सर्व उपाय करूनही चामखीळ जाईना; तुमच्या किचनमध्येच आहे यावर उत्तम औषधं

सर्व उपाय करूनही चामखीळ जाईना; तुमच्या किचनमध्येच आहे यावर उत्तम औषधं

चामखीळवर विविध उपाय करून थकला असाल तर हे घरगुती उपाय एका करून पाहा.

  • Last Updated: Nov 4, 2020 02:01 PM IST
  • Share this:

पेपिलोमा विषाणू हे त्वचेवर चामखीळ येण्याचं एक महत्त्वाचं कारण आहे. चेहरा, मान, हात, पाठ, पाय यावर चामखीळ येऊ शकतात. चामखीळपासून मुक्ती हवी म्हणून लोक बर्‍याच महागड्या उपचारांचा अवलंब करतात, तरी पूर्णपणे या समस्येपासून मुक्ती मिळत नाही. चामखीळमुळे वेदना होत नाहीत. मात्र तरी शरीराच्या दिसणाऱ्या भागावर चामखीळ असेल तर कसंतरीच वाटतं.

चामखीळ पूर्णपणे काढण्यासाठी तुम्ही घरगुती उपचारही करू शकतात.

अॅपल सिडेर व्हिनेगर

myupchar.com शी संबंधित डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ल यांच्या मते, अॅपल सिडेर व्हिनेगर हे त्वचेसाठी अतिशय प्रभावी औषध आहे. यात अनेक प्रकारचं दाहक आणि संसर्गविरोधी गुणधर्म आहेत. जे त्वचेचे डाग काढून टाकतात. व्हिनेगर वापरताना त्यात थोडंसं पाणी मिसळा आणि चामखीळच्या जागी थोडावेळ बोटानं हळूहळू मालिश करा. कोरडं झाल्यानंतर धुवा. दिवसातून दोनदा हा उपाय करा.

केळीची साल

केळी अनेक गुणांनी समृद्ध आहेत. त्याची सालेही फायदेशीर असतात. केळीची साल त्वचेसाठी चांगली असतात. केळीची साल चामखीळ पासून मुक्त होण्यासाठी एक उत्तम औषध आहे. केळीची साल चामखीळ सुकवण्यास उपयुक्त आहेत. केळीची साल बाधित भागावर ठेवा आणि या जागेला कापडानं बांधा. हे नियमितपणे अवलंबल्यास काही दिवसांत चामखीळ कोरडी होऊन निखळून पडेल.

बेकिंग सोडाा

चामखीळ काढण्यासाठी बेकिंग सोड्याचा वापर खूप प्रभावी आहे. यासाठी एक चमचा बेकिंग सोड्यामध्ये एरंडेल तेलाचे काही थेंब मिसळावे आणि हे मिश्रण चामखीळवर लावून हलक्या हातांनी मालिश करा. एका तासानंतर तो भाग स्वच्छ पाण्याने धुवा. एक महिना नियमितपणे हा उपाय केल्यास फरक जाणवेल.

लसूण

myupchar.com  शी संबंधित डॉ लक्ष्मीदत्त शुक्ला यांनी सांगितलं, लसणीत अँटीफंगल आणि जीवाणूच्या वाढीस प्रतिबंध करणारे  गुणधर्म आहेत, जो त्वचेवरचे चामखीळ काढण्यात मदत करतो. दोन लसूण पाकळ्यांची पेस्ट करून ती चामखीळवर लावा. तासाभरानं तो भाग स्वच्छ पाण्यानं धुवा. आपण दिवसातून दोनदा हा उपाय करू शकता.

कांद्याचा रस

कांद्याच्या रसाने देखील चामखीळ काढता येते. एका कांद्याचा रस काढा. आता या रसाने चामखीळच्या जागी काही वेळ मालिश करा. महिनाभर दिवसातून एकदा या पद्धतीचं अनुसरण करा. चामखीळची समस्या काही दिवसातच दूर होईल.

या गोष्टींची घ्या खबरदारी

जर आपल्याला चामखीळ काढायचे असतील तर आपण ते कापू देखील शकता. पण याबद्दल देखील आपण सावधगिरी बाळगली पाहिजे. चामखीळ कापल्यानंतर परत येते आणि त्याचा आकार देखील मोठा होतो. आपण पुन्हा पुन्हा कापल्यास ते परत येऊन त्याचा आकार वाढू शकतो आणि हे पूर्वीपेक्षा आणखी विचित्र दिसेल.

अधिक माहितीसाठी वाचा आमचा लेख - चामखीळ: लक्षणे, कारणे, उपचार, औषध...

ज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.

अस्वीकरण: आरोग्य विषयक समस्या आणि त्याविषयीचे उपचार याची माहिती सर्वाना सहज सुलभतेने कुठल्याही मोबदल्याशिवाय उपलब्ध व्हावी हा या लेखांचा हेतू आहे. या लेखनामध्ये प्रकाशित माहिती म्हणजे तज्ञ अधिकृत डॉक्टरांच्या तपासणी, रोगनिदान, उपचार आणि वैद्यकीय सेवेचा पर्याय नाही. जर तुमची मुले, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक यापैकी कुणीही आजारी असतील, त्यांना याठिकाणी वर्णन केलेली काही लक्षणे दिसत असतील तर, कृपया तत्काळ आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटा. डॉक्टरांच्या मार्गदर्शना शिवाय स्वतः, तुमची मुले, कुटुंब सदस्य, किंवा अन्य कुणावरही वैद्यकीय उपचार करू नका किंवा औषधे देवू नका. myUpchar आणि न्यूज18 यावर प्रकाशित माहिती, त्या माहितीच्या अचूकतेवर, या माहितीच्या परिपूर्णते वर विश्वास ठेवल्याने, तुम्हाला कुठलीही हानी झाली किंवा काही नुकसान झाले तर, त्याला myUpchar आणि न्यूज18 जबाबदार असणार नाही, हे तुम्हाला मान्य आहे, आणि त्याच्याशी तुम्ही सहमत आहात.

First published: November 4, 2020, 2:01 PM IST

ताज्या बातम्या