Home /News /lifestyle /

Tips For Proper Sleep: या गोष्टी खाणं ताबडतोब थांबवा; रात्री वारंवार झोपमोड होऊन दिवस जातो खराब

Tips For Proper Sleep: या गोष्टी खाणं ताबडतोब थांबवा; रात्री वारंवार झोपमोड होऊन दिवस जातो खराब

Tips For Proper Sleep : झोप न येण्‍याचे किंवा मधेच झोपमोड होण्याचे प्रमुख कारण रात्री झोपण्‍यापूर्वी तुम्ही खाणारे काही पदार्थ देखील असू शकतात. ज्यामुळे तुमची झोप खराब होते. म्हणूनच झोपण्यापूर्वी कोणत्या गोष्टी खाऊ नयेत हे जाणून घेणे तुमच्यासाठी (Tips For Proper Sleep) महत्त्वाचे आहे.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 16 जानेवारी : झोपेचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. आपल्याला नीट झोप (Good Sleep) येत नसेल तर त्याचा आरोग्यासोबतच आपल्या हृदय आणि मेंदूवरही वाईट परिणाम होतो. मग आपल्याला सकाळी नीट जाग येत नाही किंवा जाग येऊनही फ्रेश वाटत नाही. कधी-कधी असंही होतं की आपल्याला झोप लागते, पण मधेच आपण झोपेतून पुन्हा पुन्हा जागे होतो. त्यामुळे झोप नीट पूर्ण होत नाही आणि मग आपल्या जवळपास प्रत्येक कामाच्या दर्जावर त्याचा परिणाम होतो. वास्तविक, हे सर्व आपल्या स्वतःच्या जीवनशैलीशी संबंधित काही सवयींमुळे आणि खाण्याच्या सवयींमुळे घडते. झोप न येण्‍याचे किंवा मधेच झोपमोड होण्याचे प्रमुख कारण रात्री झोपण्‍यापूर्वी तुम्ही खाणारे काही पदार्थ देखील असू शकते. ज्यामुळे तुमची झोप खराब होते. म्हणूनच झोपण्यापूर्वी कोणत्या गोष्टी खाऊ नयेत हे जाणून घेणे तुमच्यासाठी (Tips For Proper Sleep) महत्त्वाचे आहे. रात्री कॅफिन नको कॅफिनमध्ये असे घटक असतात जे आपल्याला जागृत ठेवतात आणि आपला मेंदू सक्रिय ठेवतात. झोप येवू नये म्हणून लोक अनेकदा चहा किंवा कॉफी इत्यादी कॅफिनयुक्त पेये घेतात, त्यामुळे त्यांना तासन्तास झोप येत नाही. यासाठीच आपल्या चांगल्या झोपेसाठी काही तास आधी कॅफिनयुक्त पदार्थ घेऊ नका. कार्बोहायड्रेट पदार्थ नको मर्यादित प्रमाणात कर्बोदकांचे सेवन ठीक आहे. परंतु, जास्त प्रमाण कर्बोदके चयापचयावर परिणाम करून आपल्या झोपेत व्यत्यय आणू शकतात. यामुळे आपल्याला अस्वस्थ वाटू शकते. त्यामुळे झोपायच्या आधी, तांदूळ, पास्ता, चिप्स, केळी, सफरचंद, बटाटे किंवा इतर अनेक तृणधान्ये ज्यामध्ये हे घटक जास्त प्रमाणात आढळतात अशा उच्च कार्बोहायड्रेट पदार्थ खाऊ नयेत. हे वाचा - बहिणीच्या नणंदेवर जडला इतका जीव; दोघींचा आयुष्य एकत्र घालवण्याचा निर्णय, वडील सांगून थकले प्रथिनेयुक्त पदार्थ टाळा जर तुम्ही प्रथिनयुक्त पदार्थ जसे की मांस किंवा कडधान्ये किंवा मासे आणि अंडी इत्यादींचे सेवन झोपण्यापूर्वीच केले तर त्यामुळे तुमच्या झोपेत अडथळा येईल. यामुळे तुमच्या पचनसंस्थेवर ताण पडतो आणि पचनक्रिया मंदावते. त्यामुळे झोपण्यापूर्वी प्रथिने जास्त असलेल्या गोष्टी खाणे टाळा. हे वाचा - स्तनाचा कॅन्सर होऊ नये म्हणून वेळीच व्हा सावध; निशुल्क मिळणारी ही गोष्ट त्यावर आहे प्रभावी चॉकलेट खाऊ नका काही लोक जेवणानंतर गोड पदार्थ म्हणून चॉकलेट खातात. चहा आणि कॉफीप्रमाणेच चॉकलेटमध्येही कॅफीनचे प्रमाण चांगले असते. यामुळे आपला मेंदू सक्रिय राहतो, ज्यामुळे तुम्हाला झोप येत नाही किंवा अनेक वेळा झोपमोड होते. त्यामुळे रात्री झोपण्याच्या काही वेळापूर्वी कॅफिनयुक्त चॉकलेट खाऊ नयेत. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Sleep, Sleep benefits

    पुढील बातम्या