Home /News /lifestyle /

Lockdown चा सदुपयोग करत 4 बहिणींनी बनवला बोर्ड गेम, या कारणाने लगेच झाला हिट

Lockdown चा सदुपयोग करत 4 बहिणींनी बनवला बोर्ड गेम, या कारणाने लगेच झाला हिट

निवांत मिळालेला वेळ आपल्यापैकी अनेकजण टाइमपास करण्यात घालवतात. या चौघीजणींनी मात्र तो वेळ कसा घालवावा याचा आदर्श घालून दिला आहे.

    बर्लिन, 1 जानेवारी: लॉकडाऊन (Lockdown) लागलं तेव्हा जगभरातील लोकांनी आपापल्या पद्धतीनं हा काळ घालवला. काही लोकांनी छंद जोपासले तर काहींनी ऑनलाईन नवे कोर्स केले. जर्मनीतल्या चार बहिणींनी (four sisters in Germany) मात्र या काळात एक गेम (game) बनवत मस्त पैसेही कमावले. लॉकडाऊन लागला तसं सुरवातीच्या काळातच या बहिणींनी कोरोनाची (corona) थीम घेत बोर्ड गेम (board game)  बनवला. त्यांचं खूप कौतुक होतं आहे. या बहिणींची नावं आहेत रेबेका, लारा, स्टेला आणि सारा श्वाल्डरलॅप. या बहिणींनी निवांतपणाचे मिळालेले क्षण मोठ्या हुशारीनं योग्य नियोजन करत सत्कारणी लावले. चार लोक मिळून हा गेम खेळू शकतात. या गेम्सला जर्मनीच्या सिनियर सिटिझन्सनीही खूप पसंती दिली. हा गेम खेळणारे प्लेयर्स गेम कार्ड्स एकत्र करून त्यांची वाटणी करतात. हा गेम बनवणाऱ्या सारानं सांगितलं, की गेम बनवण्यामागचा हेतू एकीला बळ देणं हा आहे. यामुळेच हा खेळ अनेकांना आवडतो आहे. या गेमच्या प्रत्येक वळणावर कोरोनावायरस तुमचा रस्ता अडवतो. मात्र प्रत्येक खेळाडू दुसऱ्याच्या मदतीनं रस्त्यात येणाऱ्या अडथळ्याला हटवण्यात यशस्वी होतो. सारा सांगते, की लॉकडाउनच्या काळात या चारही बहिणींनी आपला बहुतांश काळ हा गेम डिजाईन करण्यात घालवला. त्यांची ही जिद्द पाहून त्यांचे वडील भारावून गेले. त्यांनी लगोलग एका कमर्शियल आर्टिस्टला फीस देऊन बोलावत या मुलींची मदत करण्याची विनंती केली. या आर्टिस्टनं कार्ड, बोर्ड आणि बॉक्स या सगळ्याचं छान डिजाईन बनवून दिलं. आजवर या बहिणींनी या गेमच्या 2000 कॉपीज विकल्या आहेत. जर्मनीत सगळीकडे या गेमला मोठी मागणी आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Coronavirus, Lockdown

    पुढील बातम्या