मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

ऐकावं ते नवलच; देवी नाही प्लेग नाही या देशात पसरली होती नाचण्याची साथ

ऐकावं ते नवलच; देवी नाही प्लेग नाही या देशात पसरली होती नाचण्याची साथ

December 1994, Sipadan, Borneo --- School of Neon Fusiliers --- Image by © Royalty-Free/Corbis

December 1994, Sipadan, Borneo --- School of Neon Fusiliers --- Image by © Royalty-Free/Corbis

सोळाव्या शतकामध्ये फ्रान्समध्ये (France) एक अजबच साथ पसरली होती. यात लोकं नुसते नाचतच सुटायचे. सतत नाचत राहिल्याने काही दिवसांनी हार्टअटॅक किंवा स्ट्रोकमुळे त्यांचा मृत्यू व्हायचा.

पॅरिस, 16 डिसेंबर: आपल्या देशात पूर्वीच्या काळी प्लेग, देवी, मलेरिया यांच्या साथी येत असत, हजारो लोक उपचाराविना मरण पावत असत, अशा गोष्टी आपण ऐकल्या आहेत. सध्या जगभरात पसरलेल्या कोरोनाच्या साथीमुळं पुन्हा तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. अशाच एका विचित्र साथीबद्दल सध्या चर्चा सुरू आहे. आजही या विचित्र आजाराच्या साथीचं कारण काय हे गूढच आहे. ही साथ आली तशी गेली. काय होती ही साथ हे आपण या बातमीतून जाणून घेणार आहोत. फ्रान्समध्ये (France) साधारण 500 वर्षापूर्वी ही विचित्र साथ आली होती. यामध्ये लोक नाचतच सुटायचे.इतके नाचायचे की त्यांचा जीव जायचा. कोणालाही याचे कारण कळले नाही. सुरुवातीला वाटले की लोक आनंद साजरा करण्यासाठी नाचत आहेत, त्यामुळं बघणारे लोकही नाचणाऱ्या लोकांना प्रोत्साहन द्यायचे; पण नाचणारे लोक थांबायचे नावच घ्यायचे नाहीत. सकाळी नाचायला सुरुवात केलेले लोक रात्री थकून खाली पडायचे, पण सकाळी जाग आली की पुन्हा उठून ते नाचायला लागायचे. अखेर अनेकजण हृदयविकाराच्या झटक्यानं, स्ट्रोकने किंवा अती थकल्यानं मृत्यूमुखी पडायचे. या विचित्र साथीची सुरुवात झाली 14 जुलै 1518 रोजी फ्रान्स मधल्या स्ट्रासबर्ग (Strasberg)शहरात. फ्रॉ त्रोफे नावाची महिला अचानक रस्त्यावर नाच (Dance) करत सुटली. सुरुवातीला लोकांनीही तिला प्रोत्साहन दिलं पण ती काही थांबायचे नाव घेईना. सलग सहा दिवस ती नाचतच राहिली. दररोज रात्री थकून ती झोपी जायची. तिचे पाय रक्तानं माखलेले असायचे; पण सकाळी उठून ती पुन्हा नाचायला लागायची. सुरुवातीला स्ट्रासबर्ग शहराच्या प्रशासनातील दोन अधिकाऱ्यांनी तर या नाचणाऱ्या लोकांसाठी एक मोठं स्टेज उभारलं आणि संगीतकारांनाही बोलावलं. त्यांना वाटलं की लोकांचं हे नाचण्याचं वेड हळूहळू कमी होईल; पण झालं उलटंच. आणखी मोठ्या संख्येनं लोक यात सहभागी होऊ लागले आणि नाचता, नाचता मरणाला कवटाळू लागले. एका आठवड्यात 34 लोक नाचायला लागले होते. हळूहळू लोकांची संख्या वाढत गेली. एका महिन्यात 400 लोक या नाचण्याच्या लाटेत सापडले. वेड्यासारखे लोक नाचत होते. नृत्य करण्यानं रोज दहा ते पंधरा लोक हृदयविकाराच्या झटक्यानं, स्ट्रोकने किंवा अती थकल्यानं मरण पावत असत. हा प्रकार काहीतरी अतर्क्य आहे, हे लक्षात आल्यावर त्यावर उपाय शोधण्याचे प्रयत्न सुरू झाले. वेगवेगळया तर्कांना उधाण आले होते. एक तर्क असा होता की, हे सगळे लोक एका नृत्य समूहाचे सदस्य होते. त्यांनी एरगॉट नावाच्या एका बुरशीचे सेवन केले होते, ज्यामुळे त्यांची शुद्ध हरपत असे. एलएसडी (LSD) या मादक पदार्थात ही बुरशी आढळते. तर आधुनिक वैद्यक शास्त्रात याला मानसिक आजार मानले जाते. ज्यामध्ये माणसे विचित्र वागायला लागतात. 16 व्या शतकात अशी नाचण्याची साथ पसरवण्याचा एक कॅथॉलिक संत शाप देऊ शकत असे, अशी दंतकथा होती. 1518 मध्ये स्ट्रासबर्ग शहरात दुष्काळ आणि आजारांनी थैमान घातलं होतं. त्याचा ताण आणि अंधश्रद्धा यातून असे वेड उफाळून आले असावे आणि लोकांवर त्याचं गारुड पसरत असावं, असं मत जॉन वॉलर (John Waller) या इतिहासकारानं व्यक्त केलं होतं. शेवटपर्यंत या विचित्र साथीचं रहस्य उलगडलं नाही. आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाचण्याची साथीची पुन्हा चर्चा व्हायला लागली आहे.
First published:

Tags: Coronavirus, France

पुढील बातम्या