मुंबई, 15 डिसेंबर : आई-वडिलांच्या मनात नेहमीच एक कुतूहल असते की, माझे लहान बाळ कधी खायला सुरुवात करेल. अनेकदा पालक त्यांना स्वत:ला वाटते म्हणून किंवा चुकीच्या माहितीमुळे बाळांना फळे आणि भाज्या खायला घालू लागतात. खरंतर एक वर्षापर्यंतच्या मुलांची पचनसंस्था (digestive system) पूर्णपणे विकसित झालेली नसते. अशा स्थितीत डॉक्टर त्यांना फक्त द्रव पदार्थ खाण्याचा सल्ला देतात. मूल सहा महिन्यांचे झाले नसेल तर त्याला फक्त आईचे दूध (Mother milk) देणे गरजेचे असते. तो सहा महिन्यांचा झाला की त्याला भाजीचे सूप, डाळ पाणी, तांदळाचे पाणी इत्यादी द्यायला (Foods You Should Never Give Babies) सुरू करू शकता.
NBT च्या बातमीनुसार, हे नियम पाळल्यास बाळांची पचनक्रिया चांगली राहते आणि ते निरोगी देखील राहतात. एक वर्षापर्यंतच्या बाळाची पचनक्रिया फारशी मजबूत नसते, हे लक्षात ठेवायला हवं. अशा स्थितीत आपण त्यांना काही गोष्टी खाऊ घालणे टाळले पाहिजे. जाणून घेऊया लहान बाळांना कोणत्या गोष्टी खायला देऊ नयेत.
1. गायीचे दूध
ऐकायला थोडं विचित्र वाटत असलं तरी गाईच्या दुधामुळे मुलांची पचनक्रिया सहज बिघडते. म्हणून, एक वर्षापर्यंतच्या बाळांना फक्त आईचे दूध किंवा फॉर्म्युला दूध देण्याचा सल्ला दिला जातो. गायीचे दूध दिल्यास मुलाच्या किडनीवर दबाव येतो आणि त्याचा परिणाम वाईट होऊ शकतो.
2. सायट्रिक फळे
वास्तविक, लिंबूवर्गीय फळांमध्ये अम्लीय घटक असतात, ते लहान मुलांना पचणे कठीण असते. यामुळे मुलाचे पोट खराब होऊ शकते किंवा त्याला पोटदुखी देखील होऊ शकते. लिंबूवर्गीय फळांमुळे, कधीकधी बाळाच्या शरीरावर पुरळ देखील येतात. त्यामुळे त्यांना ते खायला देऊ नयेत.
3. मीठ
बाळाची किडनी अद्याप पूर्ण विकसित झालेली नसते, त्यामुळे त्यांच्या जेवणात मीठ समाविष्ट केले तर ते त्यांना हानी पोहोचवू शकते. लहान बाळाला एका दिवसात एक ग्रॅमपेक्षा कमी मीठ पुरेसे असते, जे त्यांना आईच्या दुधापासून किंवा फॉर्म्युला मिल्कमधून मिळते.
हे वाचा - जास्त वेळ एकाच जागी बसल्यानं रक्तप्रवाहावर होतो हा भयंकर परिणाम; या आजारांचा वाढतो धोका
4. साखर
साखर अनेक प्रक्रिया करून तयार होते आणि घरापर्यंत अनेक प्रकारच्या रसायनांच्या संपर्कात येते. त्यामुळे साखर बाळासाठी हानिकारक ठरू शकते. साखरेमुळे मुलांची रोगप्रतिकारशक्तीही कमकुवत होते.
5. द्राक्षे
जर तुम्ही लहान मुलांना द्राक्षे खायला द्यायचा प्रयत्न केला तर ती त्यांच्या घशात अडकून गुदमरू शकते. तसेच द्राक्षे आंबट देखील असतात त्यामुळे मुलांमध्ये पोटदुखी होऊ शकते.
हे वाचा - Dreams Signs: अशी स्वप्नं तुम्हालाही पडतात का? भविष्यात भरपूर पैसा मिळण्याचे असे असतात संकेत
6. अंडी
एक वर्षानंतरच बाळाला अंडी खायला देणे योग्य ठरेल. सुरुवातीला, अंड्याचा फक्त पिवळा भाग खायला द्या. लहान मुलांना पांढऱ्या भागाची अॅलर्जी होऊ शकते. कधीकधी यामुळे पोटदुखी, उलट्या किंवा त्वचेची ऍलर्जी होऊ शकते.
(सूचना: या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health Tips, Small baby