नवी दिल्ली, 20 ऑक्टोबर : उन्हाळा असो किंवा हिवाळा आपल्या घरात फ्रिज (Fridge) ही अत्यावश्यक गरज बनली आहे. आजकाल गृहिणी स्वयंपाकघरात फ्रिजशिवाय काम करण्याची कल्पनाही करू शकत नाहीत. त्यामुळे फ्रिज प्रत्येक वेळी योग्यरित्या कार्य करत आहे की नाही याबाबत काळजी घेणं महत्त्वाचं आहे. फ्रिजची अधूनमधून साफसफाई करणं गरजेचं असतं. आजकाल फ्रिज खूप महाग आहेत, त्यामुळं तुमचा आहे तो फ्रिज जास्त काळ कसा चांगला (Fridge Long Working life) राहील याची काळजी घेणं गरजेचं आहे. फ्रिजमध्ये सहसा कॉम्प्रेसरमध्ये बिघाड, वायरिंगची समस्या किंवा कूलिंग गॅस गळतीसारख्या समस्या असतात.
या व्यतिरिक्त फ्रिज चुकीच्या पद्धतीच्या हाताळणीमुळं त्याच्या कार्यकाळावर परिणाम होतो. आज आपण फ्रिजसंबंधी होणाऱ्या काही सामान्य चुकांबद्दल जाणून घेणार आहोत. ज्यामुळे तुमचा फ्रिज लवकर खराब होण्याचा धोका टळेल. जर तुम्ही देखील या चुका करत असाल तर फ्रिजचे शेल्फ लाइफ वाढवण्यासाठी लगेच त्या (Fridge Maintenance tips) थांबवा.
1. फ्रिज लवकर खराब होण्याचे एक सामान्य कारण म्हणजे त्यात क्षमतेपेक्षा जास्त वस्तू भरून ठेवणं. आपल्याला सवयच झालेली असते की, सर्व वस्तू उचलायच्या आणि फ्रिजमध्ये ठेवायच्या. फ्रीजमध्ये उपलब्ध जागेत जास्तीत-जास्त सामान ठेवण्याचा प्रयत्न करणं चुकीचे नाही, पण वस्तू अलगदपणे ठेवता आणि काढता येतील, इतकेच साहित्य त्यात ठेवावं. म्हणजेच फ्रिज ओव्हरलोड होणार नाही याची काळजी घ्यावी.
2. बऱ्याच वेळा फ्रिजचा दरवाजा फ्रिजमध्ये ठेवलेल्या जास्त सामानामुळे किंवा आपल्या चुकीमुळे पूर्णपणे बंद करता येत नाही. अनेकदा दार बंद आहे, असे आपणास वाटते पण ते थोडेसे उघडे राहिलेले असू शकते. यामुळे फ्रिज लवकर खराब होण्याचा धोकाही वाढतो. वास्तविक, फ्रिजचा दरवाजा उघडा असल्यानं बाहेरची उष्णता फ्रिजमध्ये येते. यामुळे फ्रिजचे तापमान वाढते. फ्रिज थंड राखण्यासाठी मग कॉम्प्रेसरला अधिक ऊर्जा वापरावी लागते.
3. फ्रीजकडून वर्षानुवर्षे चांगली सेवा मिळवण्यासाठी त्याची योग्य देखभाल करणे फार महत्त्वाचे आहे. कधीकधी काही पदार्थ फ्रीजमध्ये पडतात, सांडतात. ते वेळीच व्यवस्थित साफ केले गेले नाही तर घाणीमुळे फ्रीजच्या अनेक भागांमध्ये बुरशी येऊ शकते. बुरशीमुळे नंतर आतील वस्तू तसेच दरवाजाचा भाग, शेल्फ एज आणि फ्रिजचे आतील भागही खराब होऊ शकतात. त्यामुळं आठवड्यातून किमान एकदा फ्रीज पूर्णपणे स्वच्छ करणं आवश्यक आहे.
4. हे नेहमी लक्षात ठेवा की गरम अन्न किंवा गरम दूध थेट फ्रिजमध्ये ठेवू नका. असा प्रकार वारंवार झाल्यामुळं फ्रिजच्या शेल्फ लाइफवर थेट परिणाम होतो. फ्रिजमध्ये काहीही साठवण्यापूर्वी त्याचे तापमान तपासा.
5. फ्रीज वापरताना, लक्षात ठेवा की पॉवर प्लगसाठी सॉकेट योग्य आहे का? जे फ्रिजचा भार घेऊ शकते. यासह, व्होल्टेजच्या समस्येचा सामना करण्यासाठी आवश्यक व्यवस्था देखील केली पाहिजे. यामुळे फ्रीजचे कार्य चांगले राहते.
(सूचना: या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Home remedies, Lifestyle