Home /News /lifestyle /

ZOO मध्ये घुसला कोरोना; 3 मादींसह जंगलाच्या राजाला घातला विळखा

ZOO मध्ये घुसला कोरोना; 3 मादींसह जंगलाच्या राजाला घातला विळखा

माणसांमध्ये पसरणाऱ्या कोरोनाचा (coronavirus) प्राण्यांना कितपत धोका आहे, याबाबत अद्यापही संशोधन सुरू आहे. त्यात ही मोठी बातमी समोर आली आहे.

    माद्रिद, 09 डिसेंबर : कोरोनाव्हायरस (coronavirus) हा प्राण्यांमधून (animal) माणसांमध्ये आल्याचं सांगितलं जातं आहे. माणसांमार्फत माणसांमध्येही तो पसरतो आहे. माणसांमार्फत प्राण्यांना या व्हायरसची लागण होण्याचा धोका किती आहे, याबाबत अभ्यास सुरू आहे. मात्र अशी काही प्रकरणं समोर आली आहे, ज्यामध्ये प्राणीही कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. नुकतंच स्पेनच्या प्राणीसंग्रहालयातील (spain zoo) चार सिंहांना कोरोनाव्हायरसची (spain lion corona positive) लागण झाल्याचं समोर आलं आहे. स्पेनच्या (spain) बार्सिलोना शहरातील एका प्राणीसंग्रहालयात चार सिंहांना कोरोनाव्हायरसची लागण झाली आहे.  जाला, नीमा आणि रन नाम या तीन सिंहिणी आणि कियुंबे या सिंहाला कोरोना झाला आहे. या चौघांमध्येही कोरोनाची सौम्य लक्षणं दिसून आली. त्यानंतर त्यांची कोरोना स्वॅब टेस्ट करण्यात आली. ही तिच कोरोना टेस्ट आहे, जी माणसांवर केली जाते. या टेस्टमध्ये चारही सिंह कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं निदान झालं. हे वाचा - रणजितसिंह डिसले गुरुजी Corona पॉझिटिव्ह; मुख्यमंत्र्यांची घेतली होती भेट प्राणीसंग्रहालयात कोरोना नेमका आला कुठून, या सिंहांना कोरोनाची लागण झाली तरी कशी याचा तपास करण्यात येतो आहे. प्राणीसंग्रहालयातील एखाद्या कर्मचाऱ्याला कोरोना असावा आणि त्याच्यामध्ये कोरोनाची लक्षणं नसावीत, अशा कर्मचाऱ्याच्या संपर्कात हे सिंह आले असावेत, अशी शक्यता वर्तवली जात आहे. प्राणीसंग्रहालयातील दोन कर्मचारीही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलं आहे. या सिंहाना अँटिइन्फ्लेमेटरी औषधं देण्यात आली असून त्यांच्यावर देखरेख ठेवली जाते आहे. फ्लूच्या वेळी जशी देखभाल केली जाते, तशीच देखभाल त्यांची केली जाते आहे. उपचारांना ते योग्यरित्या प्रतिसादही देत असल्याची माहिती मिळते आहे. हे वाचा - कोरोनाची लस इतक्यात नाहीच; केंद्रानं जाहीर केला मोठा निर्णय दरम्यान स्पेनआधी अमेरिकेतही प्राणीसंग्रहायलात कोरोनानं शिरकाव केला होता. न्यूयॉर्क शहरातील ब्रॉन्क्स झूमध्ये एप्रिल महिन्यात चार वाघ आणि तीन सिहांना कोरोना झाला होता. ते आता कोरोनातून बरे झाले आहेत. दरम्यान बार्सिलोनाच्या पशू वैद्यकीय सेवेच्या अधिकाऱ्यांनी या प्राणीसंग्रहायलाशीही संपर्क साधला आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Coronavirus, Spain

    पुढील बातम्या