नवी दिल्ली, 04 डिसेंबर : थंडीच्या मोसमात शरीरातील उष्णता टिकवून ठेवण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे ड्रायफूट, मांस, चिकन-अंडी यांचा आराहात समावेश करतात. पण, यासाठी तुम्ही कधी फळे आणि भाज्यांची मदत घेतली आहे का? हिवाळ्यात काही फळे आणि भाज्या देखील उष्णता टिकवून ठेवण्यासाठी प्रभावी आहेत. शरीरातील उष्णता टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही या फळे आणि भाज्यांचे सेवन करू शकता. या भाज्या आणि फळे तुमच्या स्वयंपाकघरात रोजच वारण्यास हरकत नाही. जाणून घेऊया अशा फळे (Hot Effect Fruits & Vegetables For Winter) आणि भाज्यांविषयी.
आहारात लसणाचा समावेश
लसणाचा प्रभाव हा नैसर्गिकरित्या गरम असतो, त्यामुळे हिवाळ्यात शरीर उबदार ठेवण्यासाठी तुम्ही लसणाचा आहारात समावेश करू शकता. तसं पाहायला गेलं तर बरेच लोक भाज्या, गार्लिक ब्रेड आणि सर्व प्रकारच्या पदार्थांमध्ये लसूण वापरत असतात. पण, हिवाळ्यात जाणीवपूर्वक लसणाचा आहारात समावेश फायदेशीर ठरेल. त्यामुळे शरीर उबदार ठेवण्यासोबतच तुमचे रक्ताभिसरण सुधारण्यास आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत होईल.
आले वापरा
आले देखील खूप गरम गुणधर्माचे आहे. आल्याचा वापर बहुतेक घरांमध्ये चहा आणि काढ्यासाठी हिवाळ्यात केला जातो. याचा वापर तुम्ही भाज्या, सॅलड, दूध यासारख्या गोष्टींमध्येही सहज करू शकता. आलं अँटी-ऑक्सिडंट्स आणि अनेक पोषक तत्वांनी समृद्ध आहे जे तुमच्या शरीराला फक्त उबदारपणाच देत नाही तर आणखी बरेच फायदे देण्यास फायदेशीर आहे.
लाल मिरच्या
लाल मिरच्या देखील खूप गरम गुणधर्माच्या असतात. त्यामुळे हिवाळ्याच्या हंगामात तुमचे शरीर उबदार ठेवण्यास खूप मदत होते. एवढेच नाही तर लाल मिरचीमध्ये पोटॅशियम आणि मँगनीजसारखे सर्व पोषक घटक असतात. जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतात. यासोबतच रक्त गोठण्यासही यामुळे प्रतिबंध होतो.
खजूर
तुम्ही फळे आणि सुका मेवा या दोन्ही प्रकारात खजूर वापरू शकता. त्याचा प्रभाव खूप गरम नसतो, परंतु त्यात भरपूर पोषक तत्वे असतात, जे तुमच्या शरीराला उबदारपणा देण्यासोबतच हाडे मजबूत करण्यास आणि रक्ताची कमतरता पूर्ण करण्यास मदत करतात.
द्राक्षे खा
हिवाळ्यात शरीर उबदार ठेवण्यासाठी तुम्ही द्राक्षाचे सेवन देखील करू शकता. यामध्ये अनेक पोषक तत्वांसह व्हिटॅमिन सी देखील भरपूर आहे. जे तुमची रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यास देखील मदत करते. एवढेच नाही तर सर्दी-खोकल्याच्या समस्येपासूनही चांगला आराम मिळतो.
हे वाचा - वेदनेने तडफडत होती चिमुकली; लोक अर्धा तास व्हिडिओ बनवत राहिले अन् तिने जग सोडलं
(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health Tips, Winter, Winter session