मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

झोपेतून उठल्यावर वारंवार असं होत असेल तर सावधान! स्वप्नांमधूनच होईल आजाराचं निदान

झोपेतून उठल्यावर वारंवार असं होत असेल तर सावधान! स्वप्नांमधूनच होईल आजाराचं निदान

जेव्हा आपण झोपेच्या सगळ्यात गाढ टप्प्यात असतो तेव्हा आपल्याला स्वप्नं पडतात. ही स्वप्नं आपल्याला काही सांगण्याचा प्रयत्न करत असतात.

जेव्हा आपण झोपेच्या सगळ्यात गाढ टप्प्यात असतो तेव्हा आपल्याला स्वप्नं पडतात. ही स्वप्नं आपल्याला काही सांगण्याचा प्रयत्न करत असतात.

जेव्हा आपण झोपेच्या सगळ्यात गाढ टप्प्यात असतो तेव्हा आपल्याला स्वप्नं पडतात. ही स्वप्नं आपल्याला काही सांगण्याचा प्रयत्न करत असतात.

दिल्ली, 24 मार्च: झोपेत स्वप्न पडणं, त्यात काही गोष्टी घडणं, कधीकधी स्वप्न अर्धवट राहणं, हे सगळं काही फार मोठंसं नव्हे. याकडे फारसं लक्ष दिलं जात नाही. जेवढी गाढ झोप तेवढी जास्त स्वप्नं. पण आपण ज्याकडे दुर्लक्ष करत असू, अशा या रोजच्या स्वप्नांमध्ये काही धोक्याची सूचना असेल असं वाटलं तरी होतं का?

निद्रातज्ज्ञांनी एक नवीन इशारा दिला आहे. ज्यामध्ये ते म्हणतात, तुमची स्वप्नं, ती लक्षात ठेवण्याची क्षमता आणि तुमची शारीरिक क्षमता याचा सहसंबंध असतो. जर झोपेतून उठल्यावर लगेचच तुमचे शरीर चलनवलन करू शकत नसेल, तोंडातून आवाज फुटत नसेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. त्याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करा.

Summer Health : उन्हात राहिल्यानं काळी पडलेली त्वचा घालवण्यासाठी करा हे घरगुती उपाय

 या गोष्टी तुमच्या काळजीचं कारण तर ठरत नाहीत ना?

काही गोष्टी रोज होत असतील तर सावध व्हा

जेव्हा आपण झोपेच्या सगळ्यात गाढ टप्प्यात असतो तेव्हा आपल्याला स्वप्नं पडतात. ही स्वप्नं आपल्याला काही सांगण्याचा प्रयत्न करत असतात. बरेचसे लोक स्वप्नं विसरून जातात. फार कमी लोक कायम आपली स्वप्नं लक्षात ठेऊ शकतात. सतत स्वप्नं पडणं, स्लीप पॅरालिसीस अर्थात निद्रा पक्षाघात या सामान्य घटना आहेत. हॉर्वर्डमधील संशोधक डिड्रे बॅरेट (Harvard researcher Deidre Barrett) यांच्या निरीक्षणानुसार जर बुद्धीभ्रम अथवा निद्रा पक्षाघात जास्तवेळा होत असेल तर हा चिंतेचा विषय आहे. तुम्ही तुमच्या डॉक्टरशी त्वरीत संपर्क साधला पाहिजे. सतत झोप येण्याच्या विकाराआधीचा हा एक संकेत असू शकतो.

स्वप्नांत तुमच्या आजाराची माहिती लपली आहे

निद्रा पक्षाघात एक अशी घटना आहे, ती जेव्हा होते तेव्हा माणूस स्वप्नातून जागा तर होतो पण हलू शकत नाही अथवा ओरडू शकत नाही. निद्रापक्षाघात आणि मतिभ्रम अशा गोष्टी त्या लोकांमध्ये जास्त दिसतात जे नार्कोलेप्सीसारख्या झोपेशी संबंधित आजारांनी त्रस्त आहेत.

मानसोपचारतज्ज्ञ एलन इसरने (Psychologist Alan Eiser) ने वॉशिंग्टन पोस्टला सांगितले होते की, आपल्याला आपल्या स्वप्नांतील घटनांचा अर्थ शोधायला हवा. त्याकडे दुर्लक्ष करू नये.

Success Story: 12वीत झाली होती नापास तरीही सोडली नाही जिद्द; 22व्या वर्षी झाली IAS

 इसरच्या मते, परतपरत पडणारी वाईट स्वप्न (Recurring nightmares) माणसाच्या आयुष्यातील व्यक्तिगत तणावामुळे पडतात. ही वाईट स्वप्न अँटी डिस्पेटेंट औषधांपेक्षाही घातक असू शकतात. तर बॅरेटच्या मते, ज्या व्यक्ती रात्री जास्त काळ झोपतात त्यांची स्वप्नं लक्षात ठेवण्याची शक्यता अथवा क्षमता जास्त असते. तर जी मंडळी कमी झोप घेतात त्यांची स्मरणशक्ती कदाचित तितकीशी चांगली नसावी.

First published:

Tags: Health Tips, Sleep