मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

रात्री वारंवार लघवीला जावं लागतं? या गंभीर आजाराचं लक्षणं असू शकत, काळजी घ्या

रात्री वारंवार लघवीला जावं लागतं? या गंभीर आजाराचं लक्षणं असू शकत, काळजी घ्या

स्त्रियांमध्ये या समस्येमागची कारणं वेगळी असू शकतात तर पुरुषांमध्ये ती आणखी वेगळी असू शकतात.

स्त्रियांमध्ये या समस्येमागची कारणं वेगळी असू शकतात तर पुरुषांमध्ये ती आणखी वेगळी असू शकतात.

स्त्रियांमध्ये या समस्येमागची कारणं वेगळी असू शकतात तर पुरुषांमध्ये ती आणखी वेगळी असू शकतात.

दिल्ली, 23 नोव्हेंबर: अनेकदा काही स्त्री किंवा पुरुष वारंवार लघवीला (Toilet) जावं लागत असल्याची तक्रार करताना दिसतात. विशेषतः रात्रीच्या वेळी अनेक वेळा लघवीला जावं लागत असल्यानं झोप पूर्ण होत नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशी अस्वस्थता जाणवते. सकाळी कामावर परिणाम होतो.

महिला आणि पुरुषांमध्ये वेगवेगळी लक्षणं

सगळं दैनंदिन चक्रच बिघडून गेल्याची त्यांची तक्रार असते. तसंच या सवयीमुळे लाजिरवाणं वाटत असल्यानं बाहेर जाण्यावर मर्यादा येत असल्याची समस्या अनेकांना त्रस्त करत असते. यामागे वेगवेगळी कारणं (Reasons)असू शकतात. स्त्रियांमध्ये या समस्येमागची कारणं वेगळी असू शकतात तर पुरुषांमध्ये ती आणखी वेगळी असू शकतात. पुरुषांमध्ये रात्री वारंवार लघवीला जावं लागण्याची सवय मोठ्या प्रमाणात आढळते. या स्थितीला नॉक्चुरिया (Nocturia) असं म्हणतात. हे प्रोस्टेट कॅन्सरचं (Prostate cancer) लक्षण (Symptom) असू शकतं, त्यामुळे याकडे दुर्लक्ष करणं घातक ठरू शकतं असा तज्ज्ञांचं मत आहे. आजतकनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

पुरुषांमध्ये प्रोस्टेट कॅन्सरचं (Prostate Cancer) प्रमाण अधिक असून गेल्या काही वर्षात यात वाढ होत असल्याचं दिसत आहे. मात्र अनेकांना याची माहितीच नसते. त्यामुळे 60 टक्क्यांपेक्षा अधिक रुग्ण या गंभीर आजाराची लक्षणे समजू शकत नाहीत. तर काही पुरुष लाजेखातर याविषयी काही सांगत नाहीत. यामुळे हा आजार गंभीर स्थितीत पोहोचल्यावर लक्षात येतो आणि मग उपचार करणं अधिक कठीण होतं. यातून वाचण्याची शक्यताही कमी होते. त्यामुळे वारंवार लघवीला जावं लागत असेल तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये असं आरोग्य तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

रात्री शांत झोप येत नाही? एकदा या ट्रिक्स नक्कीच वापरुन बघा, मग पाहा कमाल

पुरुषांमध्ये प्रोस्टेट ग्लँड ही एक छोटीशी ग्रंथी मूत्रमार्गाजवळ असते. ही ग्रंथी एका तरल द्रव पदार्थाची निर्मिती करते जो स्पर्ममध्ये मिसळून सीमेन तयार करतो. प्रजनन प्रक्रियेत सीमेन महत्त्वाची भूमिका बजावते. मात्र काही वेळा प्रोस्टेट ग्लँडमध्ये (Prostate Gland) अनियंत्रितपणे पेशींची संख्या वाढू लागते. यामुळे मूत्रमार्गावर (Urine Tube) दबाव वाढतो. त्यामुळे रात्री वारंवार लघवीला जावं लागतं. तसंच प्रोस्टेट कॅन्सरवरील उपचारांत वापरल्या जाणार्‍या रेडिएशनच्या दुष्परिणामांमुळेदेखील ही लक्षणं दिसू शकतात, असं यूएस (US) नॅशनल हेल्थ सर्व्हिसनं (NHS) म्हटलं आहे.

टाइप 2 मधुमेह असलेल्यांसाठी खास डाएट प्लॅन, 15 किलोपर्यंत कमी होईल वजन

काही वेळा काही पुरुषांमध्ये मात्र या आजाराची कसलीही लक्षणं दिसत नाहीत आणि ते दीर्घकाळ या कॅन्सरसह जगू शकतात. काही पुरुषांमध्ये मात्र हा कॅन्सर मोठ्या प्रमाणात शरीरात पसरतो आणि जीवघेणा ठरतो. त्यामुळे कोणत्याही परिस्थतीत या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, अन्यथा जीवावर बेतु शकतं. त्यामुळे वारंवार लघवीला जावं लागत असेल तर ताबडतोब वैद्यकीय तपासणी करून घ्या, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

First published: