Home /News /lifestyle /

अविवाहित तरुणांनो सावधान! लग्नाच्या नावानं लुटतायेत महिला

अविवाहित तरुणांनो सावधान! लग्नाच्या नावानं लुटतायेत महिला

आपल्या मुलीच्या लग्नात, नवरामुलगाच पळून गेल्याच समजताचं, वधूकडील मंडळींकडे परिस्थिती गंभीर झाली होती, आपल्या मुलीचं लग्न मोडल्याचं त्यांना अतिशय दु:ख झालं.

आपल्या मुलीच्या लग्नात, नवरामुलगाच पळून गेल्याच समजताचं, वधूकडील मंडळींकडे परिस्थिती गंभीर झाली होती, आपल्या मुलीचं लग्न मोडल्याचं त्यांना अतिशय दु:ख झालं.

कोरोना लॉकडाऊनमध्ये लग्न उरकायचं आहे, म्हणून एखाद्या मुलीचा फक्त फोनवर फोटो पाहून तिच्याशी लग्न करण्याची घाई करत असाल तर ही लगीनघाई तुम्हाला संकाटात टाकेल.

    लखनऊ, 22 डिसेंबर : आपल्यापैकी बऱ्याच जणांनी 'दावत ए इश्क' ही फिल्म पाहिली असावी. अगदी तशीच नाही मात्र तशाच पद्धतीनं रिअल लाइफमध्येही अविवाहित तरुणांची (single boy) फसवणूक होते आहे. कोरोना लॉकडाऊनमध्ये लग्नाच्या (wedding) नावानं लुटणारी गँग सक्रीय झाली आहे. या गँगमध्ये महिलांची समावेश आहे. लग्नासाठी (marriage) इच्छुक असलेल्या अविवाहित तरुणांना आपल्या जाळ्यात अडकवलं जातं आहे. लग्नाच्या नावानं अविवाहित तरुणांना लग्नाच्या नावानं फसवल्याच्या दोन घटना समोर आल्या आहेत. यातील एक तरुण जाळ्यात अडकला तर दुसरा जाळ्यात अडकता अडकता वाचला. ही गँग नेमकी कशी फसवणूक करते याबाबत या तरुणांनी आपला अनुभव मांडला आहे. उत्तर प्रदेशत्या मथुरामध्ये राहणारे दीपक सिंहनं न्यूज 18 ला ही सर्व घटना सांगितली आहे. दीपक स्वत:ची कार टॅक्सी म्हणून चालवतो. दोन महिन्यांपूर्वी तो काही प्रवाशांना घेऊन जात होता, तेव्हा त्याला रस्त्यात एक टॅक्सी ड्रायव्हर भेटला. त्याच्याशी दीपकचं बोलणं झालं. बोलण्याबोलण्यात दीपकचं लग्न झालं नसल्याचं समजलं आणि त्या टॅक्सी ड्रायव्हरनं त्याला लग्नाबाबत विचारणा केली. दीपकनं लग्नासाठी इच्छुक असल्याचं सांगितलं. तेव्हा त्या टॅक्सी ड्रायव्हरनं आपल्या नातेवाईकाची मुलगी म्हणून आपल्या फोनमधील एका मुलीचा फोटो दीपकला दाखवला. दीपकला मुलगी आवडली त्यानंतर ड्रायव्हरनं त्याला एक फोन नंबर दिला आणि त्यावर संपर्क करायला सांगितलं. दीपकनं त्या नंबरवर फोन केला. एका मुलीनंच फोन उचलला आणि आपले वडील आजारी असल्याचं तिनं सांगितलं. दीपक आणि त्या मुलीचं बरेच दिवस बोलणं सुरू होतं. त्यांची लग्नापर्यंतची बोलणी झाली. आठवडाभरात मुलीच्या वडिलांनी प्रत्यक्ष भेटीचा कार्यक्रम ठरवला. दीपकनं आपल्या घरी मूलीचा फोटो दाखवला. त्याचं कुटुंबही लग्नासाठी तयार झालं. प्रत्यक्ष भेट व्हायच्या दोन दिवसआधीच त्या मुलीचा दीपकला फोन आला आणि तिनं आपल्या वडिलांची तब्येत अचानक खराब झाली आहे, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, डिस्चार्जसाठी पैसे हवेत असं कारण देऊन त्याच्याकडे आठ हजार रुपयांची मदत मागितली हे वाचा - फेसबुकवर जुळलं प्रेम; लग्नाच्या 3 वर्षांनंतर तरुणाचा धक्कादायक प्रताप आला समोर दीपकनं आता लगेच देण्यासाठी आपल्याकडे आठ हजार रुपये नाहीत असं सांगितलं आणि आपल्या मोठ्या भावाला याबाबत सांगितलं. त्याच्या भावानं पैसे देऊ नको असा सल्ला दिला आणि ते मुलीनं सांगितलेल्या गावात तिचा पत्ता शोधत गेले. मात्र त्या गावात त्या नावाचं कोणतंच कुटुंब नव्हतं. प्रत्यक्ष भेटेपर्यंत आपण पैसे देणार नसल्याचं दीपकनं सांगितलं आणि त्यानंतर त्या मुलीनंही आपला फोन नंबर बंद केला. दीपकच्या नातेवाईकांपर्यंत ही बाब पोहोचली आणि त्याच्या एका नातेवाईकासोबतही असंच काहीसं घडल्याचं समोर आलं. दीपकचा नातेवाईक असलेला प्रवेश. एका खासगी कंपनीत काम करत होता. लॉकडाऊनमध्ये त्याचं काम बंद झालं आणि तो आपल्या घरी परतत होता. दिल्ली-आग्रा हायवेवर त्याला एक व्यक्ती भेटली. या व्यक्तीशी प्रवेशचं बोलणं झालं आणि त्याने प्रवेशला लग्नाबाबत विचारणा केली. मुलीचा फोटो दाखवला आणि तिचा फोन नंबर दिला. प्रवेशनं त्या मुलीला फोन केला तेव्हा ती खूप गरीब असल्याची आणि तिचे वडील नसल्याचं समजलं. तिच्याच खर्चावर ती घर चालवते असं तिनं सांगितलं. लग्नासाठी ती तयार झाली आणि त्यांनी एका ठिकाणी भेटायचं ठरवलं. हे वाचा - US मधील बायकोच्या मदतीने चालवत होता ऑनलाइन चाइल्ड पॉर्न रॅकेट, CBI ने केली अटक प्रवेशनं आपल्या घरच्यांनाही याबाबत सांगितलं आणि मुलगी पाहण्याचा कार्यक्रम ठरला. याचदरम्यान त्या मुलीनं प्रवेशला फोन केला आणि आपल्याकडे चांगले कपडे नाहीत, आईच्या औषधासाठी पैसे नाही असं कारण सांगत आपल्या बँक अकाऊंटमध्ये पैसे ट्रान्सफर करायला सांगितलं. प्रवेशनं तिला चार हजार रुपये पाठवले. त्यानंतर मुलीनं आणखी पैसे मागितले प्रवेशनं आणखी दोन हजार रुपये पाठवले. प्रवेशनं आपल्या जवळच्या व्यक्तींना याबाबत सांगितलं आणि आपली फसवणूक होत असल्याचा संशय त्याला आला. त्यानं पोलीस ठाण्यात तक्रार देत त्या मुलीचा नंबर दिला. ती एक तरुणी नव्हे तर महिला होती, जिला मुलं होती. प्रवेशनं आपल्या मर्जीनं पैसे दिल्यानं त्या महिलेविरोधात कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे तुम्ही सावध राहा. असा मोबाईलवर फोटो पाहून तुम्ही लगीनघाई करत असाल तर संकटात सापडाल.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Lifestyle, Marriage, Wedding

    पुढील बातम्या