Home /News /lifestyle /

जबरदस्त ऑफर! फक्त 9 रुपयांत फॉरेन टूर; एका चॉकलेट, चिप्स पाकिटाच्या किमतीत परदेशवारीची संधी

जबरदस्त ऑफर! फक्त 9 रुपयांत फॉरेन टूर; एका चॉकलेट, चिप्स पाकिटाच्या किमतीत परदेशवारीची संधी

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

फक्त 9 रुपयांत प्रत्यक्षात साकार करू शकता परदेशवारीचं स्वप्न.

    नवी दिल्ली, 05 ऑगस्ट : किमान एकदा तरी परदेशात जावं असं स्वप्न अनेकांचं असतं. पण सर्वांचंच हे स्वप्न प्रत्यक्षात साकार होतं असं नाही.  फॉरेनमध्ये जायचं म्हटलं की विमान प्रवास आला आणि विमान प्रवास म्हटलं की त्याची तिकीट हजारांच्या घरात. त्यामुळे सर्वसामान्यांना विमान प्रवास परवडणारा नसतो. अशाच लोकांना त्यांचं फॉरेन टूरचं स्वप्न प्रत्यक्षात साकार करण्याची उत्तम संधी आहे. अवघ्या 9 रुपयात तुम्ही परदेशात जाऊ शकता. साध्या वडापाव खायचा म्हटला तरी 10 रुपयांपेक्षा जास्त पैसे द्यावे लागतात. फक्त 10 रुपयात तुम्ही एक चिप्स पाकिट किंवा एक चॉकलेट घेऊ शकता.  पण 10 रुपयांपेक्षाही कमी किमतीत तुम्हाला फॉरेन टूर करायला मिळाली तर... ही सुवर्णसंधीच नाही का? एका विमान कंपनीने अगदी स्वस्तात परदेशवारीची ही जबरदस्त ऑफर दिली आहे. हे वाचा - एका बंगल्याच्या किमतीत संपूर्ण बेट खरेदी करण्याची संधी; सोबत हेलिपॅड आणि बिल्डिंगही! इंटरनॅशनल एअरलाइन कंपनी वियतजेटही ऑफर घेऊन आली आहे. याची बुकिंग 4 ऑगस्टपासून सुरू झाली आहे. या ऑफरअंतर्गत तुम्ही भारतातून व्हिएतनामपर्यंत फक्त 9 रुपयांत विमान प्रवास करू शकता. व्हिएतजेटने दिलेल्या माहितीनुसार कंपनी भारत ते व्हिएतनाम प्रवासासाठी 30,000 प्रमोशन तिकीट ऑफर करत आहे. या तिकिट्सची किंमत 9 रुपयांपासून सुरू होते. 15 ऑगस्ट 2022 ते 26 मार्च 2023 पर्यंतच्या प्रवासासाठी तुम्ही बुकिंग करू शकता. पण ही बुकिंग 4 ऑगस्ट ते 26 ऑगस्टपर्यंतच करता येईल. बुधवार, गुरुवार आणि शुक्रवारी तिकीट बुकिंग केल्यासच तुम्हाला या ऑफरचा लाभ घेता येईल. हे वाचा - Travel Tips : रोड ट्रीपमध्ये मुलांसोबत खेळा 'हे' इंटरेस्टिंग गेम्स, मुलं स्मार्टफोनही विसरतील भारत ते व्हिएतनामदरम्यान 17 रूट्ससाठी ही डायरेक्ट फ्लाइट असेल. नवी दिल्ली, मुंबई, बंगळुरू, अहमदाबाद, हैदराबाद या पाच ठिकाणाहून ही विमान सेवा असेल.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Lifestyle, Travel, Travel by flight, Travelling

    पुढील बातम्या