• Home
  • »
  • News
  • »
  • lifestyle
  • »
  • मेंदूचं आरोग्य उत्तम राखण्यासाठी आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश

मेंदूचं आरोग्य उत्तम राखण्यासाठी आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश

50 वर्षांनंतर ब्रेन फंक्शन वाढतं.55 वर्षांनंतर मेंदूचं काम हळूहळू व्हायला लागतं. स्मरणशक्ती कमी व्हायला लागते. जर वडील काही गोष्टी विसरत असतील, त्यांच्यावर वाढत्या वायाचा परिणाम होत आहे असं समजा. त्यांच्या आहाराची काळजी घ्यायला सुरूवात करा. फळं,भाज्या, हल्दी फॅट, कडधान्य,ड्रायफ्रुट खायला द्या.

50 वर्षांनंतर ब्रेन फंक्शन वाढतं.55 वर्षांनंतर मेंदूचं काम हळूहळू व्हायला लागतं. स्मरणशक्ती कमी व्हायला लागते. जर वडील काही गोष्टी विसरत असतील, त्यांच्यावर वाढत्या वायाचा परिणाम होत आहे असं समजा. त्यांच्या आहाराची काळजी घ्यायला सुरूवात करा. फळं,भाज्या, हल्दी फॅट, कडधान्य,ड्रायफ्रुट खायला द्या.

आवश्यक पौष्टिक घटकांमुळेच मेंदूला (Brain) चालना मिळत असते. त्याशिवाय बदलत्या काळासोबत मानसिक आरोग्य (Mental Health) व्यवस्थित राखण्यासाठी आपल्या रोजच्या आहारात काही घटकांचा समावेश करणं गरजेचं आहे.

  • Share this:
मुंबई, 26 फेब्रुवारी : साधारणपणे आपण जे खातो त्यातील आवश्यक पौष्टिक घटकांमुळेच मेंदूला (Brain) चालना मिळत असते. त्याशिवाय बदलत्या काळासोबत मानसिक आरोग्य (Mental Health) व्यवस्थित राखण्यासाठी आपल्या रोजच्या आहारात काही घटकांचा समावेश करणं गरजेचं आहे. त्यामुळे तुमच्या शारीरिक आरोग्याबरोबरच मेंदूचं आरोग्यदेखील (Brain Health) उत्तम राहण्यासाठी मदत होते. नट्स (कठीण कवचाची फळं) (Nuts) कठीण कवचाच्या फळांमध्ये व्हिटॅमिन ई आणि खनिजे असल्याने ती आहारात असणं मेंदूसाठी खूप फायदेशीर आहे. अक्रोड अक्रोड (walnut) हे मेंदूसाठी सुपर फूड मानलं जातं. अक्रोडांमध्ये अल्फा-लिनोलेनिक अ‍ॅसिड असतं. मेंदू तल्लख राहण्यासाठी याचा खूप मोठा फायदा होतो. मेंदूवरचा तणाव कमी करण्यासाठी फायदेशीर ठरत असल्यानं अक्रोड खाणं गरजेचं आहे. अक्रोड हा पोषणद्रव्यांनी समृद्ध असा अन्नघटक असून, मेंदूसाठी तो अनेक अर्थांनी उपयुक्त ठरतो. बदाम बदामही (Almond) नियमितपणे आहारात असावेत. बदाम खाऊन स्मरणशक्ती वाढते. चार बदाम आदल्या रात्री दुधात भिजत घालावेत आणि ते दुधासह सकाळी अनशापोटी चावून खावेत, असं आहारतज्ज्ञ सांगतात. व्हिटॅमिन बी 6, ई, झिंक आणि प्रोटीनचा मोठं प्रमाण यात असतं. यामुळे मेंदूची ताकद वाढण्यास आणि मेंदू तल्लख राहण्यास मदत होते. यामुळे मेंदूतील अ‍ॅसेटिलकोलीनची पातळी वाढण्यास मदत होते.

