मैत्री माणसाला ठेवते आनंदी

मैत्री माणसाला ठेवते आनंदी

मिशिगन विद्यापीठाच्या एका अभ्यासानुसार वाढत्या वयासोबत माणसासाठी मित्र कुटुंबाहून जास्त महत्त्वाचे होत जातात.

  • Share this:

11 जून : मैत्री म्हणजे माणसाने कुटुंबापलिकडे बनवलेलं पहिलं आणि एकमेव नातं. माणसाला  वैयक्तिक आयुष्यात सगळ्यात महत्त्वाची अशी ही दोनच नाती . पण या दोनपैकी माणसाला जास्त महत्त्वाचं नात कुठलं? याचं उत्तर आज आपल्याला मिळालंय. मिशिगन विद्यापीठाच्या एका अभ्यासानुसार वाढत्या वयासोबत माणसासाठी मित्र कुटुंबाहून जास्त महत्त्वाचे होत जातात.

मिशिगन विद्यापीठाच्या विल्यम चॉपीकने या दोन नात्यांवर आधारित दोन सर्व्हे केले  होते. माणसाच्या आनंदी असण्यावर आणि तब्येतीवर कशाचा जास्त परिणाम होतो हे शोधणारा पहिला सर्व्हे होता .त्याच्यानुसार मैत्री आणि कुटुंब या दोन नात्यांचा आनंदावर आणि तब्येतीवर प्रभाव पडतो . पण या दोनमध्ये जास्त प्रभावशाली नातं कुठलं हे शोधायला दुसरा सर्व्हे करण्यात आला .या सर्व्हेमध्ये मात्र मैत्री जिंकलीय.या दोन्ही सर्व्हेमध्ये एकूण 2,80,000लोकांनी भाग घेतला होता.

माणसाच्या आयुष्यावर त्याच्या मित्रांचा खूप परिणाम  होत असतो. सर्व्हेनुसार जेव्हा मित्रांमुळे ताण-तणाव येतो तेव्हा लोक आजारी पडण्याचं प्रमाण जास्त असतं.आणि जेव्हा मित्रांचा आधार असतो तेव्हा माणूस जास्त आनंदी असतो.

पण मैत्री जास्त प्रभावशाली का असते? कारण मैत्री  ऐच्छिक असते.नातं टिकवायचं कुठलंही कम्पलशन मैत्रीत नसतं. तसंच वाढत्या वयासोबत माणूस त्याला आवडतात   तितक्याच मित्रांशी संबंध ठेवत असतो,असं पर्सनल रिलेशनशिप्स या मासिकातील एका लेखात म्हटलंय.

मित्र हे जगण्याला आधार असतात.म्हातारपणी सोबतीची काठी मित्र होतात. माणसाला छळणाऱ्या एकटेपणावर रामबाण इलाज म्हणजे मित्र.आणि एवढंच नाही  तर या सर्व्हेनुसार  आयुष्य निरोगी आणि जास्त जगायला मदत करणारी संजीवनी म्हणजे मैत्री.

First published: June 11, 2017, 9:12 PM IST

ताज्या बातम्या