मुंबई, 23 मे: पालनपोषण (Nurturing) म्हणजे फक्त मुलाला जन्म देणं आणि वाढवणं असं नाही. तर, भविष्यात (Future) आपली मुलं समाजाचा भाग बनणार असतात. त्यामुळे आपलं मुलं जबाबदार नागरिक (Citizen) बनेल अशा प्रकारे संगोपन करणं होय. असं म्हणतात की चांगला समाज घडवण्यात मुलांचं संगोपन हे सर्वात मोठे योगदान आहे. आपण आपल्या मुलांशी ज्या पद्धतीने वागलात त्याचं प्रतिबिंब मुलांच्या व्यक्तीमत्त्वामध्ये दिसतं.
लहानपणीचा अनुभव एखाद्या व्यक्तीचा आत्मविश्वास (Confidence) आणि आत्मनिर्भरता (Independence) आयुष्यभर वाढवतो किंवा कमी करतो. ज्याला स्वतः पालकही जबाबदार असू शकतात. पालकांनी पॅरंटींग (Parenting) करताना आपल्या काही सवयी (Habits) बदलायला हव्यात. शिवाय तुम्ही जर या चुका केल्या तर मुलांचा आत्मविश्वास तर कमी होतोच पण त्याबरोबर ती तुमच्यापासून दूर देखील जाऊ शकतात.
(हे वाचा- आजार चालेल पण इंजेक्शन नको; कोरोना लसीच्या भीतीनं गावकऱ्यांनी मारल्या नदीत उड्या)
1. मुलांची चेष्टा करणे
मुलांच्या निकोप वाढीसाठी (For the Growth of Children) पालकांनी त्यांना प्रोत्साहन देणं खूप महत्वाचं आहे. प्रत्येक मुलाला आपल्या पालकांनी आपलं कौतुक करावं असं वाटतं असतं. आपल्याला, मुलाच्या छोट्याछोट्या गोष्टींवर हसू येऊ शकतं, पण कदाचित मुलानं तुमच्याकडून प्रशंसा मिळवण्यासाठी खूप कष्ट केले असतील आणि तुमच्या हसण्यामुळे ते कोमेजून जातात. जर आपल्या मुलाने काहीतरी बनवलं असेल आणि ते जरी सुंदर नसेल तर, त्याची चेष्टा करू नये. असं केल्याने, मुलं प्रयत्न करणं थांबवतील.
2. मुलांची तुलना करणे
बर्याच कुटुंबांमध्ये मुलांची तुलना करण्याची सवय असते. या सवयीने मुलांच्या मनात इतर मुलांबद्दल चिड आणि मत्सर वाढू शकतो. प्रत्येक मूल वेगळं असतं, प्रत्येकाच्या स्वतःच्या काही सवयी असतात. त्यामुळे मुलांची अशा प्रकारे तुलना करणे टाळा.
(हे वाचा- Pune Vaccination: जाणून घ्या आज पुण्यात कसं आहे लसीकरणाचे नियोजन)
3. प्रत्येक कामात खोट काढणं
बालपणात कोणतंही मूलं प्रत्येक गोष्टीत परिपूर्ण होऊ शकत नाही. अशा परिस्थितीत, मूलं काही अॅक्टिविटी करत असतील तर,त्याला ती करु द्या. त्यात दोष काढण्याऐवजी त्याच्या चांगल्या गोष्टींची स्तुती करा.
4. मुलाची इतरांशी तुलना नको
असे बरेच पालक असतात जे आपल्या मुलांची बाहेरच्या लोकांकडे तक्रार करत असतात. बरेच लोकं फक्त गप्पा मारण्याच्या उद्देशाने मुलाचे वाईट गुण सांगत बसतात. पण याचाच मुलांच्या मनावर खूप खोल परिणाम होतो आणि मुलं डिप्रेशनमध्ये जातात. ही गोष्ट दीर्घकाळ त्यां
च्या मनात घर करुन राहते, ज्याचा परिणाम नंतर त्याच्या आत्मविश्वासावर होतो.
(हे वाचा- लहान मुलांसाठी भारतीय Nasal Vaccines ठरेल गेम चेंजर, WHOच्या शास्त्रज्ञांचा दावा)
5. मुलांना मारहाण नको
मुलांना प्रत्येक गोष्टीत मारहाण केली तर, आपण खूप वाईट आहोत, आपण कोणालाही आवडत नाहीत अशी भावना त्यांच्या मनात येत राहते. त्यांना स्वत:बद्दल असुरक्षित वाटत राहतं आणि हिच त्यांची भावना मनात कायम राहते. त्याचा प्रभाव मोठं होईपर्यंत त्यांच्या व्यक्तीमत्त्वावर होतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Parents, Parents and child