Home /News /lifestyle /

Ganesh chaturthi : काही मिनिटांतच झटपट कशी नेसायची परफेक्ट साडी? पाहा हा VIDEO

Ganesh chaturthi : काही मिनिटांतच झटपट कशी नेसायची परफेक्ट साडी? पाहा हा VIDEO

गणपतीच्या तयारीच्या गडबडीतही अगदी तुम्ही परफेक्ट साडी नेसू शकता.

    मुंबई, 08 सप्टेंबर : गणेशोत्सव (Ganeshostav) म्हटलं की गणपती बाप्पाची तयारी सर्वात महत्त्वाची. पण गणेशोत्सवात (Ganpati festival) बाप्पाच्या स्वागतासाठी आपणही तितकंच तयार राहायला हवं. त्यामुळे आपलीही तयारी आलीच. गणेशोत्सव (Ganesh chaturthi) म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात मोठा उत्सव. त्यामुळे या दिवसात महाराष्ट्रीयन लूक तर बनतोच आणि महाराष्ट्रीयन लूक म्हणजे साडी (Saree). पण साडी नेसणं (Saree draping) म्हणजे अनेक महिलांसाठी कोणत्या परीक्षेपेक्षा कमी नाही (Easy Saree draping) . त्याच गणपतीची तयारी आणि साडी नेसणं म्हणजे तारेवरची कसरत करण्यासारखंच असतं (How to drape saree). तुम्ही नेहमी साडी नेसत असाल तर साडी (Saree video) नेसायला तुम्हाला फार वेळ लागत नाही. पण तुम्ही पहिल्यांदाच साडी नेसणार असाल किंवा कधीतरी साडी (Quick saree draping) नेसत असाल तर साडी नेसणंच कठीण आहे (Easy saree draping). साडी नेसायला मग खूप वेळ लागतो. अशात घाई गडबडीत पटापट अगदी परफेक्ट साडी नेसणं अशक्य होतं. पण टेन्शन घेऊ नका. गणेशोत्सात बाप्पाची तयारी करून, घाई गडबडीतही तुम्ही अगदी परफेक्ट साडी नेसू शकता. हे वाचा - गौरी-गणपतीसाठी नटताना असा हवा मराठमोळा ठसका; पाहा मराठी साजाची Best Pairings कमी वेळेत परफेक्ट साडी कशी नेसावी याबाबत सोशल मीडियावर बरेच व्हिडीओ आहेत. असे काही मोजके व्हिडीओ आम्ही तुम्हाला दाखवत आहोत. ज्याची तुम्हाला नक्कीच मदत होईल. 2 मिनिटांत साडी कशी नेसावी? अभिनेत्री उर्मिला निंबाळकर सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह आहे. तिचं युट्यूब चॅनेलही आहे. ज्यावर ती चाहत्यांना फॅशन आणि ब्युटी टीप्स देत असते. उर्मिलाने अगदी दोन मिनिटांत साडी कशी नेसावी हे सांगितलं आहे. उर्मिलाने साडीचा पदर आणि निऱ्या काढण्यासाठी काही टीप्सही दिल्या आहेत. दुसऱ्या दिवशीसाठी रेडी ठेवा साडी तुम्ही पहिल्यांदाच साडी नेसत असाल तर कदाचित त्याच दिवशी तुम्हाला लगेच अशी साडी पटकन नेसणं जमणार नाही, असं वाटत असेल तर काही हरकत नाही. आदल्या दिवशी थोडासा वेळ काढूनच दुसऱ्या दिवशीसाठी तयार करून ठेवा. साडी नेसून त्याचा पदर आणि निऱ्या काढून त्या जशाच्या तशा पिनअप करून त्याची घडी कशी करावी, हे या व्हिडीओत दाखवण्यात आलं आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ही साडी कशी अनफोल्ड करायची आणि कशी नेसायची हेसुद्धा या व्हिडीओत पाहायला मिळेल. साडी न नेसता फक्त आयर्निंग करून रेडी करा आता तुम्हाला त्याच दिवशी साडी नेसायलाही वेळ नसेल आणि आदल्या दिवशी साडी नेसून ती तयार ठेवायलाही वेळ नसेल. तरी काही प्रॉब्लेम नाही. दुसऱ्या दिवशी साडी नेसणार म्हणजे तुम्ही ती आयर्निंग करणारच त्याच वेळी तुम्ही साडी रेडी करून ठेवू शकता. म्हणजे एकाच वेळी तुमची दोन कामं होतील साडी न नेसता त्याचा पदर आणि निऱ्या कशा काढाव्यात आणि ती कशी तयार करावी हे तुम्हाला या व्हिडीओत पाहायला मिळेल. हे वाचा - गणेशपूजेत वाहिल्या जातात 21 पत्री; फक्त धार्मिक नाही यामागे आहे वैज्ञानिक कारण चला तर मग आता कसली वाट पाहात आहात. गणपतीला एकदम पारंपारिक लूक हवा आहे ना, मग साडी तयार करून ठेवा.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Fashion, Ganesh chaturthi, Lifestyle, Saree, Video

    पुढील बातम्या