Home /News /lifestyle /

Eggs Tips: चुकूनही अंडी फ्रीजमध्ये ठेवू नका; नाहक हे त्रास मागे लागतील

Eggs Tips: चुकूनही अंडी फ्रीजमध्ये ठेवू नका; नाहक हे त्रास मागे लागतील

ब्रिटनमधील मुख्य शेफ जेम्स मार्टिन यांनी अंड्याच्या या विषयाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांनी आपला मुद्दा सिद्ध करण्यासाठी दोन अंडी घेतली. यापैकी एक बदकाचे अंडे होते आणि दुसरे कोंबडीचे...

    नवी दिल्ली, 15 जानेवारी : अंडी हा अनेकांच्या आहारातील महत्त्वाचा घटक आहे. अंडी (Eggs) खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. आपण कधीही बाजारातून अंडी आणतो, ही अंडी उकडण्यापूर्वी (Boil the eggs) कधीही फ्रीजमध्ये ठेवू नयेत, असे सांगितले जाते. अनेकांना या विषयी माहीत नसतं की, अंड्याच्याबाबतीत असं का सांगितलं जातं आणि अंडी फ्रीजमध्ये (Eggs in Freeze) ठेवल्यास नेमका काय त्रास होतो. अंडी कधीही फ्रीजमध्ये ठेवू नयेत झी न्यूज आणि डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, ब्रिटनमधील मुख्य शेफ जेम्स मार्टिन यांनी अंड्याच्या या विषयाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांनी आपला मुद्दा सिद्ध करण्यासाठी दोन अंडी घेतली. यापैकी एक बदकाचे अंडे होते आणि दुसरे कोंबडीचे. बदकांची अंडी फ्रीजमध्ये न ठेवता थेट उकडली, तर कोंबडीची अंडी फ्रीजमध्ये 2 ते 3 तास ​​ठेवल्यानंतर उकडली. हे वाचा - ऑफिसमध्ये डुलक्या म्हणजे नोकरीवर संक्रात; झोप घालवण्यासाठी या सोप्या टिप्स वापरा कोंबडीची अंडी वाहू लागली जेम्स मार्टिन यांनी बदकाचे उकडलेले अंडे नंतर कापले तेव्हा ते योग्य प्रकारे तयार झाले होते. तर कोंबडीची अंडी कापली तर ती वाहू गेली. दोन्हींच्या चव आणि फ्लेवरमध्येही मोठा फरक होता. त्यानंतर जेम्सने याबाबतचे कारण सांगितले ज्यामुळे दोन अंड्यांमध्ये हा फरक दिसला. हे वाचा - फोन कॉलवरून असा चोरी होऊ शकतो तुमचा OTP; गृह मंत्रालयाच्या Cyber Dost ने पुन्हा केलं अलर्ट अंडी इतर गोष्टींचा फ्लेवर शोषतात जेम्सच्या म्हणण्यानुसार, जेव्हाही आपण अंडी फ्रीजमध्ये ठेवतो तेव्हा ती फ्रीजमध्ये ठेवलेल्या इतर वस्तूंचा वास आणि फ्लेवर शोषून घेतात. यामुळे त्यांच्यातील नैसर्गिक चव आणि फ्लेवर नाहीसा होतो. त्यामुळेच अंडी फ्रीजमध्ये चुकूनही ठेवू नका. त्याऐवजी, कोरड्या आणि थंड ठिकाणी अंडी साठवण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून त्यांच्यातील नैसर्गिक चव टिकून राहते.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health, Health Tips

    पुढील बातम्या