घराजवळच्या रस्त्यावरून चालत होती माजी मिस वर्ल्ड; मागून आलेल्या बसने मारली धडक आणि...

घराजवळच्या रस्त्यावरून चालत होती माजी मिस वर्ल्ड; मागून आलेल्या बसने मारली धडक आणि...

घराजवळ फेरफटका मारण्यासाठी चालत बाहेर पडलेल्या या सौंदर्यवतीला मागून आलेल्या बसने धडक दिली. माजी मिस वर्ल्ड (Former miss world) नॉर्मा कॅप्पग्ली (Norma Cappagli) यांचं एका अपघातात निधन (Death) झालं आहे.

  • Share this:

ब्युनॉस आयर्स (अर्जेंटिना), 24 डिसेंबर :  गतकाळची सौंदर्यवती, जगप्रसिद्ध मॉडेल, आपल्या सौंदर्याने तिच्या देशालाच नव्हे तर जगाला भुरळ घालणारी माजी मिस वर्ल्ड एका भयंकर अपघातात दगावली. घराजवळ फेरफटका मारण्यासाठी चालत बाहेर पडलेल्या या सौंदर्यवतीला मागून आलेल्या बसने धडक दिली आणि ती मृत्यूशय्येवर आली. 6 दिवस तिने मृत्यूशी झुंज दिली, पण अखेर अपयशी ठरली.  अर्जेन्टीनाची (Argentina) पहिली मिस वर्ल्ड (Former miss world) नॉर्मा कॅप्पग्ली (Norma Cappagli) यांचं एका अपघातात (Accident) निधन (Death) झालं आहे.

17 डिसेंबर रोजी त्या आपल्या घराजवळ चालत होत्या तेव्हा पाठीमागून येणाऱ्या एका बसने (Bus) त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत त्या गंभीर जखमी झाल्या. त्याचबरोबर डोक्याला फ्रॅक्चर झाल्यामुळं त्या कोमात (Coma) गेल्या. 6 दिवस त्यांनी मृत्यूशी झुंज दिल्यानंतर 22 डिसेंबर रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या 81 वर्षांच्या होत्या.

नॉर्मा यांनी 1960 साली लंडन येथे मिस वर्ल्डचा किताब जिंकला होता. मिस वर्ल्डचा विजेतेपद पटकावणारी नॉर्मा अर्जेंटिनाची पहिली महिला होती. त्यावेळी त्यांचं वय केवळ 21 वर्षांचं होतं. त्यानंतर त्यांनी अरमानी आणि डियोर यांसारख्या प्रतिष्ठित ब्रँडसाठी मॉडलिंगचे काम केले. मिस वर्ल्ड विजेतेपद जिंकल्यानंतर त्यांना बक्षीस म्हणून 500 पौंड व स्पोर्ट्स कार देखील घोषित करण्यात आली होती. त्यानंतर काही दिवसांनी त्यांनी इंफोबेला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं होतं की, त्यांना रोख पारितोषिक मिळालं पण घोषित केलेली लक्झरी कार कधीही मिळाली नाही.

मॉडेलिंगमध्ये यश मिळवण्याल्यानंतर त्यांनी गायनातही आपलं नशीब आजमवण्याचा प्रयत्न केला. 1962 साली त्यांनी इटालियन व्हायोलिन वादक अर्मांडो यांच्यासोबत 'सेक्सी वर्ल्ड' या गाण्याला आपला आवाज दिला होता. हे गाणं एका शोसाठी देखील वापरलं गेलं होतं. नॉर्मा काही काळ घरापासून दूर ब्राझीलमध्ये राहिल्यानंतर  1989 मध्ये ती परत मायदेशी परतली.

नॉर्मा कॅप्पग्ली यांची भाची कार्ला यांनी सांगितलं की, त्यांचा मृत्यू एका बस अपघातात झाला आहे. कोरोना साथीच्या काळात त्यांनी स्वत:  ला आणि आजूबाजूच्या लोकांना सुरक्षित ठेवलं होतं. कोरोना महामारी संपल्यानंतर तिला पुंटा डेल एस्टेला फिरायला जायचं होतं. या वयातही ती खूप सक्रिय होती. पण बसचालकाच्या एका चुकीमुळे नॉर्मा यांचा मृत्यू झाला. त्यामुळं आता त्यांची सर्व स्वप्ने नष्ट झाली आहेत, अशी खंत नॉर्मा यांची भाची कार्ला यांनी व्यक्त केली.

याप्रकरणी 28 वर्षीय बसचालकाला अटक करण्यात आली आहे. त्याचबरोबर बसही जप्त करण्यात आली आहे. पोलीस या घटनेची चौकशी करत आहेत. 81 वर्षीय नॉर्माच्या अशापद्धतीनं जगातून जाण्यामुळं सगळ्यांना धक्का बसला आहे.

Published by: News18 Desk
First published: December 24, 2020, 2:41 PM IST
Tags: MISS WORLD

ताज्या बातम्या