Home /News /lifestyle /

Foot Care Tips For Men : थंडीत फुटलेल्या टाचा अधिकच त्रास देतात; या घरगुती उपायांचा परिणाम दिसेल जालीम

Foot Care Tips For Men : थंडीत फुटलेल्या टाचा अधिकच त्रास देतात; या घरगुती उपायांचा परिणाम दिसेल जालीम

Foot Care Tips For Men: हिवाळ्यात थंडीमुळे हात-पाय बधीर राहतात आणि त्यांच्यातील रक्ताभिसरण व्यवस्थित नसल्यामुळे पायाच्या टाचेला भेगा पडू लागतात. काही वेळा या भेगा वाढून खूप वेदना (Pain) होतात, तर कधी सूज आणि वेदनांसोबत रक्त बाहेर येतं.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 28 जानेवारी : पायांकडे दुर्लक्ष केल्यानं कधीकधी पायांमध्ये अनेक समस्या उद्भवू शकतात. टाचांना भेगा पडणे ही एक कॉमन समस्या आहे. पायांना भेगा (Cracked heels) पडण्याचा त्रास कधीही होऊ शकतो. परंतु, हिवाळ्याच्या हंगामात थंडीत (Winter) हा त्रास आणखीनच त्रासदायक ठरतो. हे केवळ महिलांच्या बाबतीतच घडत नाही, तर ही समस्या पुरुषांनाही त्रासदायक ठरते. खरं तर, हिवाळ्यात थंडीमुळे हात-पाय बधीर राहतात आणि त्यांच्यातील रक्ताभिसरण व्यवस्थित नसल्यामुळे पायाच्या टाचेला भेगा पडू लागतात. काही वेळा या भेगा वाढून खूप वेदना (Pain) होतात, तर कधी सूज आणि वेदनांसोबत रक्त (Foot Care Tips For Men) बाहेर येतं. मात्र, या समस्येवर मात करण्यासाठी बाजारात विविध प्रकारची क्रीम्स आणि जेली आणि इतर गोष्टी उपलब्ध आहेत. पण, भेगा पडलेल्या टाचांवर हर्बल उपचार घरच्या-घरीही करता येतात. जाणून घेऊया अशा कोणत्या पद्धती आहेत ज्याचा उपयोग फुटलेल्या टाचांच्या उपचारात होऊ शकतो. प्रथम पाय स्वच्छ धुवा फुटलेल्या टाचांच्या उपचारात आवश्यक असलेली पहिली गोष्ट म्हणजे पायांची स्वच्छता. यासाठी एका टबमध्ये गरम पाणी घेऊन त्यात व्हॅसलीन मिसळा. त्यानंतर साधारण अर्धा तास या पाण्यात पाय टाकून बसा. यानंतर, टाचेला ब्रशनं हलक्या हातानं घासून स्वच्छ करा. नंतर कोमट पाण्यानं पाय धुवा आणि चांगली क्रीम लावा. आठवड्यातून एकदा असं करणं पुरेसं आहे. यामुळं तुमच्या भेगा पडलेल्या टाचेला खूप आराम मिळतो. फुटलेल्या टाचांसाठी खोबरेल तेल टाचांच्या भेगा पडण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी कोमट खोबरेल तेलानं दररोज भेगा पडलेल्या टाचांना मालिश करा. खोबरेल तेल लावल्यानं तुम्हाला खूप आराम मिळेल. पण शक्य असल्यास रात्री झोपतानाच त्याचा वापर करा, जेणेकरून खोबरेल तेल बराच वेळ टाचांवर राहतं. हे वाचा - Winter Health Tips: हिवाळ्यात तुमचीही बोटं सुन्न होतात? जाणून घ्या त्याची कारणे आणि घरगुती उपाय कडुलिंबाचा वापर कडुलिंब अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल आहे. त्यामुळं टाचांच्या भेगा पडण्याच्या समस्येवर ते खूप प्रभावी ठरतं. भेगा पडलेल्या टाचांवर वापरण्यासाठी कडुलिंबाची पानं बारीक करून पेस्ट बनवा. तुमची इच्छा असल्यास तुम्ही त्याचा प्रभाव वाढवण्यासाठी कडुलिंबाच्या पेस्टमध्ये हळद देखील घालू शकता. ही पेस्ट भेगा पडलेल्या टाचांवर लावा आणि कोरडं झाल्यानंतर धुवा. या उपायानं टाचांना भेगा पडण्याच्या समस्येत खूप आराम मिळतो. हे वाचा - पांघरुणातही हुडहुडी भरते! ‘तुमच्या पायजम्यात दडलंय गुपित’, थंडी घालवण्याचा महिलेने सांगितला सॉलिड फंडा फुटलेल्या टाचांसाठी केळी एक केळं बारीक करून ती फुटलेल्या टाचांवर लावल्यानं खूप आराम मिळतो आणि टाचा बऱ्या होऊ लागतात. ही केळी केवळ पोषक तत्त्वांनी समृद्ध नाही तर, ते आपल्या त्वचेसाठी एक चांगलं मॉइश्चरायझरदेखील आहे. केळीची पेस्ट भेगा पडलेल्या टाचांवर आठ ते दहा दिवस लावल्यानंतर तुम्हाला खूप चांगला परिणाम मिळेल. (सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Beauty tips, Health, Health Tips, Lifestyle, Winter

    पुढील बातम्या