Home /News /lifestyle /

शिळं अन्न टाकूनच द्या! अन्यथा होऊ शकतात गंभीर आजार

शिळं अन्न टाकूनच द्या! अन्यथा होऊ शकतात गंभीर आजार

शिळ्या पदार्थांमधून अन्नजन्य आजार (Foodborne Diseases) होण्याचा धोका अधिक असतो. या पदार्थांमध्ये तयार होणारे बॅक्टेरिया, पॅरासाईट किंवा विषाणूंमुळे तब्बल 250 प्रकारचे धोके (Types of Foodborne diseases) निर्माण होत असल्याचं समोर आलं आहे.

पुढे वाचा ...
मुंबई, 30 जून: आपण बऱ्याच वेळा रात्री तयार केलेले काही पदार्थ सकाळी पुन्हा गरम करून खातो. कित्येक वेळा आपण एखादा पदार्थ फ्रीजमध्ये ठेवला आहे, म्हणजे खराब झाला नसेल असं समजतो. तुम्हालाही अशी सवय असेल, तर वेळीच सावध (Dangers of stale food) होणं गरजेचं आहे. कारण शिळ्या पदार्थांमधून अन्नजन्य आजार (Foodborne Diseases) होण्याचा धोका अधिक असतो. या पदार्थांमध्ये तयार होणारे बॅक्टेरिया, पॅरासाईट किंवा विषाणूंमुळे तब्बल 250 प्रकारचे धोके (Types of Foodborne diseases) निर्माण होत असल्याचं समोर आलं आहे. फर्स्ट पोस्ट या वेबसाईटने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. अन्नजन्य आजार म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं झालं, तर खराब अन्नपदार्थ खाल्ल्यामुळे होणारे आजार म्हणजे अन्नजन्य आजार. या आजारांमध्ये (Symptoms of Foodborne diseases) साधारणपणे उलटी, जुलाब, विष्ठेमधून रक्त पडणं, पोटदुखी, डोकेदुखी, जुलाब, ताप, स्नायू आणि सांधेदुखी अशी लक्षणं दिसून येतात. खराब अन्नामध्ये काय काय असू शकतं खराब अन्नामध्ये (Bacteria, Parasites and Viruses in stale food) विविध प्रकारचे बॅक्टेरिया, विषाणू आणि पॅरासाईट असू शकतात. यामध्ये सॅल्मोनेला, क्लोस्ट्रिडियम परफ्रिन्जेन्स, कॅम्पिलोबॅक्ट, व्हिब्रिओ कॉलरा, स्टॅपिलोकोकस ऑरियस, लिस्टेरिया मोनोसायटोजेनेस अशा बॅक्टेरियांचा समावेश होतो. तसेच, नोरोव्हायरस, रोटाव्हायरस, हिपॅटायटीस ए आणि ई सारख्या विषाणूंचा समावेश होतो. खराब अन्नामध्ये साधारणपणे अमेबियासिस, जिआर्डिया, टॉक्सोप्लाझ्मा गोंडी आणि सायक्लोस्पोरा असे पॅरासाईटदेखील आढळतात. कोणत्या पदार्थात काय आढळतं काही ठराविक पदार्थांमध्ये विशिष्ट प्रकारचे बॅक्टेरिया, विषाणू किंवा पॅरासाईट दिसून येतात. हे रोगकारक ठरू शकतात. अशा पदार्थांपैकी काही उदाहरणं आपण पाहूयात.
 • अयोग्यरित्या साठवलेले किंवा कच्चे तांदूळ : बॅसिलस सेरेयस
 • दूषित पाणी : कॅम्पिलोबॅक्टर, व्हिब्रिओ कॉलरा, हिपॅटायटिस ए आणि ई यांसोबत इतर अनेक विषाणू आणि पॅरासाईट.
 • चीज, पुरेसे पाश्चराईज न केलेले दुग्धजन्य पदार्थ : लिस्टेरिया, ब्रुसेला
 • मानवी विष्ठेमुळे दूषित पाणी वा अन्न : ई. कोली, शिगेला इत्यादी.
 • अंडी, पोल्ट्री, दूषित कच्ची फळे आणि भाज्या : साल्मोनेला टायफी
 • डबाबंद पदार्थ, शिळे मासे, शिळे बटाटे : क्लोस्ट्रिडियम बोटुलिनम
मशरुमसारख्या काही पदार्थांमध्ये ठराविक काळानंतर विषही तयार होऊ शकतं. यामुळे आजारी पडण्याचा आणि काही प्रकरणांमध्ये मृत्यूचाही धोका असतो. अशी घ्या खबरदारी अन्नजन्य आजारांपासून बचाव करण्यासाठी (Precaution from foodborne diseases) काही सोप्या गोष्टी अवलंबणे फायद्याचे ठरते. पाहूयात कोणत्या आहेत या गोष्टी.
 • अन्न शिजवण्यापूर्वी हात धुवा.
 • फिल्टर केलेले किंवा उकळलेले पाणी प्या.
 • फळं किंवा भाज्या खाण्यापूर्वी वा शिजवण्यापूर्वी स्वच्छ पाण्यात धुवून घ्या. मांस, अंडी आणि मासेदेखील शिजवण्यापूर्वी स्वच्छ धुवून घ्या.
 • मांस, अंडी, भात, दूध असे लवकर खराब होणारे पदार्थ ताजेच खाण्याला प्राधान्य द्या.
 • शिळं अन्न खाणं (Avoid eating stale food) टाळाच. जर साठवून ठेवणं गरजेचं असेल, तर ते नीट रेफ्रिजिरेट करा, जेणेकरून त्यात बॅक्टेरिअल ग्रोथ होणार नाही.
 • बाहेरचे पदार्थ खाणं टाळा, कारण ते दूषित असण्याची शक्यता अधिक असते.
 • अशा प्रकारे तुम्ही अन्नजन्य आजारांपासून बचाव करू शकाल.
(लेखिका डॉ. तेहसीन पेटीवाला या गॅस्ट्रोइंडॉलॉजिस्ट आहेत.)
First published:

Tags: Lifestyle

पुढील बातम्या