पुणे, 6 जुलै : चॉकलेट ही एक अशी गोष्ट आहे, जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खायला आवडते. 7 जुलै रोजी जागतिक चॉकलेट दिन येत आहे. त्यामुळे या दिवशी तर तुम्ही नक्कीच खुप सारे चॉकलेट खायचा बेत आखला असेल. यामुळे आम्ही तुम्हाला पुण्यातील प्रसिद्ध चॉकलेट मार्केट बद्दल माहिती देणार आहोत. जिथे तुम्ही वेगवगेळ्या प्रकारच्या चॉकलेटची खरेदी करून खाऊ शकता. कुठे कराल खरेदी? पुण्यात शुक्रवार पेठेत वेगवगेळ्या प्रकारचे चॉकलेट्स मिळतात. शुक्रवार पेठेत भवरेआळी येथे गाला ड्रायफ्रूट्स अँड चॉकलेट्स हे होलसेल दुकान आहे. गाला ड्रायफ्रूट्स अँड स्पायसेसचे मालक दर्शन शहा आहेत. ऑल टाइप्स ऑफ चॉकलेट गाला ड्रायफ्रूट्स अँड चॉकलेट्स या दुकानात मिळतात. लोकल फॉर वोकल असे समजले जाणारे इंडियन चॉकलेट्स या ठिकाणी सर्वात जास्त प्रमाणात मिळतात. चॉकलेटमधील इंटरनॅशनल ब्रँड सुद्धा या ठिकाणी होलसेल दरात मिळतात. इंडियन ब्रँड्स, इम्पोर्टेड ब्रँड्स आणि त्याचबरोबर होममेड चॉकलेट सुद्धा या ठिकाणी विक्री केले जातात.
आपल्याकडे ब्रँड्स जे स्पेसिफिक ब्रँड आहेत. कॅडबरी हा मोठा ब्रँड आहे, पण त्यात आपण प्रमाणानुसार होलसेलमध्ये दर करतो. इंडियन ब्रँडमध्ये जे चॉकलेट लोकल इंडियन लोक बनवतात आणि जे इंडियातच बनतं त्यावर आपण जास्त फोकस केलेला आहे. इंडियन गोष्टीवर आपलं जास्त करून होलसेल रेट आहेत. त्या कॅटेगिरीमध्ये जास्त कॅडबरी ब्रँड आहेत त्याच्यावर आपण डिस्काउंट देतो. डायरेक्ट मॅन्युफॅक्चर टू युजरला भेटेल आणि एकदम चीप रेटमध्ये चॉकलेट्स लोकांना देण्याचा प्रयत्न केला जातो, असं दर्शन शहा सांगतात.
Pune News : पावसाळ्यात कपड्यांचा वास येतोय? 24 तास टिकणारा परफ्युम हवाय? पुण्यात हे मार्केट खास
सिलेक्ट केलेले चॉकलेट्स चॉकलेट्समध्ये 80 टक्के पेक्षा जास्त इंडियन्स ब्रँड आहेत. इंदोर, हैदराबाद, पुणे आणि दिल्ली अशा इंडियाच्या एकेक कोपऱ्यावरून आपण सिलेक्ट केलेले चॉकलेट्स आहेत. आपल्याकडे युकेचे, युएईचे आणि फ्रान्सचे हे तीन मेन कॅटेगिरीचे चॉकलेट आहेत. इंडियन चॉकलेटवर 40 टक्के डिस्काउंट या ठिकाणी मिळतो. इथे चॉकलेटची किंमत 30 रुपयांपासून सुरु होते. ज्यात तुम्हाला 60 ते 70 पीस उपलब्ध आहेत. ज्यात स्मॉल कॅन्डी किंवा टॉफी मिळू शकते. सातशे रुपये पर्यंतचे कॅंडी किंवा टोपी पॅकिंगमध्ये उपलब्ध आहे. फॉरेनच्या ब्रँडला एमआरपी सिस्टम नसते, त्यामुळे आपण एकदम जे ऑनलाईन किंवा इतर मोठ्या दुकानांच्या तुलनेत 30 टक्के पेक्षा कमी किमतीमध्ये विकतो, असं दर्शन शहा सांगतात.

)







