लंडन, 01 जुलै : मळमळणं, उलटी, चक्कर येणं, मासिक पाळी चुकणं अशी सुरुवातीचा लक्षणं दिसल्यानंतर प्रेग्नन्सीचं पुढील लक्षण म्हणजे पोटाचा वाढणारा आकार. जसजसा गर्भाची वाढ होते, तसतसं बेबी बम्प दिसू लागतं. यूकेतील एका महिलेचंही पोट असं वाढू लागल्याने आपण प्रेग्नंट आहोत असं तिला वाटलं. 9 महिने तिने बाळाची प्रतीक्षा केली. पण 9 महिन्यांनंतर जेव्हा तिने वैद्यकीय तपासणी केली तेव्हा तिच्यासह डॉक्टरांनाही धक्का बसला
(Shocking pregnancy). ज्याला ती बाळ, नवा पाहुणा समजून पोटात 9 महिने वाढवत होती, ते खरंतर मोठं संकट होती, याची कल्पनाही तिला नव्हती
(Ovarian cyst in woman thinking herself pregnant).
यूकेतील 21 वर्षांची हॉली वेल्हॉमचं पोट वाढू लागल्याने आपण प्रेग्नंट आहोत असं तिला वाटलं. बाळाबाबत खूप स्वप्नं तिने रंगवली, येणाऱ्या बाळासाठी तयारीही सुरू केली. पाहता पाहता प्रेग्नन्सीचे 9 महिने संपले.. पण नऊ महिन्यांनंतरही प्रसूती वेदना होत नव्हत्या, त्यामुळे तिला चिंता वाटू लागली. एक दिवस तर तिची प्रकृती बिघडली म्हणून ती डॉक्टरांकडे गेली.
हे वाचा - ना बेबी बम्प, ना प्रेग्न्सीचं लक्षण; पोटात दुखू लागलं आणि 20 वर्षांच्या तरुणीने अचानक दिला बाळाला जन्म
डॉक्टरांनी तिच्या काही तपासण्या केल्या. तेव्हा मेडिकल रिपोर्टमध्ये जे दिसलं ते पाहून डॉक्टरही हैराण झाले. अल्ट्रासाऊंड रिपोर्टमध्ये ती प्रेग्नंट नसल्याचं निदान झालं. तिच्या पोटात बाळ नाही तर दुसरंच काहीतरी होतं. बाळ समजून ती आपल्या पोटात एक सीस्ट म्हणजे मांसाचा गोळा किंवा गाठ होती. ज्याचा आकार वाढत गेला आणि तिचं पोट बेबी बम्पसारखं झालं. ती प्रेग्नंट असल्यासारखी वाटू लागली.
रिपोर्टनुसार डॉक्टरांनी सांगितलं, तिच्या ओव्हरीत 27 सेमी आकाराचं म्हणजे जवळपास फुटबॉलइतकं सीस्ट होतं. तसंच तिच्या पोटात तरल पदार्थही साचत होते, ज्यामुळे तिचं पोट फुगलं होतं. हे पदार्थ तिच्यासाठी घातक ठरणारे होते. जीव वाचवण्यासाठी तात्काळ ऑपरेशन करण्याचा सल्ला तिला डॉक्टरांनी दिला.
हे वाचा - व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये वाजत होती 'शिट्टी'; मेडिकल रिपोर्टमध्ये समोर आलं धक्कादायक कारण
मी बाळाबाबत खूप स्वप्नं रंगवली होती. नव्या पाहुण्याची तयारी करत होती. पण मला या धोक्याची पुसटशीही कल्पना नव्हती. जेव्हा सत्य समजलं तेव्हा मी निराश झाले. पण आशा सोडली नाही. ठिक झाल्यानंतर मी प्रेग्नंट होणार, असं हॉली म्हणाली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.