मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Weight Loss: वजन कमी करण्यासाठी फळं खाताय? या फळांमुळे कमी होण्याऐवजी वेगात वाढू लागेल वजन

Weight Loss: वजन कमी करण्यासाठी फळं खाताय? या फळांमुळे कमी होण्याऐवजी वेगात वाढू लागेल वजन

Fruits To Avoid For Weight Loss: काही फळे अशी आहेत ज्यामध्ये साखर, फॅट आणि कॅलरीजचे प्रमाण जास्त असते. जर आपण त्यांचे जास्त किंवा नियमित सेवन केले तर आपले वजन कमी होण्याऐवजी वाढू लागते. अशाच काही फळांबद्दल आज जाणून घेऊया.

Fruits To Avoid For Weight Loss: काही फळे अशी आहेत ज्यामध्ये साखर, फॅट आणि कॅलरीजचे प्रमाण जास्त असते. जर आपण त्यांचे जास्त किंवा नियमित सेवन केले तर आपले वजन कमी होण्याऐवजी वाढू लागते. अशाच काही फळांबद्दल आज जाणून घेऊया.

Fruits To Avoid For Weight Loss: काही फळे अशी आहेत ज्यामध्ये साखर, फॅट आणि कॅलरीजचे प्रमाण जास्त असते. जर आपण त्यांचे जास्त किंवा नियमित सेवन केले तर आपले वजन कमी होण्याऐवजी वाढू लागते. अशाच काही फळांबद्दल आज जाणून घेऊया.

नवी दिल्ली, 10 जानेवारी : वजन कमी करण्यासाठी अनेकजण व्यायामासोबतच जास्तीत-जास्त फळे खाण्यावर भर देतात. कारण फळांमध्ये पोषक तत्वे मुबलक प्रमाणात आढळतात आणि कॅलरीजही तेवढ्या नसतात. याशिवाय, आपल्याला बहुतेक फळांमधून फायबरचे प्रमाण देखील चांगले मिळते, जे वजन कमी (Weight-loss) करण्यासाठी खूप महत्वाचे आहे, परंतु प्रत्यक्षात सर्व फळांमध्ये (Fruits to Avoid For Weight Loss) असे होत नाही.

काही फळे अशी आहेत ज्यामध्ये साखर, फॅट आणि कॅलरीजचे प्रमाण जास्त असते. जर आपण त्यांचे जास्त किंवा नियमित सेवन केले तर आपले वजन कमी होण्याऐवजी वाढू लागते. अशाच काही फळांबद्दल आज जाणून घेऊया.

वजन कमी करण्यासाठी ही फळे खाणे टाळा (Fruits to Avoid For Weight Loss)

केळी

केळी (Banana) हे पचण्याजोगे आणि पोटॅशियम युक्त फळ आहे. जे आपल्या मज्जासंस्थेसाठी खूप चांगले आहे, पण त्यामुळे वजनही वाढते. कारण केळ्यामध्ये फॅटसोबतच साखरही असते. एका सामान्य आकाराच्या केळीमध्ये सुमारे 150 कॅलरीज असतात. त्यामुळे वजन कमी होण्याऐवजी वाढवण्याचे काम होते.

अननस

अननस हे आरोग्यदायी फळ आहे, पण वजन कमी करण्यासाठी त्याचे सेवन केल्यास उलट परिणाम होऊ शकतो. अननसाचे नियमित सेवन केल्याने आपले वजन कमी होण्याऐवजी वाढू शकते. कारण अननसात देखील भरपूर साखर असते. यामुळे आपल्याला भरपूर कॅलरीजही मिळतात. साहजिकच अशा परिस्थितीत अननसाचे सेवन करणे आरोग्याच्या दृष्टीने योग्य असेल, पण वजन कमी करण्यासाठी हे फळ उपयोगी ठरणार नाही.

एवोकॅडो (avocado)

त्याला ऐलीगेटर नाशपाती असेही म्हणतात. एवोकॅडो पचना व्यतिरिक्त, हाडे, डोळे आणि मेंदूसाठी देखील खूप फायदेशीर आहे. यासोबतच हे एक चांगले एनर्जी बूस्टर देखील आहे. ज्याचा सरळ अर्थ असा आहे की, त्यात भरपूर कॅलरीज आढळतात. यावरून हे स्पष्ट होते की अॅव्होकॅडोचे नियमित सेवन केल्याने आपले वजन कमी होण्याऐवजी वाढू शकते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी त्याचा वापर अजिबात करू नये.

हे वाचा - Hair care tips : केस धुताना जवळपास 90 टक्के लोक या चुका करतात; नंतर उपायांवर वेळ घालवतात

द्राक्षे

द्राक्षासारख्या लोकप्रिय फळाची खासियत आपल्या सर्वांना माहीत आहे. पण याचा दुसरा पैलू म्हणजे 100 ग्रॅम द्राक्षांमध्ये 16 ग्रॅम साखर आढळते. यामुळे आपल्याला सुमारे 65 कॅलरीजची ऊर्जा मिळते, तसेच त्यात चरबी असते. त्यामुळेच वजन कमी करण्यासाठी द्राक्षांचा वापर करू नये.

हे वाचा - साध्या Cold drink मुळेही होऊ शकतो कॅन्सर; संशोधनातून समोर आली धक्कादायक बाब

आंबा

आंबा हा फळांचा राजा मानला जातो आणि तो बहुतेक सर्वांना आवडतो. यामध्ये व्हिटॅमिन ए आणि सी सोबत पोटॅशियम देखील चांगल्या प्रमाणात आढळते. परंतु, वजन कमी करण्याच्या दृष्टीने त्याचे सेवन योग्य नाही. कारण त्यात कॅलरीजही चांगल्या प्रमाणात असतात. शंभर ग्रॅम आंब्यापासून आपल्याला सुमारे साठ कॅलरीज मिळतात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी आंबा फायदेशीर नाही.

(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Weight, Weight loss tips