जेवणानंतरही काहीतरी खायची इच्छा होते; मग विनासंकोच खा हे 8 पदार्थ

जेवणानंतरही काहीतरी खायची इच्छा होते; मग विनासंकोच खा हे 8 पदार्थ

रात्री आठनंतर तुम्ही हे पदार्थ कधीही खाऊ शकता.

  • Last Updated: Jul 13, 2020 10:19 PM IST
  • Share this:

कधी कधी रात्रीच्या जेवणानंतर काही तरी खाण्याची इच्छा होते. myUpchar.com शी संबधित एम्सच्या डॉ. वीके राजलक्ष्मी यांचे म्हणणे आहे की शरीराला ऊर्जेसाठी जेवणाची आवश्यकता असते. म्हणूनच काही तासानंतर भूक लागायला लागते. ही सामान्य गोष्ट आहे आणि जर जेवणानंतर ही भूक लागत असेल तर मात्र ही आरोग्याशी संबधित समस्या असू शकते. त्यामुळे तब्येतीची काळजी घेणाऱ्यांसमोर प्रश्न उभा राहतो की असे काय खावे ज्याने भूकही मिटेल, वजनही वाढणार नाही आणि आरोग्यावर विपरीत परिणामही होणार नाही. इथे आम्ही अशा आठ पदार्थांबाबत सांगणार आहोत, जे आपण रात्री 8 नंतरसुद्धा खाऊ शकतो, ज्यामुळे वजनही वाढत नाही आणि तब्येतही चांगली राहते.

मक्याच्या लाह्या

मक्याच्या लाह्या या इतर खाद्य पदार्थांच्या तुलनेत अधिक चविष्ट आणि आरोग्यवर्धक आहेत. एक वाटी लाह्यांमध्ये फक्त 30 कॅलरी असतात, ज्या बटाट्याच्या चिप्सपेक्षा पाचपट कमी आहेत. फक्त त्यात मीठ आणि लोण्याचे प्रमाण कमी हवे.

अॅवोकॅडो

अॅवोकाडो हे अत्यंत तंतुमय फळ आहे. यात मॅग्नेशियम असते जे कोर्टिसोल म्हणजेच तणाव कमी करणाऱ्या हार्मोनची पातळी नियंत्रित करते. हे झोपेसाठी स्नायूंना शिथील करण्यातही मदत करते.

केळी

केळ्यात पोटॅशियम आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते जे नैसर्गिकरित्या स्नायूंना आराम देण्याचे कार्य करते. यात असलेले कार्बोहाइड्रेट भूकही शांत करतात आणि चांगली झोप घेण्यास मदत करते. myupchar चे डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ला सांगतात की, केळ्यातील जीवनसत्व बी6 शरीरातील अमिनो अॅसिड ट्रिप्टोफॅनला सेरोटोनिनमध्ये परावर्तित करते, जे मेलाटोनिनला नियंत्रित ठेवते. म्हणूनच झोपण्याआधी केळी खाल्ल्याने आरामही मिळतो आणि झोप पण छान लागते.

डार्क चॉकलेट

झोपताना चॉकलेटपासून दूर रहा असे सांगितले जाते, पण डार्क चॉकलेट (70% पेक्षा अधिक) च्या लहान तुकड्यांमध्ये मिल्क चॉकलेटपेक्षा साखरेचे प्रमाण कमी असते आणि अँटीऑक्सिडेंटही भरपूर असतात.

ब्लूबेरी

एक कप ब्लूबेरी यात तंतू, जीवनसत्व आणि अँटीऑक्सिडेंट असतात आणि रात्री उशिराने खाण्यासाठी उत्तम असतात. या खाण्याने पचन सुधारते. ज्यांचे पचन तंत्र बिघडले आहे त्यांनी ब्लूबेरी जरूर खायाला हव्यात.

बदाम

सुकामेवा आणि त्यात विशेषतः बदामामध्ये स्नायूंना आराम देण्याचे गुण आहेत. म्हणून रात्री उशिराने काही खायची इच्छा झाली तर मूठभर बदाम खावे त्याने कुठलीच समस्या होणार नाही आणि झोपही छान लागेल. बदाम मेलाटोनिन स्राव वाढवतो.

दूध

रात्रीचे जेवण झाल्यावर जर खायची इच्छा झाली पोटात जागा असेल तर गरम दूध प्यावे. याने खाण्याची इच्छा जाते. तसेच अस्वस्थता कमी होते कारण यात नैसर्गिक रुपात ट्रिप्टोफॅन नावाचा पदार्थ असतो. एक चमचा मधासोबत दूध पिणे हा एक उत्तम पर्याय आहे.

काणे

वजन वाढायची भीती वाटत असेल तर रात्री जेवणानंतर मकाणे खावेयात मेदाचे प्रमाण कमी असते त्यामुळे वजन वाढत नाही आणि भूक ही शमते.

अधिक माहिती साठी वाचा आमचे लेख - सकस आहार

न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.

अस्वीकरण: आरोग्य विषयक समस्या आणि त्याविषयीचे उपचार याची माहिती सर्वाना सहज सुलभतेने कुठल्याही मोबदल्याशिवाय उपलब्ध व्हावी हा या लेखांचा हेतू आहे. या लेखनामध्ये प्रकाशित माहिती म्हणजे तज्ञ अधिकृत डॉक्टरांच्या तपासणी, रोगनिदान, उपचार आणि वैद्यकीय सेवेचा पर्याय नाही. जर तुमची मुले, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक यापैकी कुणीही आजारी असतील, त्यांना याठिकाणी वर्णन केलेली काही लक्षणे दिसत असतील तर, कृपया तत्काळ आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटा. डॉक्टरांच्या मार्गदर्शना शिवाय स्वतः, तुमची मुले, कुटुंब सदस्य, किंवा अन्य कुणावरही वैद्यकीय उपचार करू नका किंवा औषधे देवू नका. myUpchar आणि न्यूज18 यावर प्रकाशित माहिती, त्या माहितीच्या अचूकतेवर, या माहितीच्या परिपूर्णते वर विश्वास ठेवल्याने, तुम्हाला कुठलीही हानी झाली किंवा काही नुकसान झाले तर, त्याला myUpchar आणि न्यूज18 जबाबदार असणार नाही, हे तुम्हाला मान्य आहे, आणि त्याच्याशी तुम्ही सहमत आहात.

First published: July 13, 2020, 10:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading