• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • फळं की भाज्या; वजन कमी करण्यासाठी नेमकं काय खावं?

फळं की भाज्या; वजन कमी करण्यासाठी नेमकं काय खावं?

वजन कमी (weight loss) करण्यासाठी आहारतज्ज्ञ फळं आणि भाज्या खाण्याचा सल्ला देतात, मात्र यापैकी काय अधिक प्रभावी आहे पाहुयात.

 • myupchar
 • Last Updated :
 • Share this:
  लठ्ठपणा कमी करण्यासाठी व्यायाम करणं खूप महत्वाचं आहे, तितकाच महत्त्वाचा आहे तो आहार. त्यामुळे काय खावं आणि काय खाणं टाळावं, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होईल, असा प्रश्न प्रत्येकाला पडतो. कारण व्यायामानंतर जर आपण वजन कमी न करणारे पदार्थ खाल्ले तर वजन कमी करण्याच्या मेहनतीला काहीच अर्थ राहणार नाही. आहारतज्ज्ञ फळं आणि भाज्या खाण्याचा सल्ला देतात. मात्र वजन कमी करण्यासाठी फळं की भाज्या काय फायदेशीर आहे ते पाहुयात. myupchar.com च्यानुसार, जर आपल्याला पोटाची चरबी कमी करायची असेल तर मोड आलेले कडधान्यं, ब्रोकोलीसारख्या पिष्टमय नसलेल्या भाज्या खाणं योग्य आहे. स्ट्रॉबेरी, सफरचंद आणि नाशपतीसारखी फळं फळांमध्ये जास्त चांगली मानली जातात. पण फळं आणि भाज्यांचा विचार केल्यास फळे खूप प्रभावी असतात. स्मूदी वजन घटवतं स्मूदी सेवन वजन कमी करण्यात खूप मदत करते. स्मूदीमध्ये अनेक फळे असतात, जे तंतुमय पदार्थांनी समृद्ध असतात. याशिवाय जर आपण दररोज नाशपती आणि सफरचंद इत्यादी फळांचं सेवन केलं तर त्यानेदेखील वजन कमी होऊ शकतं. ज्या लोकांना भाज्या खाण्याची आवड आहे ते वजन कमी करण्यासाठी कोबी, पालक, सोया आणि टोफू वापरू शकतात. या सर्वांमध्ये मोठ्या प्रमाणात तंतुमय पदार्थ देखील आढळतात. फळे चांगली की भाज्या फळं आणि भाज्यांवरील संशोधनात असं दिसून आलं आहे की, वजन कमी करण्यासाठी भाज्यांपेक्षा फळं चांगली असतात. यामागचं कारण असं आहे की, फळं पचण्यास वेळ लागत नाही पण भाज्या पचण्यास बराच वेळ लागतो. फळांमध्ये बरेच अँटी-ऑक्सिडंट घटक असतात, तसंच ते शरीराला उच्च प्रमाणात ऊर्जा प्रदान करतात. फळांचं सेवन केल्यानं भूकदेखील कमी होते. तसंच दिवसभर दररोज सारखं थोडंथोडं खाण्याची इच्छा होत नाही, म्हणून वजन कमी करण्यासाठी फळांचं सेवन करणं चांगलं. पावसाळ्यात भाज्या खाणं हानिकारक ठरू शकते पावसाळ्यात संक्रमणाचा धोकाही जास्त असतो, म्हणून भाज्यांचं सेवन करणे हानिकारक असू शकतं. कारण त्यावर जीवजंतू असू शकतात. जर त्या योग्य प्रकारे शिजवल्या नाहीत आणि तशाच खाल्ल्या तर पोटात गॅस, अपचन, बद्धकोष्ठता यासारख्या समस्या देखील उद्भवू शकतात. फळांबद्दल म्हणाल तर पावसाळ्यात फळं खाणं अधिक फायद्याचं ठरू शकतं कारण फळं शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती जलद मजबूत करतात आणि पावसाळ्यात शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीही मजबूत ठेवण्याची गरज असते. मधुमेही रुग्णांनी काळजी घ्यावी myupchar.com च्यानुसार ज्या लोकांना मधुमेह आहे आणि त्यांना वजन कमी करायचं आहे, त्यांनी जास्त भाज्या खायला हव्यात कारण फळांमध्ये साखर जास्त असल्यामुळे शरीरात साखरेची पातळी वाढू शकते. अधिक माहितीसाठी वाचा आमचा लेख - आरोग्यदायी आहार न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.
  First published: