धनंजय दळवी, प्रतिनिधी
मुंबई, 29 मार्च : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत जगभरातील नागरिकांची वर्दळ असते. जागतिकरणाच्या सध्याच्या युगात विदेशातील खाद्यसंस्कृतीही मुंबईत चांगलीच लोकप्रिय आहे. विदेशी खाद्यसंस्कृतीमध्ये कोरियन फुडचं मुंबईकरांना मोठं आकर्षण आहे. मुंबईच्या फास्ट लाईफला साजेसं कोरियन नुडल्स देणारा फुड स्टॉल आता शहरात सुरू झालंय. कोरियन पदार्थांची चव चाखण्यासाठी इथं नेहमी गर्दी असते.
कसा सुरू झाला व्यवसाय?
शशांक डेहलीकर असं या मुंबईकर तरुणाचं नाव आहे. तो मालाड परिसरात राहतो. शशांकनं रुईया कॉलेजमधून बीएमएमची पदवी घेतलीय. त्यानं सुरू केलेल्या बी बोईंग फेडरेशनला लॉकडाऊनमध्ये मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागलं. त्यानंतर त्यानं काही काळ वडिलांना शेतीमध्येही मदत केली. पण, स्वत:चा उद्योग सुरू करण्याची त्याची प्रबळ इच्छा होती. ही इच्छा पूर्ण करण्यासाठी शशांक पुन्हा मुंबईत परतला आणि त्यानं ग्रॅज्युएट हा स्टार्टअप सुरू केला.
डान्स करत 'हॉट डॉग' विकणारा मुंबईकर तरुण आहे तरी कोण? पाहा Video
शशांकनं सुरू केलेलं हे स्टार्टअप आता 'द कोरियन स्टेशन' म्हणून प्रसिद्ध झालं आहे. मालाड वेस्टला कार्डस ब्लू बँकेच्या अगदी समोर त्याचा स्टॉल आहे. कोरियन संगीता ऐकत या नुडल्सची लज्जत इथं ग्राहकांना चाखता येते, सर्वसामान्य ग्राहकांना परवडेल अशा दरामध्ये ऑथेंटिक कोरियन नुडल्स आम्ही देतो, असं शशांकनं सांगितलं.
'मला जेवण तयार करण्याची पहिल्यापासूनच आवड होती. या क्षेत्रामध्ये काहीतरी करण्याची इच्छा होती. त्यावेळी मला काकांनी कोरियन फुड सुरू करण्याचा सल्ला दिला. मी अनेकदा कोरियन फुड खाल्लं होतं. पण, मुंबईत ऑथेंटिक कोरियन फुड मिळत नव्हतं. त्यावेळी खिशाला परवडेल या दरात हा व्यवसाय सुरू करण्याचं ठरवलं. माझे काका आणि मित्रांच्या मदतीनं 'द कोरियन स्टेशन' सुरू झाले, असा अनुभव शशांकनं सांगितला.
'आम्ही इथं कशाची विक्री करतो हे सर्वांना लगेच समजलं पाहिजे म्हणूनच 'द कोरियम स्टेशन' हे नाव दिलं आहे. आगामी काळात या स्टॉलच्या स्वरूपात बराच बदल होणार आहे. यामध्ये आणखी काही कोरियन पदार्थ सुरू करणार आहे, ' असं शशांकनं सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Local18, Local18 Food, Mumbai