• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • ज्येष्ठा गौरी पूजन सोहळा असतो असा , प्रत्येक भागानुसार आहे वेगळी परंपरा

ज्येष्ठा गौरी पूजन सोहळा असतो असा , प्रत्येक भागानुसार आहे वेगळी परंपरा

Ganesh Chaturthi 2021 : प्रत्येक प्रांत आणि भागाप्रमाणे गौरी उत्सवाची पद्धत बदलते. काही ठिकाणी गौरीला महालक्ष्मीही मानतात.

 • Share this:
  दिल्ली, 7 सप्टेंबर : महाराष्ट्रात गौरी-गणपती हा उत्सव अगदी उत्साहात साजरा होतो. या उत्सवाची लगबग श्रावण महिन्यापासूनच सुरू होते. गणपतीच्या आगमनानंतर तिसऱ्या दिवशी गौरी येतात. एकट्या महाराष्ट्रात विविध प्रांतानुसार गौरी पूजनाची प्रथा आहे. कोकण, खान्देश, मराठवाडा, विदर्भ या भागात उत्सवाची वेगळी पद्धत पहायाला मिळते. पण, महिलांच्या या सणात भक्तीभाव एकच असतो. माहेरवाशीण गौरीचा तितक्याच लाडाने पाहुणचार केला जातो. काही ठिकाणी गौरीला महालक्ष्मीही म्हणतात. गौरी आगमनाच्या दिवशी महालक्ष्मीची स्थापना करतात. कोकणात या सणासाठी मुली माहेरी जातात. कोकणात काही भागात फुलांच्या गौरींची पद्धत आहे. नदीवरून पाच खडे आणि गौरीची फुलं आणली जातात. त्या फुलांची घरी आणल्यावर पूजा केली जाते आणि त्याची गौर बांधतात. तिला साडी, दागिने मुखवटा घालतात. काही भागात मूर्तींची पूजा होते. बऱ्याच भागात लाकडी गौरी असतात. मुखवटेही असतात. दरवर्षी त्यांना साडी नेसवून अगदी देवाप्रमाणे नटवतात. महिला आपल्या गौरीचा साजश्रुंगार प्रेमाने करतात. (गणेश चतुर्थीचं हे महत्त्व माहीत आहे का? प्रतिष्ठापना का, कशी आणि कधी करावी?) तर कोळी समाजात गौरींचा सण साजरा करण्याची प्रथा थोडी वेगळा आहे. तिथे भाद्रपद सप्तमीच्या दिवशी संध्याकाळी महिला तेरड्याच्या झाडाची फांदी गौरीच्या रुपाने घरी आणतात आणि गौरी इलो म्हणत तिचं स्वागत करतात. कौळी बांधव देवीला मच्छीचा म्हणजे मांसाहाराचा नैवेद्य दाखवतात. रात्रीच्या जागरणासाठी महिला कोळी परंपरे प्रमाणे साड्या नेसून पारंपारीक नृत्य करतात. अष्टमीच्या दिवशी महापूजा तर, नवमीला म्हणजे विर्जनाला पारंपारिक वेशभूषेत गौरी आणि शंकराची मिरवणूक काढतात. (देवघरातील पितळी मूर्ती काळ्या पडल्यात? या घरगुती उपायांनी होतील चमकदार) खान्देश, मराठवाडा, विदर्भात यापेक्षा वेगळी पद्धत आहे. तिथे महालक्ष्मीच्या रुपात गौरीची पुजा करतात. परंपरेनुसार धातू, मातीची मूर्ती किंवा कागदावर देवीची चित्र प्रतिमा पुजन करतात. विदर्भ-मराठवाड्यात हा सण सासुरवाशीणींचा सण मानल जातो. बहुजन समाजात गौरीच्या उत्सवाची वेगळी प्रथा पहायला मिळते. तिथे लहान आकाराची 5 मडकी आणून त्यावर हळदीने रंगवलेला दोरा, खोबऱ्याचा वाट्य़ा आणि खारका घालतात. त्याची उतरंड रचून त्यावर गौरीचा मुखवटा बसवण्यात येतो. गौरीच्या 2 प्रतिमा तयार केल्या जातात. काही ठिकाणी कुमारीका फुलं आणून पुजा करतात. तिसऱ्या दिवशी विर्जन करतात. (Ganesh Chaturthi 2021: गणपतीची तयारी करण्याअगोदर हे नियम वाचा) पौराणिक कथेनुसार असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया आपलं सौभाग्य अक्षय करण्यासाठी गौरीला शरण गेल्या. तिची प्रार्थना केली तेव्हा श्री गौरीने भाद्रपद शुद्ध अष्टमीला असुरांचा संहार करून पृथ्वीवरील प्राण्यांना सुखी केलं. म्हणून अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी स्त्रिया ज्येष्ठा गौरी हे व्रत करतात. (आजही पृथ्वीवर आहे कृष्णाचं हृदय; हैराण करणारं हे रहस्य माहिती आहे का?) गौरीसाठी नैवेद्य गौरी आगमनाच्या दिवशी गौरीला भाकरी भाजीचा नैवेद्य दाखवतात. तर, पूजनाला वेगवेगळ्या प्रांतानुसार तऱ्हेतऱ्हेचा थाट असतो. फळं, करंज्या, लाडू, पुऱ्या, सांजोऱ्या, बर्फी दाखवतात. दुपारी पुरणपोळी, खीर, पुरी, घावन, घाटल्या, आंबिल तर, काहीजण माहेरी आलेल्या लेकीसाठी खास मटणाचाही नैवेद्य करतात. प्रत्येक भागानुसार तिथली प्रथा परंपरा असते.
  Published by:News18 Desk
  First published: