मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

फक्त हा सुगंध घ्या, वाढलेल्या वजनाचं टेन्शन खतम!

फक्त हा सुगंध घ्या, वाढलेल्या वजनाचं टेन्शन खतम!

संत्री आणि लिंबामध्ये सायट्रीक ऍसिड असतं. त्यामुळे फ्रिजमध्ये टिकत नाहीत. त्यातील रसही कमी होतो.

संत्री आणि लिंबामध्ये सायट्रीक ऍसिड असतं. त्यामुळे फ्रिजमध्ये टिकत नाहीत. त्यातील रसही कमी होतो.

विविध सुगंध गेतल्यावर मनात येणाऱ्या विविध बऱ्यावाईट भावना आपण अनुभवतो. आता संशोधनानंही सुगंध महत्त्वाचे असल्याचं सांगितलं आहे.

  • Published by:  News18 Desk

लंडन, 19 डिसेंबर : दिवसभरात आपण कळत नकळत अनेक सुगंध (fragrances) घेत असतो. काही सुगंध आपले मन प्रसन्न करतात, तर काही तोंडाला पाणी आणतात. आता समोर आलेलं एक नवं संशोधन (research) सुगंधाची आगळीच महती सांगतं.

लिंबाचा (lemon) सुगंध तुम्हाला शरीराविषयी सकारात्मक वाटायला लावतो, तर व्हॅनिलाचा (vanilla) सुगंध तुम्हाला अधिकच जाड फील करवतो. आहे ना इंटरेस्टिंग?

इंग्लंडच्या ससेक्स युनिवर्सिटीतील काही संशोधकांनी हा रंजक रिसर्च समोर आणला आहे. संशोधकांच्या टीममधली एक असलेली PhD स्कॉलर गियाडा ब्रियांजा सांगते, की आमच्या संशोधनात समोर आल्यानुसार, सुगंधात असलेली ताकद आपली शरीराबद्दलची भावना बदलू शकते. गोष्टींना अनुभवण्याची पद्धतीवरही सुगंध प्रभाव टाकतात. त्या-त्या वेळी असलेली भावनिक स्ठितीही यातून बदलते.

सुगंध असतो थेरपीसारखा

गियाडा म्हणते, की तंत्रज्ञानासह कपड्यांच्या धाग्यात सुगंध टाकून बॉडी परसेप्शन डिसॉर्डरवर उपचार केली जाऊ शकतो. अनेक लोक त्यांच्या शरीराबाबत नकारात्मक भावना बाळगतात. विशेषत: जास्त वजन असलेल्या व्यक्तींमध्ये हे दिसून येतं. त्यांच्यावर ही थेरपी उपयोगी ठरू शकते.

याशिवायही लिंबाचे फायदे आहेतच. लिंबू पाणी पिल्यानं शरीरातली 'विटॅमिन सी'ची कमतरता भरून निघते. सोबतच त्वचेवरच्या सुरकुत्या कमी होतात. अकाली वृद्धत्व रोखण्यास मदत होते. लिंबू पाणी पिल्याने रोगप्रतिकारक क्षमता वाढते. लिंबातील अ‍ॅंन्टीऑक्सिडन्ट्स हाडं, यकृत, स्तन, कोलन आणि पोटांच्या कर्करोगापासून बचाव करतात. शिवाय लिंबात असणारं एक विशिष्ट रसायन मेंदूतल्या कोशिकांना विषारी रसायनांपासून दूर ठेवतं.

सुगंधाचाच वापर करून विविध शारिरीक-मानसिक समस्यांना बरी करणारी एरोमाथेरपीही जुन्या काळापासून जगभर प्रचलित आणि लोकप्रिय आहे.

First published:

Tags: London, Research