Zomato वरून ऑनलाइन खाणं ऑर्डर करणं साक्षीला पडलं महाग, 80000 चा गंडा!!

Zomato वरून ऑनलाइन खाणं ऑर्डर करणं साक्षीला पडलं महाग, 80000 चा गंडा!!

Zomato वरून ऑर्डर करताना तिने PayTm ने पैसे भरले. खाणं चांगलं नाही म्हणून परत करण्यासाठी कस्टमर केअरला फोन लावला आणि.... एक चूक तिला 80000 ला पडली.

  • Share this:

मुंबई, 27 जुलै : रोजच्या जेवणाने कंटाळलात? किंवा रोज तेच ते जेवून कंटाळा आला असेल. मग नक्कीच ऑनलाइन काहीतरी ऑर्डर करणार असाल... पण ऑनलाईन खाणं ऑर्डर करताना सावनधान! ऑनलाइन खाणं ऑर्डर करणं तुम्हाला पडू शकतं महाग. फूड ऑर्डरिंग अ‍ॅपवरून खाणं ऑर्डर करत असाल तर वेळीच सावध व्हा. कारण, सायबर हॅकर तुमच्यावर लक्ष ठेऊन आहेत. अशाच एका हॅकरने ऑनलाईन फूड ऑर्डर करताना अकाउंट हॅक करून 80000 रुपयांचा गंडा घातला आहे.  नुकतीच अशी एक धक्कादायक घटना घडली.

हरियाणाच्या रोहतक शहरात ही फसवणुकीची घटना घडली आहे. तिथल्या एम.डी. विद्यापीठात एम.ए. चं शिक्षण घेणाऱ्या साक्षीने ऑनलाईन ऑर्डर केली. तिने Zomato या मोबाईल अॅपवरून खाणं ऑर्डर केलं. पण  ऑनलाइन खाणं ऑर्डर करणं साक्षीला चांगलचं महाग पडलं असून आता मात्र तिला पोलीस चौकीच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत. अवघ्या काही मिनिटांमध्ये तिच्या अकाउंटमधून 80000 रुपये गायब झाले.

स्मार्टफोनचं चार्जिंग संपतय? बॅटरी टिकवण्यासाठी वापरा 'या' टिप्स

झालेल्या प्रकाराबाबत माहिती देत असताना साक्षीने सांगितले की, फूड डिलीवरी अ‍ॅप झोमॅटो यावरून तिने खाणं ऑनलाइन ऑर्डर केलं. अशा अ‍ॅपवरून खाणं मागवल्यावर तुम्ही पैसे डिलीव्हरी बॉयला देऊ शकता किंवा ऑनलाइनसुद्धा भरू शकता. आजकल अनेक जण ऑनलाइन पैसे भरण्यास पसंती देतात. साक्षीनेही अगदी तसंच केलं. Paytm या अ‍ॅपद्वारे 190 रुपये तिने भरले. अर्ध्या तासातच डिलीव्हरी बॉयने ऑर्डर पोहोचवली. मात्र, खाणं उघडून पाहिल्यावर ते चांगलं नसल्याचं तिच्या लक्षात आलं. तात्काळ डिलीव्हरी बॉयला फोन लावून ते परत घेण्यास सांगितलं खरं पण, त्याने ते परत नेण्यास नकार दिला आणि कस्टमर केअरला याविषयी माहिती देण्यास सांगितले.

कस्टमर केअरला केला फोन

गुगलवरून साक्षीने झोमॅटोच्या कस्टमर केअरचा नंबर मिळवला आणि खाण्याविषयी तक्रार नोंदवली. पण, ही तक्रार करताना तिच्याबरोबर एक धक्कादायक प्रकार घडला.

फोनवर गुंतवून ठेवलं आणि...

फोनवर तक्रार घेणाऱ्या व्यक्तीने तो स्वतः अधिकारी असल्याचं सांगितलं. त्याने आपल्या बोलण्यात साक्षीला गुंतवून ठेवलं आणि तिच्या बॅंक खात्याची सर्व माहिती घेतली. विशेषतः त्याने बॅंकेत रजिस्टर्ड असलेला मोबाइल नंबर आणि ATM कार्डाच्या शेवटच्या 6 आकड्यांची माहिती घेतली. तुमच्या खात्यात लवकरच पैसे जमा होतील अशी माहिती फोनवर बोलत असलेल्या कथित अधिकाऱ्याने दिली.

झोमॅटोच्या कस्टमर केअरचा अधिकारी असल्याची बतावणी करणाऱ्या त्या व्यक्तीने पैसे रिफंड होत आहेत त्यामुळे फोन चालू ठेवण्यास सांगितला. यावर विश्वास ठेवत सांगितल्याप्रमाणे तिने फोन चालूच ठेवला. मात्र, लगेचच तिला एका मागोमाग एक बॅंक खात्याच्या ट्रानझॅक्शनचे मेसेज येण्यास सुरुवात झाली. काही मिनीटांतच तिच्या खात्यातील 80 हजार रुपये गेले.

Amazonवर 9 लाखांचा कॅमेरा 6 हजार 500 रुपयांत, लोक म्हणाले 'थँक्यू बेजोस'

एकूण 14 ट्रान्झॅक्शन होऊन खातं रिकामं झालं आणि सुरू असलेला फोन डिस्कनेक्ट झाला. झालेला प्रकार लक्षात आल्यावर तिने बॅंकेमध्ये फोन केला आणि ATM कार्ड ब्लॉक करण्यास सांगितलं. त्यानंतर तिने या घटनेची तक्रार पोलिसांकडे नोंदवली.

आमचं काही घेणं देणं नाही- झोमॅटो

साक्षीने नजिकच्या झोमॅटो ऑफिसमध्ये जाऊन घडलेला प्रकार सांगितला. मात्र, वादविवादापलीकडे काहीच उत्तर मिळालं नाही. या फसवणुकीशी झोमॅटोचा काही संबंध नसल्याचं झोमॅटोतर्फे सांगण्यात आलं. गुगलवरून सर्च केलेला कस्टमर केअरचा नंबर हा खोटा होता. याविषयी झोमॅटोने त्यांच्या हेडऑफिसमध्ये याची माहिती दिली आहे.

पोलिसांकडून तपास सुरू

घडलेल्या प्रकारानंतर रोहतक पोलिसांनी तपास सुरू केला असून पडद्याआड असणाऱ्या सायबर चोरांना शोधण्याची मोहिम काढली आहे. पीजीआयएमएस  पोलीस ठाण्याचे SSO अनिल कुमार यावर विशेष लक्ष देत आहेत आणि या सायबर हॅकरला लवकरात लवकर पकडण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

-------------------------------------------------------

थरारक 'ऑपरेशन महालक्ष्मी'चा संपूर्ण GROUND ZERO रिपोर्ट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 27, 2019 03:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading