मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

पावसाळ्यात वाढते कपड्यांची दुर्गंधी; करा हे सोपे उपाय

पावसाळ्यात वाढते कपड्यांची दुर्गंधी; करा हे सोपे उपाय

पावसाळ्यात कपडे लवकर वाळत नाहीत. अशावेळी कपडे धुतल्यानंतर मोकळ्या  जागेत वाळत घाला. पंख्याच्या हवेवरही कपडे सुकवू शकता. यामुळे कपड्यांना दुर्गंध येणार नाही.

पावसाळ्यात कपडे लवकर वाळत नाहीत. अशावेळी कपडे धुतल्यानंतर मोकळ्या जागेत वाळत घाला. पंख्याच्या हवेवरही कपडे सुकवू शकता. यामुळे कपड्यांना दुर्गंध येणार नाही.

पावसाळ्यात कपडे व्यवस्थित न वाळल्याने कुबट वास येतो. अशात रोज धुतलेले कपडे कसे वाळवायचे हीच अडचण असते. हे सोपे उपाय करून पाहा

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली,03 जुलै : पावसाळा आपल्या सगळ्यांनाच हवाहवासा वाटतो पण, पावळ्यात होणारा चिखल, येणारी आजारपणं, बाहेर पडताना येणाऱ्या अडणी यांच्याबरोबर न वाळणारे कपडे यामुळे वैताग येतो. पावासाळ्यात सगळ्यांनाच होणारी मोठी समस्या  (Problem) म्हणजे कपड्यांना येणारी दुर्गंधी, कितीही प्रयत्न केला करी पावसाळ्यात कपड्यांना येणारा वास (Clothes Smell) जात नाही. त्यामुळे असे कपडे बाहेर घालून जाणंही अशक्य असतं. दमट वातावरणात (Humid Environment) कपड्यांना लवकर वास येऊ लागतो. अशा कपड्यांमध्ये बॅक्टेरियाही (Bacteria) वाढतो. त्यामुळे स्किन इनफेक्शनचा (Skin Infections) धोकाही वाढतो. कपड्यांना येणाऱ्या दमट वासाला त्रासले असाल तर, या टिप्स जरूर करा.

कपडे हवेवर वाळवा

पावसाळ्यात कपडे लवकर वाळत नाहीत. अशावेळी कपडे धुतल्यानंतर मोकळ्या  जागेत वाळत घाला. पंख्याच्या हवेवरही कपडे सुकवू शकता. यामुळे कपड्यांना दुर्गंध येणार नाही.

(नको कलर, नको मेहंदी; फक्त एक गोष्ट करा; केस काळे झालेच समजा)

लिंबाच्या रसाचा वापर

दमट हवेने ओल्या कपड्यांना दुगंध येऊ लागते. अशा परिस्थितीत कपडे धुवताना लिंबाचा रस वापरल्यास कपड्यांना घाण वास येणार नाही.

(इम्युनिटी वाढवण्यासाठी घेता व्हिटॅमिन्स; Overdoseने येईल नपुंसकत्व)

कपडे साठवू नका

पावसात भिजलेले किंवा वापरलेले कपडे घातल्यास त्यांना जास्त वास येतो. त्यामुळे असे कपडे साठवून ठेवू नका. भिजलेले कपडे लगेच धुवून टाका. त्यामुळे त्यात बॅक्टेरिया वाढणार नाही. असे कपडे चुकूनही कपाटात किंवा गोळा करून ठेवू नका. यामुळे इतर कपड्यांनाही वास येतो.

(Vastu Tips: भाग्य बदण्यासाठी घरात वापरा वेगवेगळे रंग, कौटूंबिक आयुष्य होईल सुखी)

व्हिनेगर आणि बेकिंग सोडा वापरा

बेकिंग सोडा वापरून पावसाळ्याच्या दिवसांत धुतलेल्या कपड्यांना येणारी दुर्गंध दूर करता येते. याकरता कपडे धुवताना डिटर्जंट बेकिंग सोडा किंवा व्हिनेगर वापरा. लगेचच फरक दिसेल.

First published:

Tags: Home remedies, Lifestyle