जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / लोणावळ्याची ओळख असलेल्या मगनलला चिक्कीचा इतिहास तुम्हाला माहिती आहे? पाहा Special Report

लोणावळ्याची ओळख असलेल्या मगनलला चिक्कीचा इतिहास तुम्हाला माहिती आहे? पाहा Special Report

लोणावळ्याची ओळख असलेल्या मगनलला चिक्कीचा इतिहास तुम्हाला माहिती आहे? पाहा Special Report

लोणावळ्याची ओळख असलेल्या मगनलाल चिक्कीचा ‘हा’ इतिहास तुम्हाला नक्कीच माहिती नसेल.

  • -MIN READ Lonavala,Pune,Maharashtra
  • Last Updated :

लोणावळा, 1 जुलै : लोणावळा म्हटलं की सर्वांना तेथील निसर्गाची आठवण होते. पावसाळ्यात तर येथील निसर्गसौंदर्यांचा आनंद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. लोणावळ्यात आलेला प्रत्येक पर्यटक त्याच्यासोबत वेगवेगळ्या  प्रकारची चिक्की नक्कीच घेऊन जातो. येथील मगणलाल चिक्की चांगलीच फेमस आहे. या चिक्कीचा इतिहास काय आहे ते पाहूया 135 वर्षांचा इतिहास मगनलाल चिक्कीला 19 व्या शतकात म्हणजेच 1888 साली सुरूवात झाली. भेवारजी अग्रवाल यांनी त्यांचा मुलगा मगनलाल यांच्या नावानं मिठाईचं दुकान सुरु केलं होतं. ते या दुकानात गुड-दानी तयार करुन विकत असत. शेंगदाणे साफ करुन ते ते बारीक करून त्यात गूळ घालायचा आणि बारीक कडक मिठाई ते बनवत असतात.

News18लोकमत
News18लोकमत

सागवानाच्या झाडाच्या कोरड्या पानात ती मिठाई देऊन दुकानात विकली जायची.भेवारजी यांचं हे दुकान मुंबई-पुणे रेल्वे प्रवासादरम्यान स्टेशनच्या मोक्याच्या ठिकाणी होत. त्यामुळं प्रवासा दरम्यान लोकांची दुकानावर चक्कर असायची. हळूहळू भेवारजी यांची ही गुड-दानी फेमस झाली.भेवारजी यांच्यासोबत मगनलाल यांनी आपल्या वडिलांचा हा कारभार हाती घेतला. मगनलाल गुड-दानी मोठी फेमस व्हायला लागली. अनेक जण मुद्दामहून स्टॉपवर उतरून गुड-दानी खरेदी करत. बऱ्याचदा दुकानावर इतकी गर्दी व्हायची की, प्रवाशांची रेल्वे सुद्धा चुकत असे. 12 हजार रुपयांत पाहिजे आयफोन? पुण्यातील या मार्केटमध्ये आहे खरेदीची संधी लोणावळ्याची ओळख प्रवाशांची होणारी गडबड रेल्वे विभागाच्या लक्षात आली. गुड-दानी आरोग्याला सुद्धा फायदेशीर आहे, हे लक्षात घेऊन त्यांनी मगनलाल यांना रेल्वेत आपल्या गुड-दानीची पाकीट विकण्याची विनंती केली.  त्याचबरोबर चवीप्रमाणे जिभेवर रेंगाळत राहील असं नाव देखील ठेवायला सांगितलं आणि तेव्हा चर्चेनंतर गुड-दानीला ‘चिक्की’ असं नाव देण्यात आलं. पुढं हीच  चिक्की लोणावळ्याची ओळख बनली. असं मगनलाल चिक्कीचे व्यवस्थापक आशुतोष अग्रवाल यांनी सांगितलं. मगनलालचे स्नॅक्स जगभरात विकले जातात. .श्री. मगनलाल यांच्या पुढच्या पिढीनी हा व्यवसाय आणखी वाढवलाय.  ब्रिटिशांनी मुंबईचे सर्वात जवळचे हिल स्टेशन असलेल्या लोणावळ्याला कनेक्ट करण्यासाठी रेल्वे मार्ग तयार केल्याचा फायदाही या चिक्कीला झाला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात