OMG VIDEO : जे फळ कापाल त्यातून निघेल त्याच रंगाची आणि स्वादाची कुल्फी!

OMG VIDEO : जे फळ कापाल त्यातून निघेल त्याच रंगाची आणि स्वादाची कुल्फी!

तुम्ही फळ कापलंत आणि त्यातून त्याच रंगाची आणि स्वादाची कुल्फी निघाली तर ? तर तुम्ही दिल्ली -6 मधल्या कुरेमल फ्रुटकुल्फीमध्ये आला आहात ! त्यासाठी हा व्हिडिओ बघाच.

  • Share this:

दिल्ली, 1 ऑगस्ट : दिलवाली दिल्ली हे खवय्यांचं शहर मानलं जातं. इथले छोले भटुरे, आलू चाट, टिक्की, दही भल्ले खाण्यासाठी देशभरातून लोक येत असतात. पण हे सगळं चटपटीत खाल्ल्यानंतर काहीतरी गोडधोड हवंच की.

दिल्लीत येऊन असं काही खास गोडधोड खायचं असेल तर दिल्ली - 6 मध्ये जायला हवं कारण इथे मिळते कुरेमल फ्रुट कुल्फी. या कुल्फीवाल्याकडे जाऊन तुम्ही एखादं फळ कापलंत तर त्यातून तोंडाला पाणी सुटणारी कुल्फी मिळेल.

ज्या फळामध्ये ही कुल्फी स्टफ केलेली असते त्याच फळाचा रंग आणि स्वाद या कुल्फीला येतो. दिल्ली - 6 च्या या फ्रुट कुल्फी स्टॉलमध्ये वेगवेगळ्या स्वादाची कुल्फी मिळते. पण त्यातही सफरचंद, डाळिंब, संत्र, चिकू आणि आंबा या फळांचा स्वाद ही इथली खासियत आहे.

ही कुल्फी कशी बनते यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पाहावाच लागेल. कुरेमल कुल्फीचे विशाल शर्मा सांगतात, आम्ही फळामधला गर काढून त्यात आमची कुल्फी भरतो. दिल्लीतल्या उन्हात किंवा कोणत्याही हंगामात ही गारेगार गोडगोड कुल्फी तुमच्या जिभेलाच नाही तर मनालाही खूश करेल.

(हेही वाचा : पाहा VIDEO : वॉटरपार्कमध्ये आली 'त्सुनामी'सारखी लाट, 44 जण जखमी )

कुल्फीचा स्वाद आणि फळाचा पौष्टिक गुण हे दोन्हीही तुम्हाला गोड खाण्यात मिळत असेल तर अजून काय हवं? ही कुल्फी फक्त दिल्लीतच प्रसिद्ध नाही तर इटली, दक्षिण आफ्रिका, दुबई, थायलंड, ऑस्ट्रेलिया या देशांतही या फळांच्या कुल्फीला मागणी आहे. या जगप्रसिद्ध कुल्फीचा 100 वर्षं जपलेला अनोखा स्वाद अनुभवण्यासाठी दिल्ली-6 च्या या गल्लीत जायलाच हवं.

====================================================================================================

VIDEO: TIKTOKचा छंद तरुणाच्या अंगलट, बाईक अंगावर पडून गंभीर जखमी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 1, 2019 08:23 PM IST

ताज्या बातम्या