• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • Friendship Day : मित्रांचे सिक्रेट कधी उघड करू नका; मैत्रीत पाळा हे 6 नियम

Friendship Day : मित्रांचे सिक्रेट कधी उघड करू नका; मैत्रीत पाळा हे 6 नियम

अडचणीच्या काळात किंवा आनंदाच्या क्षणी सर्वात आधी आपल्याला मित्रांची आठवण येते

अडचणीच्या काळात किंवा आनंदाच्या क्षणी सर्वात आधी आपल्याला मित्रांची आठवण येते

Friendship Day-2021:कठीण काळात खरे मित्र (True Friends) आपल्याला मदत करतात. आनंदात आपल्याला मित्रांचीच आठवण येते. त्यामुंळेच दरवर्षी जगभरात ‘Friendship Day’ साजरा केला जातो.

 • Share this:
  नवी दिल्ली, 1 ऑगस्ट : मैत्री हे आयुष्यातलं सर्वात सुंदर नात (Beautiful Relation) आहे आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आपले मित्र (Friend) आपल्याला साथ देतात काळानुसार मैत्री आणखीन दृढ होत जाते. अडचणीच्या काळात किंवा आनंदाच्या क्षणी सर्वातआधी आपल्याला मित्रांची आठवण येते. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला चांगले मित्र मिळत जातात. शाळेपासून (Schooling) नोकरीपर्यंत (Job) अनेक माणसं मित्रत्वाच्या नात्याने जोडली जातात आणि त्यांच्या सोबत घालवलेले दिवस आपल्या मनात घर करून राहतात. म्हणूनच या सुंदर नात्यासाठी ‘वर्ल्ड फ्रेंडशिप डे’ (World Friendship Day) साजरा केला जातो. दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. या वर्षी 1 ऑगस्टला (1 August) हा दिवस साजरा केला जात आहे. याच निमित्ताने जाणून घेऊयात मैत्री चांगल्याप्रकारे जपण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स. बुद्धिमत्तेने निवड करा आयुष्यात भेटणाऱ्या प्रत्येक माणसाबरोबर आपली मैत्री होत नाही. काही खास माणसांबरोबर आपले ऋणानुबंध जुळतात आणि आपली त्यांच्याबरोबर मैत्री वाढायला लागते. पण, मित्रांची निवड करताना बुद्धीचा वापर करून मैत्री करावी. अडचणीच्या काळात मदत करतील आणि बुद्धीने पुढे जाण्याची प्रेरणा देतील अशाच मित्रांची निवड करा. (Maharashtra unlock: निर्बंध शिथिल होणार; लोकल, मॉल्स, थिएटर सुरू होणार?) विचार करून बोला रागात असतांना देखील मित्रांबरोबर व्यवस्थित विचार करून बोलायला हवं. कधीकधी रागाच्या भरात बोललेले शब्द आपली मैत्री तोडू शकता किंवा मित्राच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात. याशिवाय आपला अभिमान आपल्या मैत्रीमध्ये येऊ देऊ नका. एकमेकांच्या मतांचा आदर करा मित्राच्या भावनांचा आदर करायला हवा. त्याची आवड-निवड त्याच्या इच्छा आणि मतं यांचा सन्मान ठेवायला हवा. काही गोष्टींच्या बाबतीत मित्रापेक्षा आपला दृष्टिकोन वेगळा असला तरी तो दृष्टिकोन त्याच्यावर लादू नका. (VIDEO: अचानक नवरीला मारू लागला भाऊ; नवरदेवानं मंडपातच केली मेहुण्याची धुलाई) चांगल्या कामाचं कौतुक करा आपल्या मित्रांच्या चांगल्या कामाचं कौतुक करा. त्यामुळे त्यांचा उत्साह वाढेल प्रत्येक पायरीवर त्यांची साथ द्या. यामुळे तुमची मैत्री ही दृढ होईल. क्षमा करा आपल्याकडून झालेल्या चुकीची माफी मागा. चुकीच्या गोष्टीसाठी मित्रांकडे आपल्या चुकांबद्दल क्षमा वागण्यात काहीही गैर नाही.यामुळे तुमच्या नात्यात दुरावा निर्माण होणार नाहीय. (कोरोना काळात चहा ठरेल Immunity साठी फायद्याचा, सकाळी अशाप्रकारे प्या Cup of Tea!) सिक्रेट जपून ठेवा चांगले मित्र एकमेकांकडे मनातल्या भावना व्यक्त करतात. कधीकधी आपले सिक्रेट सुद्धा सांगतात. अशा वेळेस आपल्या मित्राने सांगितलेल्या काही खाजगी गोष्टी इतरांना सांगू नका. यामुळे त्यांच्यामनात तुमच्यावरचा विश्वास कमी होईल. आपले मित्र आपल्या वर विश्वास ठेवून काही गोष्टी सांगत असतील तर त्या स्वतःच्या मनात साठवून ठेवायला शिका.
  Published by:News18 Desk
  First published: