Ganesh Chaturthi 2019: गणेश चतुर्थीलाच आहे हे विशेष योग, जाणून घ्या कधी कराल गणेश स्थापना

यावर्षी याच काळात दोन शुभ नक्षत्रांमुळे विशेष योग जुळून येत आहेत, त्यामुळे गणेश चतुर्थीला अधिक महत्त्व प्राप्त झालं आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 31, 2019 06:02 PM IST

Ganesh Chaturthi 2019: गणेश चतुर्थीलाच आहे हे विशेष योग, जाणून घ्या कधी कराल गणेश स्थापना

Ganesh Chaturthi 2019, Ganesh Chaturthi Date, Shubh Muhurt And Yog, गणेश चतुर्थी: हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षच्या चतुर्थी तिथीला गणपतीचा जन्मदिवस साजरा केला जातो. याच दिवसाला गणेश चतुर्थी असंही म्हणतात. यावेळी 2 सप्टेंबरला अर्थात येत्या सोमवारी गणेश चतुर्थी साजरी करण्यात येणार आहे. पूर्ण 10 दिवस हा सण साजरा केला जातो. यावर्षी याच काळात दोन शुभ नक्षत्रांमुळे विशेष योग जुळून येत आहेत, त्यामुळे गणेश चतुर्थीला अधिक महत्त्व प्राप्त झालं आहे.

गणेश चतुर्थीला यावेळी रवियोग आणि शुक्ल योग असे दोन विशेष योग जुळून आले आहेत. तर सिंह राशीतही चतुग्रही योग होत आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर या दिवशी सिंह राशी सूर्य, मंगळ, बुध आणि शुक्र अशा शुभ ग्रहात असेल. या काळात गणेशाची स्थापना करणं फार शुभ मानलं जातं.

गणेशाची मुर्ती स्थापनेचा मुहूर्त- गणेशाची स्थापना चित्रा नक्षत्रात करणं योग्य राहील. मंगळ ग्रहात चंद्राच्या उपस्थितीमुळे तुम्हाला चांगला अनुभव मिळेल. सकाळी 8 वाजल्यापासून गणेश चतुर्थी आणि चित्रा नक्षत्राचा योग सुरू होईल. या दिवसाला सकाळी 11.55 ते दुपारी 12.40 पर्यंत गणेशाची स्थापना करता येऊ शकते.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

या 7 ठिकाणी चुकूनही ठेवू नका मोबाइल, होईल मोठं नुकसान

Loading...

विराट- अनुष्काच नाही तर हे सेलिब्रिटीही झाले व्हिगन, पण हे Vegan Diet आहे तरी का

घरगुती गोष्टींनी तोंडाचा अल्सर करा दूर, वेदनेवर आहेत रामबाण उपाय!

नंतर पश्चाताप करण्यापेक्षा लग्नाआधी या 5 गोष्टींचा विचार नक्की करा

VIDEO: केमिकल कंपनीत बॉयलरचा भीषण स्फोट, घटनास्थळावरील LIVE VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 31, 2019 01:08 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...