम्हाला श्री गणेशाची मूर्ती ठेवायाची असेल किंवा तिची प्राणप्रतिष्ठा करायची असेल तर ती मूर्ती कधीही बसलेल्या स्वरुपात नसावी.

    श्री गणेशाच्या मूर्तीचा विचार केला तर शास्त्रानुसार, गायीच्या (Cow) शेणापासून बनवलेली गणेश मूर्ती अत्यंत शुभ मानली जाते. अशी मूर्ती जर तुम्ही घरात ठेवली तर घरात दुःख कधीच येत नाही, असं मानलं जातं. घरात धातुंची गणेश मूर्ती ठेवली तर सर्व प्रकारच्या वास्तुदोषांपासून मुक्ती मिळते. हळदीपासून (Turmeric) बनवलेली श्री गणेश मूर्ती घरात ठेवल्यास भाग्याची तुम्हाला नेहमीच साथ मिळू शकते.

    श्री गणराय हे मांगल्याचं प्रतीक असल्यानं, श्री गणरायाच्या आगमनानं घरात उत्साह, आनंद, सुख, शांती येते. त्यामुळे श्री गणेश मूर्तीची रचना आणि ती ठेवण्याच्या ठिकाणांविषयी नियमांचं पालन केल्यास श्री गणरायाचा आशीर्वाद तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल.

    Dislclaimer : सर्वसामान्यपणे ज्ञात माहितीवर हा लेख आधारित आहे. News18 ने या माहितीशी शहानिशा केलेली नाही.

    First published:
    top videos

      Tags: Culture and tradition, Ganesh chaturthi