मनी प्लान्ट नाही तर हे रोप घरी लावा आणि व्हा श्रीमंत
अनेकांना त्यांच्या मेहनती एवढे पैसे कमवता येत नाहीत. यामुळे लोक घरात वास्तू आणि ज्योतिष शास्त्रातील काही उपाय करतात.

प्रत्येकाचीच कोट्यधीश होण्याची इच्छा असते. आयुष्यभर पुरेल आणि मौज- मजा करता येईल एवढा पैसा कमवण्याची इच्छा असते. पण अनेकांना त्यांच्या मेहनती एवढे पैसे कमवता येत नाहीत. यामुळे लोक घरात वास्तू आणि ज्योतिष शास्त्रातील काही उपाय करतात.

घरात मनी प्लान्ट लावला तर पैशांची भरभराट होते असं म्हटलं जातं. पण मनी प्लान्टशिवाय क्रासुलाचं रोप हे सर्वात प्रभावी आहे असंही काहींचं म्हणणं आहे. हे रोप घरात लावलं तर घरात पैसा खेळता राहतो.

क्रासुलाला मनी ट्री असंही म्हटलं जातं. फेंगशुईमध्ये या रोपाला फार महत्त्व आहे. हे रोप लोहचुंबकाप्रमाणे घरात पैसे खेचून आणतं असंही म्हटलं जातं.

हे छोटसं रोप गडद हिरव्या रंगाचं असतं. याची पानं लांब आणि पसरट असतात.

हे रोप घरात लावायला फार त्रास होत नाही. हे रोप विकत घेऊन कोणत्याही कुंडीत किंवा जमिनीत लावू शकता. विशेष म्हणजे उन्हात किंवा सावलीत कुठेही हे रोप लावू शकता.

या रोपाबद्दल असं म्हटलं जातं की, हे घरात सकारात्मका आणि धन आणतं. हे रोप घराच्या मुख्य दारापाशी उजव्या बाजूला ठेवा.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सुचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.
First Published: Aug 14, 2019 07:42 AM IST