मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

वारंवार लघवीला जाण्याची इच्छा होणे असू शकते ओव्हरअ‍ॅक्टिव्ह ब्लॅडरचे लक्षण, करा हे घरगुती उपाय

वारंवार लघवीला जाण्याची इच्छा होणे असू शकते ओव्हरअ‍ॅक्टिव्ह ब्लॅडरचे लक्षण, करा हे घरगुती उपाय

ओव्हरअ‍ॅक्टिव्ह ब्लॅडर ही एक समस्या आहे ज्यामध्ये मूत्र नियंत्रित करणे कठीण होते. ज्यामुळे लाजीरवाणी परिस्थितीदेखील ओढवू शकते. ही समस्या टाळण्यासाठी काही नैसर्गिक उपाय तुम्हाला मदत करू शकतात.

  • Published by:  Pooja Jagtap
मुंबई, 15 ऑगस्ट : ओव्हरअ‍ॅक्टिव्ह ब्लॅडर ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये पुन्हा पुन्हा लघवी होण्याची भावना निर्माण होत असते. त्यामुळे दैनंदिन कामकाजात अडथळा येऊ शकतो. या समस्येवर काही नैसर्गिक उपाय प्रभावी ठरू शकतात. सर्वप्रथम ही समस्या कशामुळे उद्भवते हे जाणून घेणे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. किडनीय मूत्र म्हणजेच युरीन तयार करते जे नंतर मूत्राशयात म्हणजेच ब्लॅडरमध्ये जाते. लघवी करताना मूत्राशयाच्या खालच्या भागातून लघवी शरीरातून बाहेर पडते. ही संपूर्ण प्रक्रिया तंत्रिका सिग्नलद्वारे नियंत्रित केली जाते. परंतु मज्जासंस्थेच्या विकारामुळे सिग्नल विस्कळीत झाल्यास असे होऊ शकते. ओव्हरअ‍ॅक्टिव्ह ब्लॅडरची समस्या हा आजार नसून काही युरिनरी लक्षणं दर्शवितात. ओव्हरअ‍ॅक्टिव्ह ब्लॅडरची लक्षणे - स्टाइलक्रेसच्या मते, या लक्षणांमध्ये सर्वात महत्वाचे असते ते म्हणजे लघवीची अचानक तीव्र भावना निर्माण होणे, जी नियंत्रित करणे कठीण होते. - दिवसातून आठपेक्षा जास्त वेळा लघवी होणे. - रात्री लघवी करण्यासाठी वारंवार जाग येणे.

फुप्फुसांचं आरोग्य कसं सांभाळाल? या 5 सोप्या पद्धतींमुळे निरोगी राहाल!

ओव्हरअ‍ॅक्टिव्ह ब्लॅडरचे कारण - वाढत्या वयामुळे, डायबिटीजमुळे किंवा कोणत्याही संसर्गामुळे ही समस्या उद्भवू शकते. - ही समस्या गर्भधारणेदरम्यान किंवा प्रसूतीनंतर होऊ शकते. - कॅफिनचे प्रमाण जास्त असलेली औषधे घेणे. - ओव्हरअ‍ॅक्टिव्ह ब्लॅडरची समस्या बद्धकोष्ठतेमुळे होऊ शकते. किडनीला रोगांपासून दूर ठेवण्यासाठी करा घरगुती उपाय; 'हे' डिटॉक्स ड्रिंक ठरतील फायदेशीर ओव्हरअ‍ॅक्टिव्ह ब्लॅडरसाठी घरगुती उपाय - आपल्या आहारात भोपळ्याच्या बियांच्या तेलाचा दररोजचा समावेश करा. हे फायदेशीर ठरू शकते. - ओव्हरअ‍ॅक्टिव्ह ब्लॅडरची समस्या टाळण्यासाठी चायनीज हर्बल सप्लिमेंट्स घेणे फायदेशीर ठरू शकते. - रोजच्या आहारात व्हिटॅमिन डीचा समावेश करा. - अतिक्रियाशील मूत्राशयासाठी Capsaicin थेट फायदेशीर ठरू शकते. - दररोज ग्रीन टी प्या, तुम्ही स्वतःच बदल अनुभवाल. - क्रॅनबेरीच्या ज्यूस प्यायल्याने ओव्हरअ‍ॅक्टिव्ह ब्लॅडरची समस्या टाळता येते. - एक ग्लास पाण्यात एक चमचा बेकिंग सोडा टाकून प्यायल्याने ही समस्या कमी होऊ शकते. ओव्हरअ‍ॅक्टिव्ह ब्लॅडरच्या समस्येदरम्यान वारंवार लघवी होण्याची समस्या उद्भवल्यास किंवा समस्या होण्यापूर्वी नैसर्गिक उपायांचा आधार घ्या अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.
First published:

Tags: Health Tips, Lifestyle

पुढील बातम्या