Home /News /lifestyle /

सावधान! Facebook वरून मैत्री करून फसवणाऱ्या विदेशी नागरिकाला अटक, दिल्लीत बसून अनेकांना घातला गंडा

सावधान! Facebook वरून मैत्री करून फसवणाऱ्या विदेशी नागरिकाला अटक, दिल्लीत बसून अनेकांना घातला गंडा

फेसबुक (facebook) च्या माध्यमातून मैत्री करून त्याने अनेकांची बँक खाती रिकामी केली आहेत.

    जोधपूर, 17 डिसेंबर: फेसबुक (Facebook) हा तरुणाईला आकर्षित करणारं एक महत्त्वाचं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. फेसबुकच्या माध्यमातून अनेकजण आपल्या देश विदेशातल्या मित्र मैत्रिणींशी गप्पा मारतात. तर कधी कधी वैयक्तिक मैत्री नसलेल्या व्यक्तीशीही गप्पा मारल्या जातात. यातून कधी मैत्रीचं नात फुलत जातं, तर काही वेळा फसवणूकही होत असते. आतापर्यंत अशा अनेक बातम्या आपण वाचल्या आहेत. असंच एक फेसबुकच्या माध्यमातून फसवणूक करणारं जाळं पोलिसांनी शोधून काढलं आहे. एका विदेशी नागरिकाला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. जोधपूर शहर पोलिसांनी एका परदेशी ठगाला अटक केली आहे. यानं फेसबुक (facebook) च्या माध्यमातून मैत्री करून अनेकांची बँक खाती रिकामी केली आहेत. विशेष म्हणजे हा परदेशी ठग दिल्लीत राहत असून देशातील शेकडोजणांना त्यानं गंडा घातला आहे. जोधपूरमध्येही त्यानं फेसबुकवरून एका महिलेची फसवणूक केली आहे. या विदेशी ठगाने या महिलेला तब्बल 16.30 लाख रुपयांना लुटले आहे. पण आता या परदेशी ठगाला पोलिसांनी अटक केली आहे. जोधपूर शहरातील एका महिलेसोबत फेसबुकवर मैत्री करून परदेशातून सामान पाठवण्याचे आश्वासन देऊन 16.30 लाख रुपये लुटल्याप्रकरणी चौपासनी हौसिंग बोर्ड पोलिसांनी एका परदेशी नागरिकाला अटक केली आहे. फेसबुकवरील एका युवकाने तिच्या खात्यातून 16.30 लाख रुपये काढून घेतल्याचा आरोप या महिलेनं केला होता. त्यानंतर पोलिसांनी फेसबुक आयडी आणि फोन नंबरच्या आधारे मुंबईतून चार जणांना अटक केली. यापूर्वी सायबर सेलसह पोलिसांनी मुंबईतील दोन महिलांसह दोन तरुणांना अटक केली होती. हे लोक फेसबुकवरून त्यांचे प्रोफाइल पाहून पॅट्रिकबद्दल माहिती देत ​​असत. परदेशी असल्याने पॅट्रिक त्याच्याशी गप्पा मारत असे आणि त्याच्याकडून परदेशी वस्तू आणण्याच्या नावाखाली त्याच्या खात्यातून पैसे काढत असे. पैसे काढल्यानंतर पॅट्रिक सिम आणि फेसबुक खाते बंद करेल. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, पॅट्रिकने देशभरात शेकडो लोकांना आपले बळी ठरविले. चौकशीत अधिक प्रकरणे उघडकीस येण्याची शक्यता आहे. हा विदेशी ठग भारतीय टोळीसोबत काम करत होता यापूर्वी पोलिसांनी सायबर सेलच्या मदतीने मुंबईतील दोन महिलांसह दोन तरुणांना अटक केली होती. हे लोकं फेसबुकवरून लोकांचे प्रोफाइल पाहून पॅट्रिकला माहिती देत ​​असत. हा पॅट्रिक संबंधित महिलांशी फेसबुकच्या माध्यमातून गप्पा मारत असे आणि त्यांच्याकडून परदेशी वस्तू आणण्याच्या नावाखाली त्याच्या खात्यातून पैसे काढून घेत असे. पैसे काढल्यानंतर पॅट्रिक सिम आणि फेसबुक खातं बंद करायचा. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पॅट्रिकनं देशभरातील शेकडो लोकांना गंडा घातला आहे. चौकशीत अधिक प्रकरणं उघडकीस येण्याची शक्यता आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime, Facebook

    पुढील बातम्या