(वाचा - Weight Loss Tips: वजन कमी करताय? चुकूनही खाऊ नका ही फळं, होईल उलटा परिणाम)

काजू काजू हा स्मरणशक्ती तल्लख करणारा घटक आहे. पॉली-सॅच्युरेटेड आणि मोनो-सॅच्युरेटेड फॅट्स मेंदूच्या पेशींच्या निर्मितीसाठी आणि त्याद्वारे त्याची शक्ती वाढविण्यास अत्यंत फायदेशीर आहेत. यामुळे काजूचं सेवनदेखील फायदेशीर आहे. बिया भोपळ्याच्या बिया (Pumpkeen Seed), जवस (FlaxSeed) मेंदूच्या आहारासाठी उत्तम असतात. या बियांमध्ये असलेल्या झिंक, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन बीमुळे विचार करण्याचं कौशल्य वाढतं, स्मरणशक्ती समृद्ध होते. सेज मेंदूचं कार्य सुरळीत राहण्यासाठी सेजचा (Sage) खूपच फायदा आहे. व्हिटॅमिन के, ए, सी, बी 6, ई, कॅल्शियम, मॅंगनीज, लोह, जस्त, तांबे या घटकांनी सेज समृद्ध असतं. त्यामुळे सेज मेंदूचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी मदत करतं.

(वाचा - रात्री झोपेतही वजन कमी करायचंय? ही पाच पेयं आहेत अतिशय प्रभावी, दिसेल फरक)

ब्लूबेरी अँथोसायनिन, अँटीऑक्सिडंट्स यांसारखे घटक असल्यानं ब्लूबेरी मेंदूसाठी फायदेशीर आहे. मेंदूचं कार्य सुरळीत आणि वेगवान राहण्यासाठी हे घटक उपयुक्त आहेत. स्मरणशक्ती वाढवण्यासाठीदेखील ब्लूबेरी फायदेशीर आहे. लिंबूवर्गीय फळं संत्री, द्राक्षे, लिंबू, यांसारख्या लिंबूवर्गीय फळांमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं. यामुळे मेंदूची वेगवान कार्य करण्याची क्षमता टिकवून ठेवण्यासाठी ही फळं फार महत्त्वाची आहेत. तणाव, चिंता, नैराश्य आणि अल्झायमरसारख्या आजारांना व्हिटॅमिन सीच्या पुरेशा सेवनाने दूर ठेवलं जाऊ शकतं. यामुळं या फळांचंदेखील सेवन करावं.

ब्रोकोली, ब्रसेल्स स्प्राउट, कोबी

कोबीवर्गातल्या या भाज्या सॅलडमध्ये वापरल्या जातात. यामध्ये अँटीऑक्सिडंट आणि व्हिटॅमिन के भरपूर प्रमाणामध्ये असतं. या पोषणतत्त्वांमुळे मेंदू तल्लख होतो. या हिरव्या भाज्यांमध्ये ग्लूकोसिनोलेट्स असतात. मेंदूला चालना देण्यासाठी, स्मरणशक्ती वाढवण्यासाठी ते कार्य करतात. व्हिटॅमिन केदेखील या भाज्यांमध्ये असल्याने याचा मेंदूला मोठा फायदा होतो. (वाचा - रोगप्रतिकारक प्रणाली कमजोर बनवणारा आहार; चुकूनही खाऊ नका हे पदार्थ)

मासे मांसाहारी असाल, तर मटणाऐवजी मासे (Fish) खाणं कधीही चांगलं. मासे खाणं एकंदरीत मानसिक आरोग्यासाठी चांगलं आहे. स्मरणशक्ती वाढण्यासदेखील खूप मदत होते. रावस, बांगडा या प्रकारच्या माशांमध्ये omega-3 fatty acids भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे मेंदू तल्लख राहतो आणि स्मरणशक्तीदेखील वाढते.
First published: