मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Furniture Cleaning Tips: वर्षानुवर्षे टिकेल घरातील फर्निचर, फक्त ‘या’ टिप्स फॉलो करा

Furniture Cleaning Tips: वर्षानुवर्षे टिकेल घरातील फर्निचर, फक्त ‘या’ टिप्स फॉलो करा

Furniture Cleaning Tips: वर्षानुवर्षे टिकेल घरातील फर्निचर, फक्त ‘या’ टिप्स फॉलो करा

Furniture Cleaning Tips: वर्षानुवर्षे टिकेल घरातील फर्निचर, फक्त ‘या’ टिप्स फॉलो करा

Furniture Cleaning Tips: फर्निचर खूप महागडं असतं. या फर्निचरची योग्य काळजी घेणं महत्त्वाचं असतं. कारण फर्निचर हे लाकडापासून बनलेलं असतं, जे खराब होऊ शकते.

  मुंबई, 15 ऑगस्ट:  आपल्या सर्वांच्या घरात बेड, सोफा, टेबल इत्यादी अनेक प्रकारच्या फर्निचर वस्तू असतात. सजावटीसाठी आणि इतर महत्त्वाच्या कामांसाठी लोक मोठ्या प्रमाणावर फर्निचरचा वापर करतात. या फर्निचरमुळं घराची शोभा वाढते, त्याचप्रमाणे ते दैनंदिन कामात खूपच उपयोगी ठरतं. बऱ्याचदा हे फर्निचर खूप महागडं असतं. या फर्निचरची योग्य काळजी घेणं महत्त्वाचं असतं. कारण फर्निचर हे लाकडापासून बनलेलं असतं, जे खराब होऊ शकते. अनेक वर्ष आपण फर्निचर वापरतो. मात्र, काही काळानंतर या गोष्टी बिघडू लागतात. अनेकदा पावसाळ्यात फर्निचरच्या वस्तू हळूहळू खराब होतात. याशिवाय ओलाव्यामुळेही फर्निचर फुगतं आणि त्याचं आयुष्य लक्षणीयरित्या कमी होतं. असं झाल्यावर दरवाजा उघडण्यात किंवा फर्निचरशी संबंधित इतर कामं करताना अडचणींचा सामना करावा लागतो. तुमच्या घरातही फर्निचरच्या वस्तू असतील तर त्यांची विशेष काळजी घ्यावी. तुमच्या घराच्या लाकडाला आर्द्रतेपासून वाचवण्यासाठी तुम्ही काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत, ज्याचा अवलंब केल्यावर तुमच्या घरात ठेवलेलं फर्निचर (Furniture Cleaning Tips) वर्षानुवर्षे टिकेल. चला जाणून घेऊया -
  • घरात ज्या ठिकाणी पावसाचे थेंब पोहोचू शकत नाहीत अशा ठिकाणी फर्निचरच्या वस्तू ठेवाव्यात. काही वेळा पावसात भिजल्यानं फर्निचर फुगतं.
  • घराच्या खिडकीच्या दाराच्या लाकडाला वेळोवेळी तेल लावत राहावं. असं केल्यानं फर्निचरला वाळवी लागणार नाही. दुसरीकडं, जर तुमचे फर्निचर ओलं होऊन फुगलं असेल, तर अशा परिस्थितीत आपण त्याला कोरडं करावं.
  हेही वाचा- Wash Basin Cleaning: वॉश बेसिन स्वच्छ करण्यासाठी करू नका जास्त खर्च, अगदी स्वस्तात होईल चकाचक
  • पावसाळ्यात तुम्ही तुमचं फर्निचर भिंतीपासून दूर ठेवावं. भिंतीपासून दूर ठेवल्यास फर्निचर खराब होणार नाही. याशिवाय तुम्ही तुमचं फर्निचर नियमित कालावधीनंतर रंगवत राहावं. यामुळे त्याचं आयुर्मान जास्त वाढेल.
  • फर्निचर स्वच्छ करण्यासाठी ओले कापड वापरू नका. तुमचे फर्निचर नेहमी कोरड्या कापडानं स्वच्छ करा. या टिप्सचा अवलंब करून तुम्ही तुमच्या फर्निचरचं आयुर्मान वाढवू शकता.
  Published by:Suraj Sakunde
  First published:

  Tags: Home-decor, Tips

  पुढील बातम्या