मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Foot Skin: उन्हाळ्यात पायाच्या त्वचेची काळजी घेताना या टिप्स वापरा; चेहऱ्यासारखी होईल सुंदर स्कीन

Foot Skin: उन्हाळ्यात पायाच्या त्वचेची काळजी घेताना या टिप्स वापरा; चेहऱ्यासारखी होईल सुंदर स्कीन

पायाची त्वचा चेहऱ्याच्या त्वचेसारखी मऊ आणि चमकदार दिसायची असेल, तर तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवून हे काम करू शकता. येथे आम्ही तुम्हाला असेच 5 सोपे उपाय सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचे पाय उन्हाळ्यातही सुंदर बनवू शकता.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 27 एप्रिल : उन्हाळ्यात (Summer) सूर्यप्रकाश आणि प्रदूषणामुळे आपले पाय खराब दिसू लागतात. पायाची त्वचा निस्तेज आणि टॅनिंगने भरली जाते. तर काहींच्या पायावर कापल्याप्रमाणे डाग पडणे, घोट्याला भेगा पडणे इत्यादींमुळे त्वचेचे सौंदर्य खराब होते. यासाठी आपण आपल्या चेहऱ्याच्या त्वचेची जशी काळजी घेतो, त्याचप्रमाणे पायांच्या त्वचेचीही विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. पायांच्या त्वचेची (Foot Skin) काळजी न घेतल्यास बोटांमध्ये बुरशीची समस्या, नखे फुटणे, त्वचेवर डाग येणे इत्यादी समस्या वाढू शकतात, ज्यामुळे पाय खराब होऊ शकतात. जर तुम्हाला तुमच्या पायाची त्वचा चेहऱ्याच्या त्वचेसारखी मऊ आणि चमकदार दिसायची असेल, तर तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवून हे काम करू शकता. येथे आम्ही तुम्हाला असेच 5 सोपे उपाय सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचे पाय सुंदर बनवू शकता. यासाठी तुम्हाला पार्लरमध्ये जाण्याचीही गरज भासणार नाही आणि तुम्ही हे घरी सहज (Foot Skin Care Tips) करू शकाल. अशा प्रकारे पायांच्या त्वचेची काळजी घ्या नेल फंगस उपचार - सफरचंद सायडर व्हिनेगर आणि पाणी समान प्रमाणात मिसळा आणि त्यात पाय घाला आणि 20-30 मिनिटे बसा. यानंतर, टॉवेलच्या मदतीने पाय कोरडे करा आणि नखांवर लॅव्हेंडर एसेंशियल तेलाचे काही थेंब टाकून मालिश करा. रात्रीच्या वेळी असे केल्यास अधिक चांगले होईल. एक्सफोलिएशन आवश्यक - पायाची त्वचा एक्सफोलिएट करण्यासाठी 1/2 चमचे मध आणि 1/2 चमचे गुलाबजल 1 चमचे साखरेत मिसळा आणि स्क्रब तयार करा. याने पायाला चांगले मसाज करा. पायाची डेड स्कीन निघून जाईल. हे वाचा - World Malaria Day: मलेरिया जीवघेणा ठरू शकतो; आयुर्वेदिक उपचारांनी अशी घ्या काळजी पायांसाठी ब्युटी मास्क - पायांची त्वचा उजळ करण्यासाठी 2 चमचे भोपळ्याच्या पेस्टमध्ये 1/4 चमचे दालचिनी पावडर आणि 1 चमचे दही मिसळा. धुतलेल्या पायावर लावा आणि अर्धा तास तसेच राहू द्या. यामुळे पाय मऊ आणि चमकदार होतील. फुटलेल्या टाचांसाठी - टाचांच्या भेगा बऱ्या करण्यासाठी रात्री तुरटी आणि मिठाच्या पाण्यात पाय भिजवा आणि 20 मिनिटे बसा आणि नंतर ते कोरडे करा आणि टाचांवर क्रॅक क्रीम, खोबरेल तेल इत्यादी लावा. हे वाचा - Shocking! एनर्जी ड्रिंक पिताच 6 वर्षीय मुलाला आला हार्ट अटॅक; चिमुकल्याचा मृत्यू पायांची मालिश महत्त्वाची - पायांना आपल्या घरात उपलब्ध असलेल्या तेलाने मालिश करणे, फायदेशीर आहे. चांगल्याप्रकारे मसाज केल्याने पायाच्या वेदना, अस्वस्थता, थकवा कमी होतोच तर पायही सुंदर होतात. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
First published:

Tags: Summer, Summer hot

पुढील बातम्या