Friday The 13th : खरंच अशुभ असतो का हा दिवस? का आहे एवढी भीती?

Friday The 13th : खरंच अशुभ असतो का हा दिवस? का आहे एवढी भीती?

फ्रायडे द थर्टीन्थ म्हणजे भयंकर दिवस असं का? त्यातून या वेळी पौर्णिमेच्या दिवशी हा दिवस आला आहे. लाखो लोकांच्या मनात याविषयी भीती असते. नेमका या तारीख- वार संयोगाचा काय संबंध आहे?

  • Share this:

मुंबई, 12 सप्टेंबर :  फ्रायडे द थर्टीन्थ म्हणजे भयंकर दिवस असं का? हा दिवस विशेषतः पाश्चिमात्य देशांमध्ये अशुभ मानला जातो आणि लाखो लोकांच्या मनात याविषयी भीती असते. त्यात या वेळी पौर्णिमेच्या दिवशीच ही तारीख आली आहे. नेमका या तारीख- वार संयोगाचा काय संबंध आहे?

खरं तर ही निव्वळ अंधश्रद्धा आहे. पण जुन्या काळापासूनच या आकड्याची भीती अनेकांच्या मनात इतकी घट्ट आहे की अजूनही शुक्रवारी 13 तारीख आली की मनात शंकेची पाल चुकचुकते. ख्रिश्चन धर्मीय 13 तारीख अशुभ मानतात. त्या दिवशी चांगलं काम करत नाहीत. त्यामागे त्यांच्या काही श्रद्धा आणि भावना आहेत. शुक्रवारीच येशू ख्रिस्तांना सुळावर चढवलं होतं आणि ती 13 तारीखच असल्याचं काही जण मानतात. ख्रिस्ताच्या 13 व्या शिष्यानं फितुरी केली आणि त्यामुळे ख्रिस्ताचा सुळावर अंत झाला असंही काही जण मानतात. त्यामुळे शुक्रवारी आलेली 13 तारीख वर्ज्य समजली जाते.

या सगळ्या समज- गैरसमजांमध्येच Friday the 13th नावाची एक अमेरिकन हॉरर फिल्म रीलिज झाली होती.

वाचा - अशी कोणती भीती तुम्हाला आहे का, एकदा स्वतःलाच विचारा!

हा चित्रपट एवढा चालला की, याचे 12 सीक्वेल प्रदर्शित झाले आणि 13 वा मात्र होऊ शकला नाही. आजही हा चित्रपट सर्वोत्कृष्ट भयपट म्हणून पाहिला जातो.

हे वाचा - या गोष्टी लक्षात ठेवल्या तर प्रत्येक कामात व्हाल हमखास यशस्वी!

फ्रायडे द थर्टीन्थ नावाची फ्रँचायझी सुरू झाली आणि त्या लोगोखाली हॉरर कादंबऱ्या, कॉमिक बुक्स आणि इतरही अनेक गोष्टी बाजारात आल्या.

शुक्रवारच्या 13 तारखेला झाल्या दुर्घटना

13 ऑक्टोबर 1307 या दिवशी फ्रान्समध्ये मोठी दुर्घटना झाली होती. तो शुक्रवारच होता. त्या दिवशी अनेक हत्या झाल्या. द व्हिंची कोड या कादंबरीत या दिवसाचा उल्लेख आहे.

हिंदू मान्यतेनुसार मात्र 13 तारखेला अशुभ मानत नाहीत. हिंदू कॅलेंडरनुसार उद्या भाद्रपद पौर्णिमा आहे. त्यानंतर पितृपक्ष सुरू होतो.

----------------

VIDEO : गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत तमाशा? कारण ऐकल्यावर तुम्ही कराल मान्य!

Published by: Arundhati Ranade Joshi
First published: September 13, 2019, 6:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading