मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

मोतीबिंदूसाठी देशव्यापी मोहीम; दीड कोटी लोकांची मोफत शस्त्रक्रिया करण्याचे मोदी सरकारचे नियोजन

मोतीबिंदूसाठी देशव्यापी मोहीम; दीड कोटी लोकांची मोफत शस्त्रक्रिया करण्याचे मोदी सरकारचे नियोजन

देशातील सुमारे दीड कोटी लोकांना मोतीबिंदूचे ऑपरेशन करणे अनिवार्य झाले आहे. हे लोक दोन वर्षांपासून कोरोनामुळे मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेत आहेत.

देशातील सुमारे दीड कोटी लोकांना मोतीबिंदूचे ऑपरेशन करणे अनिवार्य झाले आहे. हे लोक दोन वर्षांपासून कोरोनामुळे मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेत आहेत.

देशातील सुमारे दीड कोटी लोकांना मोतीबिंदूचे ऑपरेशन करणे अनिवार्य झाले आहे. हे लोक दोन वर्षांपासून कोरोनामुळे मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेत आहेत.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 31 मे : कोरोनाच्या काळात मोतीबिंदू शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेत असलेल्या करोडो रुग्णांना मोदी सरकार (Modi Government) मोठा दिलासा देणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या सुमारे दीड कोटी गरीबांचे मोदी सरकार आता मोतीबिंदूचे ऑपरेशन (Free Cataract Operations) मोफत करणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय जूनच्या पहिल्या आठवड्यापासून देशाच्या प्रत्येक भागातील लोकांना ही सुविधा पुरवणार आहे. यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया (Mansukh Mandaviya) यांनी देशातील सर्व छोट्या-मोठ्या सरकारी रुग्णालयांपासून खासगी रुग्णालयांना सज्ज राहण्यास सांगितले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, 'कोरोनामुळे सुमारे 1.5 कोटी मोतीबिंदू रुग्णांवर अद्याप शस्त्रक्रिया झालेली नाही. त्यामुळे येत्या दोन-तीन वर्षांत सुमारे 3 कोटी लोकांच्या डोळ्यांच्या शस्त्रक्रिया होणार आहेत.

देशातील सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये दरवर्षी 50 ते 60 लाख मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया करण्यात येतात, परंतु मार्च 2020 मध्ये कोरोना महामारीनंतर हे ऑपरेशन्स जवळपास थांबले होते. याचाच परिणाम असा झाला की, आता देशातील सुमारे दीड कोटी लोकांना मोतीबिंदूचे ऑपरेशन करणे अनिवार्य झाले आहे. हे लोक दोन वर्षांपासून मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेत आहेत. आता जेव्हा कोरोनाच्या बाबतीत लक्षणीय घट झाली आहे आणि देशात लसीकरण मोहीमही यशस्वी झाली आहे, तेव्हा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या पुढाकाराने ही मोहीम सुरू करण्यात येणार आहे.

जूनपासून मोतीबिंदूविरोधातील देशव्यापी मोहीम सुरू होणार -

गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय आरोग्य मंत्रालय राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सहकार्याने विशेष मोहिमेची रूपरेषा तयार करत आहे. आरोग्य मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये यासाठी विशेष व्यवस्था करण्यात येत आहे. याअंतर्गत केंद्र सरकार राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सरकारांना मदत पुरवणार आहे.

हे वाचा - उन्हाळ्याच्या दिवसातही शरीरात राहील भरपूर ताकद; ही 5 होममेड ड्रिंक्स घ्या

या लोकांवर खाजगी रुग्णालयात मोफत उपचारही -

आयुष्मान भारत योजनेच्या लाभार्थी यादीत समाविष्ट असलेल्या रुग्णांवर खाजगी रुग्णालयातही मोफत शस्त्रक्रिया केली जाईल. आरोग्य मंत्रालयाचा दावा आहे की, येत्या दोन-तीन वर्षांत 2.50 कोटी लोकांची मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करायची आहे.

हे वाचा - कोरफडीपासून घरीच तयार करा असा शॅम्पू; केस होतील शायनी, मिळेल नॅचरल ग्लो

डोळ्यांच्या गंभीर आजारांपैकी एक असलेल्या मोतीबिंदूवर वेळीच शस्त्रक्रिया न केल्यास दृष्टी नष्ट होण्याचा धोका असतो. सामान्यतः लोकांना हा आजार 40 वर्षांनंतर होतो. मात्र, आता हा आजार लहान मुलांमध्येही दिसू लागला आहे. परंतु, हा आजार वयानुसार अधिक वाढत जातो. यासोबतच मधुमेह, अतिमद्यपान, अनुवांशिक कारणे, सूर्यप्रकाशात जास्त संपर्क, उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसह अति धुम्रपानाची सवय यामुळे हा आजार होतो.

First published:

Tags: Health, Modi government